ग्रामविकास
ग्रामपंचायतींना पंधराव्या वित्त आयोगाचा निधीच नाही विकास ठप्प !

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
ग्रामीण भागाच्या विकासासाठी पंधराव्या वित्त आयोगातून जिल्हा परिषद,पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतीना बंधित व अबंधित कामांना निधी दिला जातो.मात्र कोपरगाव तालुक्यातील जवळपास वीस ग्रामपंचायतींना गेली दिड ते दोन वर्षे हा निधीच मिळालेला नसल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.त्यामुळे ग्रामीण भागाचा विकास ठप्प झाला असल्याचे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.

आमच्या प्रतिनिधीने जवळके ग्रामपंचायतीच्या सरपंच सारिका विजय थोरात यांचेशी संपर्क साधला असता आमची निवडणूक डिसेंबर-2023 मध्ये झाली असून अद्याप आम्हाला बरीच महिने उलटूनही पंधराव्या वित्त विभागाचा सुमारे 10 लाख रुपयांहून अधिकचा निधी मिळाला नसल्याने अनेक ठराव घेऊन दिड दोन वर्षे उलटत आली आहे.मात्र विकास निधी नसल्याने सर्व कामे ठप्प असल्याचे सांगितले आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की,”ग्रामीण भागाच्या विकासासाठी पंधराव्या वित्त आयोगातून जिल्हा परिषद,पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतीना बंधित व अबंधित कामांना निधी दिला जातो.यात जिल्ह्यासाठी लोकसंख्या व क्षेत्रफळ यांच्या प्रमाणात प्राप्त झालेल्या निधीतील प्रत्येकी १० टक्के निधी जिल्हा परिषद व पंचायत समित्या यांना दिला जातो.या निधीतील ५० टक्के रक्कम खर्च झाल्याशिवाय वित्त आयोगाचा पुढील हप्ता दिला जात नाही.वर्षात एकूण चार हप्त्यात हा निधी दिला जातो.जिल्हा परिषदेला 15 व्या वित्त आयोगाच्या प्राप्त होणाऱ्या संभाव्य 30 कोटींच्या निधीतून 2025-26 चा विकास आराखडा तयार करण्याचे काम ग्रामपंचायत विभागातून 15 फेब्रुवारी मध्येच पूर्ण झाले आहे.15 व्या वित्त आयोगाचा 80 टक्के निधी हा थेट ग्रामपंचायतींना मिळतो,तर पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेला प्रत्येक 10-10 टक्के निधी दिला जातो.मात्र,जिल्हा परिषद व पंचायत समितीवर प्रशासक असल्याने 15 व्या वित्त आयोगाचा 10/10 टक्केचा त्यांचा निधी थांबवलेला आहे.तर राज्यात निवडणुक पूर्व लाडक्या बहिणीच्या घोषणेने सरकारच्या वित्त विभागाचे कंबरडे मोडले आहे.त्यामुळे ठेकेदारांचे देयके प्रलंबित आहे त्यामुळे ते आत्महत्या करीत आहेत.आगामी काळात निवडणुका घेण्याची सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने म्हंटले असले तरी परतीच्या पावसाने राज्यात मोठा तडाखा दिला असल्याने त्यांचे पंचनामे करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.बऱ्याच ठिकाणी पूर्ण होऊन त्याचा पहिला हप्ता सरकारने काळच जाहीर केला आहे.मात्र दिवाळीच्या आत सर्वच शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई देण्याचे अशक्य दिसत असल्याने याची ग्रामीण भागात मोठी नाराजी पसरण्याचा धोका आहे.लोकसभेनंतर सरकार ताक ही फुंकून पित असल्याचे दिसून येत आहे.
त्याचा प्रतिकूल परिणाम आगामी पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद निवडणुकीवर होणार हे ओघाने आलेच.त्यामुळे सरकार भेदरलेले आहे.लोकसभेनंतर सरकार ताक ही फुंकून पित असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे मागील व चालू असा जवळपास तीस कोटींचा निधी पंचायत समिती व जिल्हा परिषदेला प्राप्त होण्या बाबत संशकता व्यक्त होतआहे.त्यामुळे 73 व्यां घटनादुरुस्ती चा मोठा बडेजाव करणाऱ्या सरकारने पितळ उघड पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

कोपरगाव तालुक्यातील 75 ग्रामपंचायती पैकी 65 ग्रामपंचायतींना 15 व्या वित्त आयोगाचा निधी मिळाला असून उर्वरित 20 ग्रामपंचायतींना निधी मिळाला नसल्याची माहिती कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप दळवी यांनी दिली आहे.उर्वरित ग्रामपंचायतींना निधी मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे.
दरम्यान याबाबत आमच्या प्रतिनिधीने कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप दळवी यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी कोणत्या ग्रामपंचायतींना निधी मिळाला व किती ग्रामपंचायतींना निधी अद्याप अप्राप्त आहे ? असा सवाल केला असता त्यांनी तालुक्यातील वीस ग्रामपंचायतींना निधी मिळाला नसल्याची माहिती त्यांनी दिली आहे.त्यामुळे एकूण ग्रामपंचायतींचा विचार करता यातील 65 ग्रामपंचायतींना निधी मिळाला असल्याचे उघड झाले आहे.दरम्यान प्रशासक काळातील सहा ग्रामपंचायतींचा एक हप्ता बाकी असल्याचे माहिती उपलब्ध झाली आहे.
दरम्यान याबाबत आमच्या प्रतिनिधीने जवळके ग्रामपंचायतीच्या सरपंच सारिका विजय थोरात यांचेशी संपर्क साधला असता आमची निवडणूक डिसेंबर-2023 मध्ये झाली असून अद्याप आम्हाला बरीच महिने उलटूनही पंधराव्या वित्त विभागाचा सुमारे 10 लाख रुपयांहून अधिकचा निधी मिळाला नसल्याने अनेक ठराव घेऊन दिड दोन वर्षे उलटत आली आहे.मात्र विकास निधी नसल्याने सर्व कामे ठप्प असल्याचे सांगितले आहे.कोपरगाव तालुक्यातील बहुतांशी ग्रामपंचायतींची हीच स्थिती असल्याने ग्रामीण विकास ठप्प झाला असल्याच्या तक्रारी सरपंच,उपसरपंच आदींनी केल्या आहेत.
————————————————-
*पत्रकार नानासाहेब जवरे यांच्या विश्वसनीय बातम्यासाठी ‘न्यूजसेवा‘ वाचा आणि खालील लिंकवर क्लिक करून ग्रुप’मध्ये सामील व्हा*.
*न्यूजसेवा* डिजिटल युग डिजिटल बातमी.



