जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

या…या नगरपरिषदेच्या अत्याधुनिक स्वीपर मशीनचा शुभारंभ संपन्न !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी) 

   कोपरगाव शहर धुळमुक्त आणि स्वच्छ करण्याच्या दृष्टीने नगरपरिषदेने अत्याधुनिक धूळ नियंत्रक मशीन खरेदी करून स्वच्छतेच्या दृष्टीने एक महत्वाचे पाऊल उचलले असून आधुनिक मशीन खरेदी केले आहे.त्यामुळे रस्त्यांवरील धूळ आणि कचरा संकलित करून शहराची स्वच्छता प्रभावीपणे करता येणार असल्याचा दावा माजी आ.स्नेहलता कोल्हे यांनी केला आहे.

  

“कोपरगाव शहर धुळमुक्त करण्याचा संकल्प पूर्णत्वास जात आहे.नगरपरिषद निवडणुकीत शहरवासीयांना दिलेला शब्द पूर्ण करताना आम्हाला अभिमान वाटत आहे.शहरवासीयांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देत शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत”-पराग संधान,नगराध्यक्ष,कोपरगाव नगरपरिषद.

  कोपरगाव शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी उपलब्ध करण्यात आलेल्या या अत्याधुनिक स्वीपर मशीनचा शुभारंभ गुरुवार,५ नोव्हेंबर रोजी माजी आ.स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते श्री साईबाबा कॉर्नर येथे करण्यात आला.यावेळी सर्व पदाधिकारी,नगरसेवक आणि शहरवासीयांच्या उपस्थितीत मशीनचे श्रीफळ वाढवून विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर स्वच्छता मोहिमेला प्रारंभ करण्यात आला.यावेळी त्या मार्गदर्शन करताना बोलत होत्या.

  सदर प्रसंगी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पराग संधान,मुख्याधिकारी अजित निकत,आरोग्य सभापती वैभव आढाव,सर्व नगरसेवक,नगरसेविका,नगर परिषदेचे अधिकारी-कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    यापूर्वी कोपरगाव शहरातील रस्त्यांची स्वच्छता पारंपरिक पद्धतीने झाडू मारून केली जात होती.मात्र,त्यामुळे मोठ्या प्रमाणात धूळ उडत होती.ही बाब लक्षात घेऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला.या स्वीपर मशीनद्वारे शहरातील रस्त्यांवरील धूळ आणि कचरा संकलित केला जाणार असून,स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या मदतीने रस्त्यांची नियमित स्वच्छता केली जाणार आहे.त्यामुळे शहराच्या स्वच्छता व्यवस्थेला अधिक गती मिळणार आहे.यावेळी कोपरगाव शहरात स्वच्छतेचे कर्तव्य बजावणाऱ्या महिला व पुरुष स्वच्छता कर्मचाऱ्यांचा माजी आ.कोल्हे आणि नगराध्यक्ष पराग संधान यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला आहे.

यावेळी माजी आ.स्नेहालता कोल्हे म्हणल्या की,”कोपरगाव शहर धुळमुक्त करण्याचा आमचा मानस या उपक्रमातून पूर्णत्वास जात आहे.शहर आणि तालुक्याच्या विकासाच्या बाबतीत दोन्ही आमदारांनी टोकाचे राजकारण न करता शहराच्या हितासाठी एकत्रितपणे काम करावे.विकासासाठी सर्वांनी सकारात्मक भूमिका घ्यावी असे आवाहन शेवटी केले आहे.

 

  

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close