जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

रस्त्याचे काम दर्जेदार करा-मागणी

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

  कोपरगाव शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी शहरातील विविध विकासकामे,प्रमुख रस्ते आणि पायाभूत सुविधांसाठी विकास निधी दिला असून या निधीचा सदुपयोग करून पालखी रस्त्याचे काम दर्जेदार करा अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केली आहे.

आ.काळे यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे आणि त्यांच्या विशेष प्रयत्नांतून या रस्त्यासाठी ३७ लक्ष २६ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असून या महत्त्वपूर्ण रस्त्याचे भूमिपूजन काही महिन्यांपूर्वी त्यांचे हस्ते संपन्न झाले होते.मात्र संबंधित ठेकेदाराने कामाला दिरंगाई केली असून रस्त्याच्या प्रत्यक्ष कामाला मंगळवार दि.२४ रोजी सुरुवात झाली आहे.

   कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक १५ मधील नागरिकांसाठी आणि भाविकांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेल्या गोदावरी नदीवरील छोटा पूल ते बेट या पालखी रस्त्याच्या डांबरीकरण कामाला प्रत्यक्षपणे सुरुवात झाली आहे.आ.काळे यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे आणि त्यांच्या विशेष प्रयत्नांतून या रस्त्यासाठी ३७ लक्ष २६ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असून या महत्त्वपूर्ण रस्त्याचे भूमिपूजन काही महिन्यांपूर्वी त्यांचे हस्ते संपन्न झाले होते.मात्र संबंधित ठेकेदाराने कामाला दिरंगाई केली असून रस्त्याच्या प्रत्यक्ष कामाला मंगळवार दि.२४ रोजी सुरुवात झाली असून यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने श्रीफळ फोडून कामाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी ते बोलत होते.

   यावेळी राष्ट्रवादीचे सुनिल गंगुले,नगरसेवक मंदार पहाडे,राजेंद्र वाकचौरे,सचिन गवारे,राहुल शिरसाठ,विजय त्रिभुवन,माजी नगरसेवक फकीर कुरेशी,राजेंद्र आभाळे,विजय नागरे,राहुल आव्हाड,सागर लकारे,प्रशांत मोरे,राजेंद्र खैरनार,जावेद शेख,पप्पू देशमुख,सोमा शिंदे,तेजस गंगुले,वैभव कानडे,मनोज नरोडे,सचिन परदेशी,विलास आव्हाड, निलेश पाखरे,नाजीम शेख,राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते आणि बहूसंख्येने नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close