जाहिरात-9423439946
आंदोलन

कोपरगाव तालुक्यातील ‘त्या’ वाहतुकदारांची देयके मिळण्याचा मार्ग मोकळा !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

राज्य सरकारचा महत्वाकांक्षी असलेला मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग कोपरगाव तालुक्यातून जात असून याचे काम प्रारंभापासून वादग्रस्त असून नुकताच थकीत बिलांसाठी वहांनधारकांनी आंदोलन केले होते.त्याची दखल घेऊन आ.काळे यांनी मध्यस्थी करून हि थकीत १९ कोटी रुपयांचा मार्ग खुला केला असल्याची माहिती त्यांच्या प्रसिद्धी कार्यालयाने दिली आहे.त्यामुळे थकीत बाकी असलेल्या नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या ठेकेदारांची १९ कोटीची येणी गायत्री कन्स्ट्रक्शन कंपनीकडे थकले असल्याने ठेकेदारांनी उपोषणाचे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे सांगितले.त्याबाबत ना.आशुतोष काळे यांनी या प्रकरणाची दखल घेवून एम.एस.आर.डी.सी.चे मुख्य कार्यकारी संचालक राधेशाम मोपलवार,शिवाजी सातपुते,भाभा पाटील यांच्यासमवेत बैठका घेवून व गायत्री कन्स्ट्रक्शन कंपनी व राज इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडे पाठपुरावा केल्यामुळे हा प्रश्न मार्गी लागला आहे.

या बाबत सविस्तर वृत्त असे की,”समृद्धी महामार्गाचे काम करीत असलेल्या गायत्री कन्स्ट्रक्शन कंपनीकडून कोपरगाव तालुक्यातील अनेक छोट्या मोठ्या ठेकेदारांनी क्रेन,डंपर,भाडे तत्वावर देवून इलेक्ट्रिक तसेच काही छोटी मोठी कामे घेतली होती.मात्र २०२१ च्या शेवटी समृद्धी महामार्गाचे काम राज इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडे हस्तांतरित झाल्यामुळे मागील सात महिन्यापासून अनेक ठेकेदारांची गायत्री कन्स्ट्रक्शन कंपनीकडे थकीत येणे बाकी होते.त्याबाबत सर्व ठेकेदारांनी अनेक वेळा कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे मागणी करून देखील उडवा उडवीची उत्तरे दिली जात होती.त्यामुळे सहनशीलता संपलेल्या सर्व ठेकेदारांनी प्रांताधिकारी,तहसीलदार,पोलीस स्टेशन यांना निवेदन देवून चांदेकसारे परिसरात असलेल्या गायत्री कन्स्ट्रक्शन कंपनीच्या उभारण्यात आलेल्या कार्यालयासमोर सुधाकर होन यांच्या नेतृत्वाखाली २९ एप्रिल पासून उपोषण सुरु केले होते.

याबाबत सुधाकर होन यांनी ठेकेदारांची १९ कोटीची येणी गायत्री कन्स्ट्रक्शन कंपनीकडे थकले असल्याचे आ.काळे यांच्या निदर्शनास आणून देवून ठेकेदारांनी उपोषणाचे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे सांगितले.त्याबाबत ना.आशुतोष काळे यांनी या प्रकरणाची दखल घेवून एम.एस.आर.डी. सी.चे मुख्य कार्यकारी संचालक राधेशाम मोपलवार,शिवाजी सातपुते,भाभा पाटील यांच्यासमवेत बैठका घेवून व गायत्री कन्स्ट्रक्शन कंपनी व राज इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडे पाठपुरावा केल्यामुळे ठेकेदारांची थकीत येणी देण्यास भाग पाडले आहे.त्यामुळे सर्व वाहतूकदारांनी उपोषण मागे घेतले आहे.
थकीत १९ कोटी येणी पैकी २.०५ कोटी येणी काही ठेकेदारांच्या बँक खात्यात कंपनीकडून जमा देखील करण्यात आले असल्याची माहिती तुषार होन यांनी दिली आहे.यावेळी ना.आशुतोष काळे यांना यावेळी देवून थकीत येणी मिळवून देण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आभार मानले असून त्यांचा सत्कार केला आहे.

सदर प्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,संचालक आनंदराव चव्हाण,सागर होन,बाजीराव होन,तुषार होन,सोमनाथ कोते,विकास पुंगळ,अमोल राऊत,लखन औताडे,पप्पू जाधव,विशाल वर्पे,पप्पू देशमुख आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close