आंदोलन
…या तालुक्यातील साखर कारखान्यांनी ऊसाला साडेचार हजाराचा भाव द्या-मागणी

न्युजसेवा
कोपरगाव (प्रतिनिधी)
राज्यातील सहकारात अग्रणी अशी शुद्ध भूलथाप मारून स्वतःची पाठ थोपटून घेणाऱ्या नगर जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्याच्या नेत्यांनी सन -२०२६-२७ च्या गळीत हंगामासाठी जिल्ह्यातील ऊस उत्पादकांना ऊसाला प्रति टन 04 हजार 500 रुपयांचा दर द्यावा अशी मागणी शेतकरी संघटनेसह कोपरगाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट),शिवसेना (उबाठा) आदींनी केली आहे.त्यामुळे ऊस दराचा तिढा आता उत्तर अहिल्यानगर जिल्हात वाढणार असल्याचे बोलले जात आहे.

“अहिल्यानगर जिल्ह्यातील साखर कारखाने मोठ्या संख्येने उपपदार्थांची निर्मिती करत आहे.आणि शेतकऱ्यांच्या प्रतिटनावर विशिष्ट रक्कम कपात करून हे उपपदार्थ निर्मिती कारखाने उभारले आहे.सदर प्रकल्प काढताना सहकार महर्षि आणि कर्मवीर नेत्यांनी त्यावेळी प्रत्येक टनाला वेगळे दोनशे रुपये देण्याची घोषणा केली आहे.शिवाय शेतकऱ्यांच्या खिशातून पैसे खर्च केले आहे.त्यामुळे उपपदार्थ निर्मितीत मिळणाऱ्या उत्पादनात शेतकऱ्यांना राज्यातील शेतकऱ्यांपेक्षा जास्त वाटा म्हणजेच इतर जिल्ह्यापेक्षा तो किमान तीन हजार जास्त हवा”- श्रीरंग चांदगुडे,तालुका प्रमुख,शिवसेना,(उबाठा) कोपरगाव.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,”राज्यातील २०२६-२७ च्या गळीत हंगामात ऊस दराचा तिढा अधिकच तीव्र झाला असून,पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत तोडगा निघाला असला तरी मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात शेतकरी संघटनांचे आंदोलन अजूनही पेटलेले आहे.राहुरी,नेवासा आदी तालुक्यातील आंदोलने याची जिती जागती उदाहरणे असून आता हे लोण कोपरगाव,राहाता,श्रीरामपूर,संगमनेर तालुक्यात पोहचणार अशी चिन्हे दिसू लागली आहे.या पार्श्वभूमीवर आज कोपरगाव तालुक्यातील शेतकरी संघटना,कोपरगाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट),शिवसेना (उबाठा) आदींनी केली आहे.

“देश पातळीवर साखरेचे भाव ७५-८० रुपयांवर गेले आहे.सरकारला १० लाख टन कच्च्या साखरेची शुल्कमुक्त आयात करावी लागली.सरकारला आयात साखरेला द्यायला 75 ते 80 रुपये खर्च करायला पैसा आहे; मग देशातील शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाही का ? एका अंदाजानुसार साखरेचे उत्पादनात तूट राहील.त्यामुळे साखरेचे दर लगेच कमी होण्याची कोणतीही शक्यता दिसत नाही.नवीन साखर आल्यावर दर ६०- 70 रुपयांवर स्थिर होण्याची शक्यता आहे.उत्पादन अपुरे असल्यामुळे आणि मागणी कायम टिकून राहिल्यामुळे चालू हंगामात साखरेचे बाजारभाव उच्च पातळीवरच राहण्याची किंवा ते आणखी तेजीत टिकून राहण्याची शक्यता आहे.त्यामुळे नगर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी प्रति टणाला 04 हजार 500 रुपयांचा दर द्यावा”-नामदेवराव जाधव, ऊस उत्पादक व माजी अध्यक्ष,भाजप कोपरगाव तालुका.
त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की,”खुल्या बाजारात साखरेचे दर प्रतिकिलो ५० ते ८० रुपयांपर्यंत पोहोचल्याने साखर कारखान्यांना मोठा फायदा होत आहे.केवळ केंद्राने जाहीर केलेल्या ३ हजार ६५० रुपये प्रतिटन एफआरपी वर समाधान न मानता,कारखान्यांनी वाढीव नफ्यातून अधिक दर द्यावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.ऊस उत्पादन करताना खते,बियाणे,डिझेल,मजुरी आणि पाणीपट्टीचा खर्च दुप्पट झाल्याने सध्याच्या हमीभावात शेती परवडत नसल्याची भावना उत्पादकांमध्ये आहे.कोल्हापूर आणि सांगली पट्ट्यात शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर कारखान्यांनी ४,हजार २०० रुपये दर देण्याची तयारी दर्शवली आहे.मात्र,अहिल्यानगर कारखाने तेवढा दर देण्यास तयार नसल्याने राज्यभर एकसमान दराची मागणी जोर धरत आहे.उत्पादन खर्च,मजुरी,खते,डिझेल,पाणीपट्टी सगळे दुप्पट झाले असताना एफआरपी ३ हजार ६५० रुपयांत शेतकरी जगू शकत नाही.यावर्षीचा गळीत हंगाम १०-१५ दिवस आधी सुरू झाला.कारण देशात साखरेचा तुटवडा निर्माण झाला आहे.गत हंगामात उत्पादन घटून सुमारे २८० लक्ष टनांवर आले आहे. सुरुवातीचा साठा केवळ ३० लक्ष टन म्हणजे दशकातील सर्वात कमी राहिला.त्यामुळे साखरेचे भाव ७५-८० रुपयांवर गेले आहे.सरकारला १० लाख टन कच्च्या साखरेची शुल्कमुक्त आयात करावी लागली.सरकारला आयात साखरेला द्यायला 75 ते 80 रुपये खर्च करायला पैसा आहे; मग देशातील शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाही का ? असा सवाल करून एका अंदाजानुसार साखरेचे उत्पादनात तूट राहील.त्यामुळे साखरेचे दर लगेच कमी होण्याची कोणतीही शक्यता दिसत नाही.नवीन साखर आल्यावर दर ६०- 70 रुपयांवर स्थिर होण्याची शक्यता आहे.उत्पादन अपुरे असल्यामुळे आणि मागणी कायम टिकून राहिल्यामुळे चालू हंगामात साखरेचे बाजारभाव उच्च पातळीवरच राहण्याची किंवा ते आणखी तेजीत टिकून राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.पश्चिम महाराष्ट्रात सरकारने व सहकारी साखर कारखानदारांनी साखरेचा प्रतिक्विंटल बाजारभाव ४,हजार ५०० रुपये गृहीत धरून काढला आहे.भविष्यात साखरेचे दर प्रतिक्विंटल ४,हजार ५०० रुपयांच्या पुढे गेल्यास मिळणाऱ्या अतिरिक्त नफ्यातून ७० टक्के हिस्सा थेट शेतकऱ्यांना आणि ३० टक्के हिस्सा साखर कारखान्यांना देण्याचेही या बैठकीत ठरले आहे.या नव्या सूत्रामुळे भविष्यातील दरवाढीचा लाभही शेतकऱ्यांना मिळण्याची हमी मिळाली आहे.त्याची अंमलबजाणी सरकारने नगर जिल्ह्यात करण्याची गरज निर्माण झाली आहे.नगर जिल्ह्यातील शेतकरी ऊसाला पाणी,खते,देऊन रात्रीचा दिवस करत नाही का ? जीव धोक्यात घालून बिबट्यांच्या सामना करत नाही का ? असा कटू सवाल रूपेंद्र काले यांनी या प्रसिद्धी पत्रकाद्वारे विचारला आहे.नगर जिल्ह्यातील साखर कारखाने मोठ्या संख्येने उपपदार्थांची निर्मिती करत आहे.आणि शेतकऱ्यांच्या प्रतिटनावर विशिष्ट रक्कम कपात करून हे उपपदार्थ निर्मिती कारखाने निर्माण केले आहे.त्यात त्यांना रितसर वाटा मिळायला हवा.कारण सदर प्रकल्प काढताना सहकार महर्षि आणि कर्मवीर नेत्यांनी त्यावेळी प्रत्येक टनाला वेगळे दोनशे रुपये देण्याची घोषणा केली आहे.आणि शेतकऱ्यांच्या खिशातून पैसे खर्च केले आहे.त्यामुळे उपपदार्थ निर्मितीत मिळणाऱ्या उत्पादनात शेतकऱ्यांना राज्यातील शेतकऱ्यांपेक्षा जास्त वाटा मिळायला हवा आणि इतर जिल्ह्यापेक्षा तो किमान तीन हजार जास्त हवा अशी मागणी त्यांनी शेवटी केली आहे.
सदर प्रसिद्धी पत्रकावर शेतकरी संघटनेचे राज्य प्रसिद्धी प्रमुख नानासाहेब जवरे,प्रदेश सचिव रूपेंद्र काले,राष्ट्रवादी (शरद पवार गट) उत्तर नगर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष संदीप वर्पे,सेनेचे उपजिल्हा प्रमुख संजय दंडवते,अस्लम शेख,शिवसेना (उबाठा) तालुकाप्रमुख श्रीरंग चांदगुडे,कोपरगाव शहर प्रमुख गगन हाडा,भाजपचे माजी तालुकाध्यक्ष नामदेवराव जाधव,माजी तालुका प्रमुख गंगाधर रहाणे,सेनेचे तालुका प्रमुख धर्मा जावळे,कैलास गव्हाणे,नानासाहेब मोरे आदींच्या सह्या आहेत.
दरम्यान याबाबत राज्याचे सहकार मंत्री,आयुक्त साखर यांचेसह कोपरगाव तहसीलदार,सहाय्यक निबंधक,कोपरगाव शहर आणि तालुका पोलिस निरीक्षक आदींना शुक्रवार दि.13 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता निवेदन देणार आहे.त्यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने कोपरगाव येथे उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.



