आंदोलन
वतनाच्या जमिनीचा हिशेब द्या…तरच आंदोलन संपवू !

न्यूजसेवा
कोपरगाव (प्रतिनिधी)
कोपरगाव येथील साईबाबा कॉर्नर येथील महार वतनाचा प्रश्न दिवसेंदिवस चिघळत चालला असून गेल्या शिर्डी येथील अपर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि.02 सप्टेंबर पासून सुरू असलेले धरणे आंदोलन अद्याप संपलेले नाही ते संपवायचे असेल तर आधी कोपरगांव येथील महार लोकांच्या वतन व ईनाम जमिनीची सखोल चौकशी करून जमिनीचा हिशोब अशी महत्वपूर्ण मागणी वतनदार प्रकाश दुशिंग,बाबासाहेब कोपरे आदींनी केली आहे.

“शिर्डीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी कोपरगाव तहसीलदारांकडून या वतन जमिनींबाबत चौकशी अहवाल मागवला होता.मात्र,वर्तमान कोपरगाव येथील नायब तहसीलदारांनी जुन्या ‘मोडी लिपी’तील कागदपत्रांचे योग्य भाषांतर न करता आणि कसलीही शहानिशा न करता प्रशासनाला चुकीचा व दिशाभूल करणारा अहवाल पाठवल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी मागील सप्ताहात केला आहे.त्या बाबत वतनदार आणि खातेदारांचा आक्षेप नोंदवला असून महसूल विभागाने तयार केलेल्या या अहवालावर आक्षेप नोंदवला असून या संपूर्ण जमिनीची फेरतपासणी करण्याची मागणी लावून धरली आहे.मूळ महार वतनाच्या मौल्यवान जमिनी गैरमार्गाने,कागदपत्रांमध्ये फेरफार करून किंवा कवडीमोल भावाने वर्तमान लोकप्रतिनिधी,बिल्डर्स आणि इतर धनदांडग्यांनी लाटल्या आहेत”- राजू कोपरे,आंदोलनकर्ते,वंचित बहुजन आघाडी,कोपरगाव.
कोपरगाव येथील महार वतन जमिनीचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला असून या प्रकरणातील कथित हजारो कोटी रुपयांच्या जमीन घोटाळ्यामुळे स्थानिक पातळीवर तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.सुमारे ४०० दलित कुटुंबांनी या ऐतिहासिक जमिनीवर आपला हक्क सांगत ताबा मिळवण्यासाठी कायदेशीर लढा व आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.शिर्डीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी कोपरगाव तहसीलदारांकडून या वतन जमिनींबाबत चौकशी अहवाल मागवला होता.मात्र,वर्तमान नायब तहसीलदारांनी जुन्या ‘मोडी लिपी’तील कागदपत्रांचे योग्य भाषांतर न करता आणि कसलीही शहानिशा न करता प्रशासनाला चुकीचा व दिशाभूल करणारा अहवाल पाठवल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी मागील सप्ताहात केला आहे.त्या बाबत वतनदार आणि खातेदारांचा आक्षेप नोंदवला असून महसूल विभागाने तयार केलेल्या या अहवालावर आक्षेप नोंदवला असून या संपूर्ण जमिनीची फेरतपासणी करण्याची मागणी लावून धरली आहे.मूळ महार वतनाच्या मौल्यवान जमिनी गैरमार्गाने,कागदपत्रांमध्ये फेरफार करून किंवा कवडीमोल भावाने वर्तमान लोकप्रतिनिधी,बिल्डर्स आणि इतर धनदांडग्यांनी लाटल्याचा आरोप स्थानिक दलित संघटनांनी केला आहे.व त्या निषेधार्थ शिर्डी येथील अपर जिल्हाधिकारी या कार्यालयासमोर दिनांक 02 सप्टेंबर पासून धरणे आंदोलन सुरू केले आहे.त्याचा आज 26 वा दिवस होता.मात्र अद्याप जिल्हाधिकारी आणि अपर जिल्हाधिकारी यांनी त्यांची गंभीर दखल घेतली असल्याचे दिसून आलेले नाही.त्यामुळे दलीत संघटना विशेषता बहुजन वंचित आघाडीत मोठी धूसपूस सुरू असून असंतोष धुमसत आहे.त्याचा कधीही स्फोट होऊ शकत असल्याचे नागरिकांत बोलले जात आहे.या पार्श्वभूमीवर त्यांनी आज अपर जिल्हाधिकारी,कोपरगाव तहसीलदार यांचेकडे एक निवेदन दिले असून त्यात ही मागणी केली आहे.
त्यात त्यांनी पुढे म्हटले आहे की,”याआधी आपणास दि. १७ सप्टेंबर २०२६ रोजी निवेदनपत्र दिले असून त्याबरोबर वतन रजिष्टर,कोपरगांव व मौजे कोपरगांव येथील वतनाबाबत सहाय्यक संचालक,पुणे,पुरालेखागार,पुणे यांचेकडील मोडी दस्त व शासकिय मान्यता प्राप्त मोडी वाचक यांच्याकडून मोडी लिपीचे मराठी रूपांतर दस्त दिलेले असून त्यामध्ये ३९५ एकर जमिन महार लोकांची दाखवली असून त्यामध्ये काही जमीन इनाम व वतन असल्याचे स्पष्ट उल्लेख आलेला आहे.मोडी दस्त वाचन करून मराठी रुपांतर केलेले असून तहसिलदार कोपरगांव यांनी त्या जमिनीचा हिशोब दयावा व वतन किती व ईनाम किती याची माहिती अप्पर जिल्हाधिकारी,शिर्डी यांनी तात्काळ दयावी.असे न झाल्यास आम्ही सर्व खातेदार व वतनदार आपण हिशोब दिल्याशिवाय धरणे अंदोलन सोडणार नाही.व होणाऱ्या परिणामांची जबाबदारी महसूल विभागाची राहील असे बजावले आहे.सदर निवेदनाच्या प्रति राज्याचे महसुल मंत्री,जिल्ह्याचे पालकमंत्री,जिल्हाधिकारी,उपविभागीय अधिकारी,कोपरगावचे तहसिलदार आदींना पाठवल्या आहेत.कोपरगाव येथील नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते यांनी हे निवेदन स्वीकारले असल्याची माहिती आंदोलनकर्ते राजू कोपरे,प्रकाश दुशिंग आदींनी आमच्या प्रतिनिधींना दिली आहे.



