जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आंदोलन

…या प्रश्नासाठी शेतकऱ्यांची पुन्हा एकदा धडक !

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)  

   श्रीरामपूर तालुक्यातील आकारी पडीत नऊ गावांच्या वतीने शेतकरी संघटना व आकारी पडित शेतकरी संघटना यांचे वतीने प्रलंबित मागण्यासाठी येत्या शुक्रवार दि.१४ ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता ॲड.अजित काळे यांच्या नेतृत्वाखाली हरेगाव शेती महामंडळाच्या कार्यालयासमोर,’शेतकरी मेळावा व अन्नत्याग आंदोलन’ करणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेनं दिली आहे. 

“या पूर्वी शेतकरी संघटनेने जेलभरो आंदोलन केले होते.त्याची दखल राज्य सरकारने घेऊन जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी मध्यस्ती करत शेतकरी संघटनेच्या नेत्यांना मुंबई येथे नुकतेच महसूलमंत्री बावनकुळे यांनी निमंत्रित केले होते.त्यावेळी हे 24 एप्रिल 2026 रोजी या जमिनी शेतकऱ्यांना परत देण्याचे आश्वासन दिले होते मात्र ते सरकारने पाळले नाही.त्यामुळे शेतकऱ्यांत संताप व्यक्त होत असून त्याला वाचा फोडण्याचे काम शेतकरी संघटना करत आहे.त्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी उद्या दिनांक 14 ऑगस्ट रोजी हे उपोषण आणि अन्नत्याग आंदोलन ॲड.अजित काळे यांचे मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात येणार आहे.आता या लढ्याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

   उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील ०९ गावच्या शेतकऱ्यांच्या जमिनी जवळपास सात हजार पाचशे एकर मूळ शेतकऱ्यांच्या वारसांना देण्याचा आदेश १४ ऑगस्ट २०२४ रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ऍड.अजित काळे यांच्या माध्यमातून दिला होता त्यात राज्य शासनाला गतवर्षी ०२ महिन्यात याबाबतचा कायदा करून मूळ मालकांच्या वारसांना जमिनी देण्याचे आदेशित केलेले असता त्यास जवळपास अडीच वर्षे उलटत आले आहे तरीही उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी केली तर नाहीच उलट न्यायालयाचा आदेशाचा अवमान करत शेती महामंडळाने सदर चार हजार एकर जमिनी श्रीरामपूर तालुक्यातील ग्रामपंचायतींना सार्वजनिक व खाजगी उद्योजकांच्या घशात घालण्याचे प्रयोजन मोठ्या प्रमाणात सुरू आहे.त्यामुळे या नऊ गावातील शेतकऱ्यांत मोठा संताप व्यक्त होत आहे.परिणामी या भागातील शेतकऱ्यांनी आंदोलनाचे रणशिंग फुंकले होते.त्यात एप्रिल महिन्यात शेती महामंडळाच्या हरिगांव मळा पंचक्रोशीतील शिरसगाव,वडाळा महादेव,ब्राम्हणगांव,उंदीरगांव,खैरी निमगांव,खानापूर,माळवाडगांव,मुठेवाडगांव या ९ गावातील आकारी पडीत शेतकऱ्यांनी शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अँड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखालील आंदोलन सुरू केले होते.त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी दि.२० मार्च रोजी महात्मा गांधी पुतळ्यासमोर अँड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो महिला पुरुष शेतकऱ्यांचे उपस्थितीत आत्मक्लेश आंदोलन करण्यात आल्यानंतर संघटनेने जेलभरो आंदोलन केले होते.त्याची दखल राज्य सरकारने घेऊन जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी मध्यस्ती करत शेतकरी संघटनेच्या नेत्यांना मुंबई येथे नुकतेच महसूलमंत्री बावनकुळे यांनी निमंत्रित केले होते.त्यावेळी हे 24 एप्रिल 2026 रोजी हे आश्वासन दिले होते मात्र ते सरकारने पाळले नाही.त्यामुळे शेतकऱ्यांत संताप व्यक्त होत असून त्याला वाचा फोडण्याचे काम शेतकरी संघटना करत आहे.त्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी उद्या दिनांक 14 ऑगस्ट रोजी हे उपोषण आणि अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात येणार असल्याचे माहिती शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड.अजित काळे यांनी आमच्या ‘न्युजसेवा’च्या प्रतिनिधीला दिली आहे.

   दरम्यान या आकारी पडीत शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी ॲड.अजित काळे आणि त्यांच्या निष्ठावान सहकाऱ्यांनी सातत्याने संघर्ष केला असून प्रशासनापासून मंत्रालयापर्यंत शेतकऱ्यांचा आवाज पोहोचविण्यासाठी मोठा पाठपुरावा केला आहे.बैठका,निवेदने,आंदोलने आणि शासनस्तरावरील पाठपुराव्याच्या माध्यमातून त्यांनी हा प्रश्न सातत्याने जिवंत ठेवला आहे.या संघर्षाला पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचेही महत्त्वपूर्ण योगदान लाभले असल्याचा त्यांचा दावा आहे.त्यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत मंत्रालय स्तरावर वेळोवेळी बैठका लावून संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसमोर आकारी पडीत शेतकऱ्यांचा प्रश्न मांडला आहे.त्यास सकारात्मक प्रतिसाद पुरेसा नाही.त्यांना आता प्रत्यक्ष अधिसूचना हवी आहे.त्यामुळे आकारी पडीत जमीन लाभधारकांनी या आंदोलनासाठी उपस्थित राहावे,असे आवाहन शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.आता हा लढा शेवटच्या टप्प्यात पोहचला असून सरकार आणि महसूल खाते आता काय भूमिका घेणार याकडे या नऊ गावातील आकारी पडीत शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close