सहकार
…या सहकार परिषदेला हजर राहाणार शेकडो कार्यकर्ते !

न्युजसेवा
कोपरगाव (प्रतिनिधी)
शिर्डीत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेत अनेक देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. भारत देशातील सहकारी पतसंस्थांच्या एकजुटीचे दर्शन ही परदेशातील येणाऱ्या सहकारी पतसंस्थांच्या प्रतिनिधींना होणार आहे.त्यामुळे पारनेर तालुक्यातील सहकारी पतसंस्थांचे ५०० प्रतिनिधी या आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेला हजर राहाणार असल्याची माहिती नाशिक विभागीय सहकारी पतसंस्था फेडरेशन कार्याध्यक्ष वसंत कवाद यांनी दिली आहे.

“राज्य फेडरेशनच्या वतीने २०१२ हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष उत्साहात साजरे केले होते त्यानंतर २०२५ मध्ये पुन्हा एकदा शिर्डी येथे अहिल्यानगर जिल्ह्यातील सहकारी पतसंस्थांच्या प्रतिनिधींना आंतरराष्ट्रीय सहकार वर्षात सहभागी होण्याची संधी राज्य फेडरेशनने उपलब्ध करून दिली आहे”-सुरेश वाबळे,अध्यक्ष,फेडरेशन ऑफ मल्टीस्टेट को-ऑप.सोसायटी.
महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन आणि महाराष्ट्र शासन सहकार विभाग, असोसिएशन ऑफ एशियन कॉन्फडरेशन ऑफ क्रेडिट युनियन,फेडरेशन ऑफ मल्टीस्टेट को-ऑप.सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने २०२५ हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष असल्यामुळे शिर्डी येथे ९ फेब्रुवारी २०२५ रोजी आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेचे आयोजन केले आहे.या आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेच्या पूर्व तयारीसाठी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांच्या अध्यक्षतेखाली पारनेर तालुक्यातील जिल्हा सहकारी बँकेच्या स्व.गुलाबराव शेळके सभागृहात पारनेर तालुक्यातील सहकारी पतसंस्थांच्या प्रतिनिधींची बैठक संपन्न झाली. त्या वेळी ते बोलत होते.

पारनेर तालुक्यातील सहकारी पतसंस्था, मल्टीस्टेट सोसायट्यांच्या प्रतिनिधींनी या आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेला उपस्थित राहून आपले योगदान द्यावे. तसेच या तालुक्यातील अधिकाधिक प्रतिनिधींनी उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
सदर प्रसंगी फेडरेशन ऑफ मल्टीस्टेट को-ऑप.सोसायटी अध्यक्ष सुरेश वाबळे म्हणाले की,”राज्य फेडरेशनच्या वतीने २०१२ हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष उत्साहात साजरे केले होते त्यानंतर २०२५ मध्ये पुन्हा एकदा शिर्डी येथे अहिल्यानगर जिल्ह्यातील सहकारी पतसंस्थांच्या प्रतिनिधींना आंतरराष्ट्रीय सहकार वर्षात सहभागी होण्याची संधी राज्य फेडरेशनने उपलब्ध करून दिली आहे.त्यामुळे जिल्ह्यातील २ हजार पेक्षा अधिक प्रतिनिधी सहभागी होतील.अशी अपेक्षा व्यक्त केली.
या वेळी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन संचालक वासुदेव काळे, अहिल्यानगर जिल्हा स्थैर्यनिधी संघ संचालक शिवाजी आप्पा कपाळे,नामदेव थोरात, काकासाहेब लामखडे,भिवासेठ रसाळ, बाबाजी कळसकर,शांताराम कळसकर, कान्हूर पठार पतसंस्था चेअरमन सुशीला ठुबे, गुरुदत्त पतसंस्था चेअरमन लहू थोरात,पारनेर ग्रामीण पतसंस्था मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष थोरात,नगराध्यक्ष नितीन अडसूळ, अर्जुन भालेकर,संभाजी औटी,चंद्रकांत लंके, सुदाम म्हस्के,संजय भगत,संपत निघुट,बंडू म्हस्के,दत्तात्रय औटी,संतोष तांबे,संजय औटी, बबन पावडे,निवृत्ती अडसरे आदीसह अनेक पतसंस्थांचे प्रतिनिधी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.