जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

..त्या अकरा गावांना सारखाच न्याय द्या-या आमदारांचे निर्देश

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव विधानसभा मतदार संघातील नागरिकांचे अनुत्तरीत प्रश्न सोडविण्यासाठी राहाता तालुक्यातील अकरा गावातील नागरिकांचे प्रश्न सर्व शासकीय विभागाने तातडीने सोडविले पाहिजे जो न्याय राहाता तालुक्यातील इतर गावातील नागरिकांना दिला जातो तोच न्याय या अकरा गावातील नागरिकांना शासकीय अधिकाऱ्यांनी द्यावा अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी केल्या असून या नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पंधरा दिवसाला आढावा बैठक घेऊ असे आश्वासन दिले आहे.

राहाता तालुक्यामध्ये ११ गावे कोपरगाव विधानसभा मतदार संघाला जोडले गेले म्हणून त्यांना सापत्नपणाची वागणूक देणे योग्य नाही.सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी शिर्डी विधानसभा मतदार संघातील गावांवर जितके लक्ष दिले जाते तेवढेच लक्ष कोपरगाव विधानसभा मतदार संघावर ठेवावे-आ.काळे

कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या राहाता तालुक्याच्या अकरा गावातील नागरिकांच्या महसूल,कृषी,पंचायत समिती व महावितरण आदी विभागांबाबत असलेल्या समस्या जाणून घेण्यासाठी व त्यावर उपाययोजना करण्यासाठी आज तहसील कार्यालय राहाता येथे घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत सबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

यावेळी बोलतांना ते म्हणाले कि,मतदार संघातील नागरिकांना शासकीय कार्यालयात येणाऱ्या अडचणी तातडीने मार्गी लागाव्या यासाठी जनता दरबार व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहेत.त्याबाबत सर्व प्रमुख अधिकाऱ्यांनी आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांना सूचना देऊन नागरिकांना,ग्रामस्थांना शेतकऱ्यांना सर्वांना सन्मानाची वागणूक दयावी.त्यांच्या अडचणी काळजीपूर्वक ऐकून घेऊन त्यांच्या प्रश्नाचे व त्यांना येत असलेल्या अडचणींचे योग्य व समर्पक उत्तर द्यावे.प्रत्येक आढावा बैठकीत नागरिक जे जे प्रश्न याठिकाणी मांडतात त्या प्रश्नांची संबंधित विभागाने गांभीर्याने दखल घेऊन कार्यवाही करावी व हा प्रश्न पुढच्या बैठकीत पुन्हा उपस्थित होणार नाही याची काळजी घ्यावी.गोदावरी कालव्याच्या सल्लागार समितीची बैठक लाभक्षेत्रात व्हावी यासाठी मागील पाच वर्षात पाठपुरावा केला होता.त्याबाबत महाविकास आघाडी सरकार स्थापन होताच जलसंपदा मंत्री जयंत पाटील व अन्ननागरी पुरवठामंत्री तथा नासिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे पाठपुरावा केला होता.त्यास जलसंपदा मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन त्याचे अधिकार पालकमंत्री ना.भुजबळ यांना दिले असून त्यानुसार कोपरगाव व राहाता येथे ना. छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार दि.७ नोव्हेम्बर रोजी कालवा सल्लागार समितीची बैठक होणार आहे. या बैठकीसाठी शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे.आपल्या ज्या अडचणी उजव्या कालव्याच्या बाबतीत,चाऱ्यांच्या बाबतीत आहेत यासर्व आपण त्यादिवशी त्याठिकाणी मांडावे.महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांसाठी व सर्वसामान्य नागरिकांसाठी ज्या काही योजना राबवीत आहे त्या योजनांचा लाभ हा गरजू लाभार्थ्यापर्यंत पोहोचला पाहिजे त्या योजनांचा लाभ घेतांना त्या लाभार्थ्यांची अडवणूक होणार नाही याची काळजी घ्या. त्याचप्रमाणे खावटी योजनेचा देखील लाभ अकरा गावातील नागरिकांना झाला पाहिजे यासाठी प्रयत्न करावे.या अकरा गावातील खंडकरी शेतकऱ्यांचा प्रश्न मोठा असून त्याबाबत आपण लवकरच स्वतंत्र बैठक घेणार असल्याचे आ.काळे यांनी यावेळी सांगितले. या बैठकीत महावितरण,कृषी,पंचायत समिती व महसूल बाबत संजय धनवटे,विठ्ठलराव शेळके,नामदेव धनवटे,मुरलीधर थोरात,अशोक काळे,आण्णा कोते,नामदेव धनवटे,सुनील कुरकुटे,राजेंद्र धनवटे यांनी प्रश्न मांडले.

यावेळी तहसीलदार कुंदन हिरे,गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,गौतम सहकारी बँकेचे अध्यक्ष बाबासाहेब कोते,कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे,महावितरणचे अभियंता ज्ञानोबा राठोड,तालुका वैद्यकीय अधिकारी प्रमोद म्हस्के,सार्वजनिक बांधकाम विभागाचे सुरेश वैष्णव,संजय धनवटे,विठ्ठलराव शेळके,नामदेव धनवटे,मुरलीधर थोरात,अशोक काळे,शंकरराव लहारे,सुभाष कापसे,आण्णासाहेब कोते,सुनील कुरकुटे,विनायक देठे,राजेंद्र धनवटे,महेश जाधव,भाऊसाहेब लहारे,सर्व कृषी सहाय्यक,मंडल अधिकारी,ग्रामसेवक,राहाता राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष नंदकुमार सदाफळ,अक्षय काळे,दिलीप चौधरी,मुरलीधर शेळके,वाकडीचे सरपंच डॉ.संपत शेळके,अंजनापूरचे माजी सरपंच ज्ञानेश्वर गव्हाणे,धनगर वाडीचे उपसरपंच अनिल रकटे,दीपक वाघ,नितीन वाकचौरे,बाबासाहेब वाघ,ज्ञानेश्वर वर्पे,गंगाधर गमे आदी उपस्थित होते.प्रास्तविक व स्वागत तहसीलदार कुंदन हिरे यांनी केले तर आभार गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close