कोपरगाव तालुका
जलसंपदाच्या पाण्यासाठी सात क्रमांकाचा अर्ज भरा-आवाहन
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
गोदावरी कालव्याच्या लाभधारक क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगाम २०२०-२१ साठी संरक्षित उभ्या भुसार,बारमाही,फळबागा तसेच सर्वच प्रकारच्या पिकांसाठी पाटबंधारे विभागाकडून जाहीर प्रगटन प्रसिद्ध करण्यात आले असून गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतीसाठी सात नंबर पाणी मागणी अर्जावर पाणी देण्यात येणार असून गोदावरी कालव्याच्या लाभधारक क्षेत्रातील शेतकऱ्यांनी सात नंबर पाणी मागणी अर्ज मुदतीच्या आत पाटबंधारे खात्याच्या संबंधित शाखा कार्यालयाकडे जमा करावे असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी नुकतेच केले आहे.
गोदावरी कालव्याच्या सल्लागार समितीची बैठक हि लाभक्षेत्रातच घेतली जावी यासाठी मागील पाठपुराव्याला यश मिळवून हि बैठक शनिवार दि.७ नोव्हेम्बर रोजी संपन्न होत आहे.या बैठकीत शेतकऱ्यांना आवर्तनांसंबंधी येत असलेल्या अडचणी मांडता येणार असून शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे व अडचणी मांडाव्या-आ.आशुतोष काळे
आ.काळे यांनी म्हटले आहे की,गोदावरी कालव्याच्या सल्लागार समितीची बैठक हि लाभक्षेत्रातच घेतली जावी यासाठी मागील पाच वर्षाच्या पाठपुराव्याला यश मिळवून हि बैठक शनिवार (दि.७) रोजी होत आहे.या बैठकीत शेतकऱ्यांना आवर्तनांसंबंधी येत असलेल्या अडचणी मांडता येणार असून शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे.यावर्षी चांगले पर्जन्यमान झाल्यामुळे धरण क्षेत्रात समाधानकारक पाणीसाठा आहे.पावसाळ्यात जायकवाडी धरणामध्ये नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून ओव्हर फ्लोच्या माध्यमातून मोठ्याप्रमाणात पाणी वाहून गेल्यामुळे जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे यावर्षी जायकवाडी धरणात पाणी सोडण्यात येणार नाही.त्यामुळे लाभधारक सर्व शेतकऱ्यांनी वेळेत सात नंबर पाणी मागणी अर्ज दाखल करणे गरजेचे आहे.त्यानुसार शेतकऱ्यांनी या आवर्तनाचा लाभ देण्यासाठी पाटबंधारे विभागाला नियोजन करता येणे शक्य होईल.सर्व शेतकऱ्यांना पाणी मिळावे या उद्देशातून १५ नोव्हेंबर पर्यंत सात नंबर पाणी मागणी अर्जासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व पूर्तता करून लाभधारक शेतकऱ्यांनी आपले पाणी मागणी अर्ज दाखल करावे असे आवाहन आ.काळे यांनी शेवटी केले आहे.