जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात विविध कामासाठी नवीन निधी मंजूर !

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहराच्या विविध विकास कामांसाठी नागरी दलितेतर वस्ती सुधार योजना अंतर्गत लेखाशिर्ष (२२१७ ए ३३२) अंतर्गत सन २०२४-२५ मधून २ कोटी २१ लक्ष रुपये निधीच्या विकास कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

“कोपरगांव नगरपरिषद हद्दीतील एस.जी.विदयालयासमोर पेव्हींग ब्लॉक बसविणे (००.८५) लक्ष, प्रभाग क्र.८ मध्ये भगवती कॉलनी मधील दत्तात्रय गवळी घर ते भगवान पितळे घर पेव्हींग ब्लॉक बसविणे (४०.०३ लक्ष), प्रभाग क्र.१० मध्ये राजु लोखंडे घर ते ठोंबरे घर भूमिगत गटार करणे (०९. ९०) लक्ष आदीसह अनेक कामे आहे”- आ.आशुतोष काळे,कोपरगाव.

   मागील पाच वर्षात कोपरगाव कोपरगाव मतदारसंघासह कोपरगाव शहराच्या विकासाला आकार देतांना आ.काळे यांनी विकासाच्या बाबतीत कोपरगाव शहराच्या विकासाच्या मुलभूत समस्या सोडविल्या असल्याचा दावा केला आहे.त्यांच्या पाठपुराव्यातून २ कोटी २१ लक्ष रुपये निधीच्या विकास कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.या निधीतून कोपरगांव नगरपरिषद हद्दवाढ भागातील कर्मवीर नगर मधील गुजराथी घर ते अग्रवाल घर रस्ता काँक्रिटीकरण करणे (०८.५६) लक्ष,प्रभाग क्र.१ मध्ये आर.जे.भागवत घर ते ज्ञानेश्वर घर ते मोबीन घर खड़की रोड रस्ता काँक्रिटीकरण करणे (२६.६९) लक्ष, राजु काळे घर ते ३ लक्ष्मीआई मंदिर परिसर भूमिगत गटार बांधकाम करणे (२४.७२) लक्ष, लांडगे घर ते खडकी रोड परिसर भूमिगत गटार करणे(०४.९०) लक्ष, अनिल कुदळे घर ते राजु काळे घर भूमिगत गटार करणे(०९.९४) लक्ष,समतानगर भागात अनिल गाडे घर ते पारधी घर गटार बांधकाम करणे व अंतर्गत रोड क्रॉसिंग करणे (०४.९९)लक्ष,आकार रेसिडन्सी ते जानवी किराणा स्टोअर्स भूमिगत गटार करणे (२२.८९) लक्ष, साईलक्ष्मीनगर ते खडकी रस्ता  खडीकरण करणे (१०.१६) लक्ष,रज्जाक भाई घर ते मोबीन खान घरापर्यंत भुयारी गटार बांधकाम करणे(०८.५०) लक्ष, प्रभाग क्र.२ मध्ये सादिकभाई शेख घर ते पगारे घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करणे (०७. ५९) लक्ष,प्रभाग क्र.६ मध्ये कोपरगांव नगरपरिषद हद्दीतील एस.जी.विदयालयासमोर पेव्हींग ब्लॉक बसविणे (००.८५) लक्ष, प्रभाग क्र.८ मध्ये भगवती कॉलनी मधील दत्तात्रय गवळी घर ते भगवान पितळे घर पेव्हींग ब्लॉक बसविणे (४०.०३ लक्ष), प्रभाग क्र.१० मध्ये राजु लोखंडे घर ते ठोंबरे घर भूमिगत गटार करणे (०९. ९०) लक्ष,जिल्हा परिषद विश्रामगृह परिसर वायखिंडे घर ते संदीप मेढे घर रस्ता कॉक्रीटीकरण करणे व भूमिगत गटार करणे(१६. ३३) लक्ष, प्रभाग क्र.६ मध्ये नगरपरिषद इमारतीच्या बाजूने सोलिंग व कॉक्रीट करणे (०९. ९९) लक्ष, प्रभाग क्र.९ मध्ये सुपेकर घर ते भारती घर व प्रभाग क्र.२ मध्ये पटेल घर ते येवला रस्ता गटार बांधकाम करणे (०४.९८) लक्ष,कोपरगांव नगरपरिषद हद्दीतील मालकीचे माधव बागेत कारंजाचे बांधकाम व इतर अनुषंगीक कामे करणे,(०९.९९) लक्ष इत्यादी कामांचा समावेश आहे.

   दरम्यान या कामांच्या निविदा प्रसिद्ध होवून कामांना सुरुवात होणार आहे.त्यामुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासातून मोठा दिलासा मिळणार आहे.पाठपुराव्याची दखल घेवून २ कोटी २१ लक्ष रुपये निधीच्या विकास कामांना प्रशासकीय मान्यता दिल्याबद्दल आ.काळे यांनी यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांचे आभार मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close