जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगाव नजीक अपघात,एक ठार

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरानजीक असललेल्या नगर-मनमाड राज्य मार्गावर अपना हॉटेल समोर कोपरगाव कडून नाटेगावकडे जाणाऱ्या दुचाकीस (क्रं.एम.एच.१७ सी.जे.६००८) हिस अशोक लेलंड कंपनीचा डंपरने (क्रं.ए. पी.२६ टी. एल.५७५७) दिलेल्या धडकेत दुचाकीवरील इसम बाबुराव किसन मोरे (वय-६५) हे गंभीररित्या जखमी होऊन त्यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांचे निधन झाले आहे.अपघातानंतर डंपर चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.

कोपरगावातून मनमाड कडे जाणारा राज्यमार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून या मार्गावरील खड्डे अद्याप बुजविण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाला वेळ मिळालेला नाही.हा राज्य मार्ग की राष्ट्रीय मार्ग या नमनालाच घडाभर तेल वाया घालण्याचे काम हा विभाग व त्या खात्याचे मंत्री गत बारा-तेरा वर्षांपासून करत आहे.या मार्गावर वर्तमानात अपघातांची मालिका सुरु असून जीवित व वित्तीय हानी मोठ्या प्रमाणावर सुरु आहे.अशीच घटना नुकतीच घडली आहे.

या बाबतचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगावातून मनमाड कडे जाणारा राज्यमार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून या मार्गावरील खड्डे अद्याप बुजविण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाला वेळ मिळालेला नाही.हा राज्य मार्ग की राष्ट्रीय मार्ग या नमनालाच घडाभर तेल वाया घालण्याचे काम हा विभाग व त्या खात्याचे मंत्री गत बारा-तेरा वर्षांपासून करत आहे.या मार्गावर वर्तमानात अपघातांची मालिका सुरु असून जीवित व वित्तीय हानी मोठ्या प्रमाणावर सुरु आहे.अशीच घटना नुकतीच घडली असून आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास दुचाकीस्वार मयत बाबूराव मोरे हे आपले काम आटोपून कोपरंगावकडून आपल्या गावाकडे नाटेगाव कडे जात असताना मागील डाव्या बाजूने भरधाव वेगाने वरील क्रमांकाचा डंपर चालकाने मयताच्या दुचाकीस जोराची धडक दिली आहे.त्यात ते गंभीर जखमी झाले आहे.त्यांना नजीकच्या नागरिकांनी जनार्दन स्वामी हॉस्पिटल येथे उपचारार्थ भरती केले असता तेथे उपचार सुरु असताना त्यांचे निधन झाले आहे.या प्रकरणी त्यांचा मुलगा पंकज बाबुराव मोरे (वय-२७) यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणी पोलीस निरीक्षक यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.

कोपरगाव शहर पोलिसानी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.८४५/२०२० भा.द.वि.कलम ३०४ (अ),२७९,३३७,३३८,४२७,मोटर वाहन कायदा कलम १८४/१७७ प्रमाणे फरार अज्ञात डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.आर.पी.पुंड हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close