सण-उत्सव
शिर्डीत…या विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
शिर्डी शहराच्या पूर्वेस हाकेच्या अंतरावर असलेल्या श्री साई श्रद्धा ग्रामीण मुक बधिर विद्यालय(निवासी) येथे ७५ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला आहे.
१५ ऑगष्ट हा स्वातंत्र्य दिन भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे.ब्रिटिश साम्राज्यापासून दिनांक १५ ऑगस्ट इ.स. १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. हा भारतातील एक राष्ट्रीय सण आहे. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो तसा तो देशभर साजरा केला जातो.शिर्डीतही तो साजरा अकरण्यात आला आहे.
१५ ऑगष्ट हा स्वातंत्र्य दिन भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे.ब्रिटिश साम्राज्यापासून दिनांक १५ ऑगस्ट इ.स. १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. हा भारतातील एक राष्ट्रीय सण आहे. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो.देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण,मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.यावर्षी तर अमृत महोत्सव संपन्न होत आहे.त्यामुळे त्याला वेगळे महत्व प्राप्त झाले आहे.या वर्षी देशभर हा उत्सव संपन्न झाला आहे.शिर्डीतही हा दिन श्री साई श्रद्धा ग्रामीण मूक बधिर विद्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.
सदर प्रसंगी ध्वजारोहण विद्यालय संस्थापक,मुख्याध्यापक माधवराव चौधरी यांचे शुभहस्ते करण्यात आले.कार्यक्रम अध्यक्षस्थानी महिला मंडळाच्या सरचिटणीस वैशाली चौधरी ह्या उपस्थित होत्या.
“विविधतेतून राष्ट्रीय एकात्मता आपल्या देशात नांदावी यादृष्टीने सर्वांनी प्रयत्नशील असावे” असे विचार आपल्या मनोगतातून विद्यालय संस्थापक माधवराव चौधरी यांनी व्यक्त केले.तसेच कोरोना संसर्गामुळे विद्यार्थ्यांविना स्वातंत्र्य दिन साजरा होत असल्याचे दुःख त्यांनी व्यक्त केले.ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर विद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.तसेच प्रवेशित मुक-बधीर दिव्यांग विद्यार्थ्यांच्या विविध गटात ऑनलाईन चित्रकला,मुकाभिनय, मुक अभिनयातून राष्ट्रगीत गायन,वेशभूषा,देशभक्तीर निबंध यांसारख्या स्पर्धा घेण्यात आल्या. कोरोना संसर्गामुळे विद्यार्थी घरी असले तरी ऑनलाईन स्पर्धा घेऊन विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात आले.
कार्यक्रम प्रसंगी विद्यालय-वसतिगृह सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.सूत्रसंचलन श्री सोळसे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार श्री ढवळे यांनी मानले.