जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात स्वातंत्र्यदिन उत्साहात संपन्न

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या ७५ व्या वर्धापन दिनाच्या निमित्त आज कोपरगाव तहसील कार्यालयाच्या प्रांगणात आज कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे यांच्या हस्ते तर आ.काळे यांच्या प्रमुख उपस्थित तर कोपरगाव पंचायत समितीत सभापती पौर्णिमा जगधने यांच्या हस्ते तर कोपरगाव नगरपरिषदेसमोर नगरपरिषद कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष राजेश गाढे यांच्या हस्ते तर नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या प्रमुख उपस्थितीत तर कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे.यावेळी तालुका कृषी विभागाच्याव वतीने रानभाजी महोत्सव आयोजित करण्यात आला होता.त्याचा नागरिकांनी लाभ घेतला आहे.

कोपरगाव पंचायत समितीत सभापती पौर्णिमा जगधने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आहे.त्या वेळी उपासभापती अर्जुन काळे,गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी,पंचायत समिती सदस्य रोहिदास होन,अनिल कदम,मधुकर टेके,श्रावण आसने,सुनीता संवत्सरकर,अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.

१५ ऑगष्ट हा स्वातंत्र्य दिन भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून दिनांक १५ ऑगस्ट इ.स. १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. हा भारतातील एक राष्ट्रीय सण आहे. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.यावर्षी तर अमृत महोत्सव संपन्न होत आहे.त्यामुळे त्याला वेगळे महत्व प्राप्त झाले आहे.या वर्षी देशभर हा उत्सव संपन्न झाला आहे.कोपरगाव अपवाद नाही.कोपरगावात तहसीलदार योगेश चंद्रे यांनी ध्वजारोहण संपन्न झाले आहे.त्या वेळी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भरत नागरे यांनी सलामी दिली आहे.त्यावेळी आ.काळे,संजीवनीचे अध्यक्ष बिपीन कोल्हे,नगराध्यक्ष विजय वाहाडणे,मुख्याधिकारी शांताराम गोसावी,गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी,कर्मवीर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव,आजी माजी नगरसेवक पदाधिकारी आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

तहसील कार्यालयासमोर साजरा झालेल्या स्वातंत्र्य दिनानिमित्त तालुका कृषी विभागाने रानभाज्या महोत्सव साजरा केला त्याचे छायाचित्र.

कोपरगाव नगरपरिषदेत कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष राजेश गाढे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले आहे.त्यावेळी नगरपरिषदेस स्वच्छता अभियानात पश्चिम विभागातील सहा राज्यात सतरावा क्रमांक प्राप्त केल्याबद्दल सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला आहे.

सदर प्रसंगी उपनगराध्यक्ष आरिफ कुरेशी,मुख्याधिकारी शांताराम गोसावी,गटनेते रवींद्र पाठक,नगरसेवक संदीप वर्पे,विविध पक्षाचे नगरसेवक,अधिकारी,कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.अध्यक्ष विजय वहाडणे,मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले आहे.कार्यक्रमाचे प्रास्तविक उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे यांनी तर उपस्थितांना शुभेच्छा नगराध्यक्ष विजय वहाडणे,मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी केले तर आभार महारुद्ध गालट यांनी मानले आहे.

कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी तर तालुका पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आहे.त्यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड,पोलीस उपनिरीक्षक भरत नागरे यांचेसह अधिकारी कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.

कोपरगाव भाजप वसंत स्मृतीच्यावतीने ध्वजारोहण कलाकार किरण परिख यांच्या हस्ते अकरण्यात आले तर यावेळी प्रमुख उपस्थिती नगराध्यक्ष विजय वहाडणे,शहराध्यक्ष विनायक गायकवाड,चेतन खुबाणी,वसंत जाधव,संजय कांबळे,अन्य स्वयंसेवक हजर होते.

दरम्यान तालुक्यातील विविध सहकारी,सामाजिक संस्था यांच्यावतीने मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला आहे.मात्र गर्दी न करता सरकारी आदेशाचे पालन करत मर्यादित नागरिकांची उपस्थिती सुरक्षित अंतर राखून करण्यात आला आहे.

दरम्यान भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने टिळकनगर येथे संविधान चौकात छत्रपती शाहू महाराज वाचनालयाचे उदघाटन कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वाहाडणे यांच्या हस्ते करण्यात आले.त्यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे,उपनगराध्यक्ष आरिफ कुरेशी,नगरसेविका वर्षा शिंगाडे,संविधान चौकाचे अध्यक्ष नितीन शिंदे,तौफिक मणियार,जिल्हाध्यक्ष सुनील जगताप,नानासाहेब जगताप,अड्.नितीन पोळ,राजेंद्र उशिरे,रंगनाथ मरसाळे, शंकर घोडेराव,सुनील जाधव,सचिन अहिरे आदीं मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close