जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

ना.म.प्रकल्प अधिकारी-कार्यकर्ते यांच्यात खडाजंगी,कोपरगावातील घटना

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

कोपरगाव शहरातील गौतम सहकारी बँकेच्या सभागृहात कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांनी नांदूर मधमेश्वर प्रकल्पाच्या भूसंपादनाचे धनादेश वाटप प्रसंगी आयोजित केलेल्या बैठक पूर्व कार्यक्रमात नुकतेच भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले जेष्ठ कार्यकर्ते व जलतज्ज्ञ राजेंद्र खिलारी व नांदूर मधमेश्वर प्रकल्प अधिकारी यांच्यात फोन उचलण्यात केलेल्या हयगयीवरून खडाजंगी झाल्याचे दिसून आले आहे.त्याला अधिकाऱ्यांनी गोलगोल उत्तरे देऊन टोलवाटोलवी केल्याचे माध्यमासमक्ष दिसून आले आहे.त्यामुळे तालुक्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत खळबळ उडाली आहे.

“कोपरगाव तालुक्यातील मतदारांनी निवडून देऊनही पाच आधी पंचवीस व नंतरची पाच अशी तीस वर्षे निवडून देऊनही नांदूर मध्यमेश्वर प्रकल्पाच्या भूसंपदानाची प्रक्रिया पूर्ण करता आली नाही व आज आम्ही या पूर्व भागातील शेतकऱ्यांना भूसंपादन मोबदला मिळवून दिला आहे तरी काही मंडळी श्रेय घेण्याचा अयशस्वी प्रयत्न करत असल्या”बद्दल कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांनी माजी आ.स्नेहलता कोल्हे यांचे नाव न घेता हास्य मुद्रा करत नेहमीप्रमाणे टीका केली आहे.

नांदूर मध्यमेश्वर मराठवाडा जलद कालवा विभागासाठी वितरीका क्रं.२ साठी भूसंपादीत जमिनीच्या ३५० शेतकऱ्यांच्या ८.७१ कोटी पैकी २२शेतकऱ्यांचे २.१७ कोटीं रुपयांच्या पहिल्या हप्त्यांचे २२ शेतकऱ्यांचे धनादेश वाटप कार्यक्रम आज दुपारी ३ वाजता आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते संपन्न झाले त्या बैठकीला तीन वाजेच्या वेळ आमदार महोदयांनी दिला होता.मात्र त्यांना तब्बल एक तास उशीर झाला त्यावेळी माध्यमांचे प्रतिनिधी व कार्यकर्ते,प्रकल्प बाधित शेतकरी व अधिकारी उपस्थित होते.त्या वेळी हा दुर्दैवी तमाशा सर्वांना पाहायला मिळाला आहे.

या संबंधी आमच्या प्रतिनिधीने राजेंद्र खिलारी यांचेशी संपर्क साधला असता व त्याचे कारण जाणून घेतले असता त्यांनी,”गत पंधरा दिवसापूर्वी याच विषयावर आपण नांदूर मधमेश्वर प्रकल्पाचे चाऱ्यांचे भूसंपादनाचा गत सतरा वर्षांपासून मोबदला मिळालेला नाही.याचा आपण सातत्याने पाठपुरावा करत आहे.गत पंधरवड्यात याच ठिकाणी आपण या अधिकाऱ्यांची बैठक कोपरगावचे आ.काळे यांचे उपस्थितीत आयोजित केली होती.त्या वेळी या अधिकाऱ्यांनी या बाधित शेतकऱ्यांना जलद भूसंपदांचा मोबदला देऊन आश्वासन देऊनही कृती करण्यास टाळाटाळ केली होती.त्यासाठी दुरुस्त प्रस्ताव दाखल करावयाचे होते.त्या साठी आपण दि.११ ऑगष्ट रोजी दुपारी चार ते पाच वाजेच्या सुमारास संबंधित विभागाचे उपविभागीय अधिकारी डी.पी.पाटील व बी.आर.वारकर यांचेशी वारंवार सम्पर्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला मात्र अधिकाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत त्याला दाद दिली नाही.की वेळ मिळाल्यावर उत्तरही दिले नाही.लघु संदेश देऊनही उत्तर दिले नाही.त्यामुळे सभागृहात आलेल्या खिलारी यांचा पारा चढलेला होता,त्यात त्यांनी अधिकाऱ्यांशी चांगलाच पंगा घेतला मात्र तरीही अधिकाऱ्यांनी त्यांचा तळमळीचा मुद्दा हसल्यावारी व टोलवाटोलवी करण्यावारी नेला असल्याचे दिसून आले आहे.त्यामुळे त्यांचा पारा टोकाचा चढल्याचे दिसून आले आहे.”अधिकाऱ्यांनी तुम्ही परत फोन का केला नाही”अशी सारवासारव करता त्यांनी,”आपण पुन्हा तुम्हाला फोन करणार नाही”अशी भीष्मप्रतिज्ञा त्यांनी केली आहे.याबाबत त्यांना,”आपण आ.काळे यांचे समोर हा मुद्दा का उपस्थित केला नाही” असा सवाल आमच्या प्रतिनिधीने उपस्थित केला असता त्यांनी ‘तो’ घटनेच्या दिवशीच त्यांच्या व त्यांच्या अर्धा डझन स्वियसहाय्यकांच्या निदर्शनास आणून दिला असल्याचे सांगितलें आहे.त्यामुळे अधिकारी सत्त्ताधारी कार्यकर्त्याना जुमानत नसल्याचे दुर्दैवाने दिसून आल्याने तालुक्यात उलटसुलटच चर्चेला उधाण आले आहे.कोपरगाव तहसील कार्यालयातही कार्यकर्त्यांना असाच अनुभव येत असल्याचे अनेकांनी निदर्शनास आणून दिले आहे.त्यामुळे सत्त्ताधारी पक्षाचे लोकप्रतीनिधी काय कार्यवाही करणार ? असा सवाल निर्माण झाला आहे.

सलग तीस वर्ष निवडून देऊनही प्रश्न सोडवता आला नाही ते श्रेयाला सर्वात पुढे-आ.काळेंची माजी आ.कोल्हेंवर टीका

दरम्यान हि बैठक एक तास उशिराने सुरू झाल्यावर आ.काळे यांनी,”कोपरगाव तालुक्यातील मतदारांनी निवडून देऊनही पाच आधी पंचवीस व नंतरची पाच अशी तीस वर्षे निवडून देऊनही नांदूर मध्यमेश्वर प्रकल्पाच्या भूसंपदानाची प्रक्रिया पूर्ण करता आली नाही व आज आम्ही या पूर्व भागातील शेतकऱ्यांना भूसंपादन मोबदला मिळवून दिला आहे तरी काही मंडळी श्रेय घेण्याचा अयशस्वी प्रयत्न करत असल्या”बद्दल कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांनी माजी आ.स्नेहलता कोल्हे यांचे नाव न घेता हास्य मुद्रा करत नेहमीप्रमाणे टीका केली आहे.व अधिकाऱ्यांनी उर्वरित शेतकऱ्यांचे भूसंपादन प्रक्रियेचे प्रस्ताव पूर्ण करून पाठवून दयावे आवाहन केले आहे.पुढे बोलताना त्यांनी “श्रेय कोणीही घ्या आपल्याला त्याचे काही सोयरसुतक नाही,शेतकऱ्यांना मोबदला मिळणे गरजेचे वाटते” असे सांगून त्यांनी लौकीच्या शेतकऱ्यांनी यात मागे राहू नये असे खास (!) आवाहनही त्यांनी शेवटी केले आहे.

सदर प्रसंगी कर्मवीर काळे सहकारी कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर,राजेंद्र खिलारी,पंचायत समिती सदस्य मधुकर टेके,बाळासाहेब जाधव,शिवाजी शेळके,नांदूर माध्यमेश्वर प्रकल्पाचे उपअभियंता डी.पी.पाटील,शाखा अभियंता एस.पी.पवार,बाळासाहेब वारकर,आदीसह बहुसंख्य शेतकरी व मान्यवर उपस्थित होते.त्यावेळी शेतकरी बाळासाहेब जाधव यांनी आ.काळे यांनी या प्रकल्पबाधितांच्या जमिनीचा मोबदला मिळवून दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

उपस्थितांचे स्वागत डॉ.अनिरुद्ध काळे यांनी तर आभार युवा तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष चारुदत्त सिनगर यांनी आभार मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close