पाणी पुरवठा योजना
कोपरगाव पाणी पुरवठा योजनांत हलगर्जी पणा नको-इशारा

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव मतदार संघात सुरू असलेल्या अनेक गावातील रेंगाळलेल्या पाणी पुरवठा योजनांचे काम तातडीने पूर्ण करा.ज्या पाणी पुरवठा योजनांची कामे सुरू झाली नाहीत ती कामे तातडीने सुरू करा.कामात हयगय नको,ती झाल्यास कोणत्याही अधिकाऱ्याची गय केली जाणार नाही असा ईशारा आ.आशुतोष काळे यांनी आज कोपरगाव पंचायत समितीच्या सभागृहात संपन्न झालेल्या बैठकीत दिला आहे.
“रेंगाळलेल्या पाणी पुरवठा योजनांच्या कामांना गती देवून सुरळीतपणे कामे सुरू करा.कामांची गुणवत्ता कार्यारंभ आदेशाप्रमाणे होत असल्याची वेळच्या वेळी खात्री करा.ज्या पाणी पुरवठा योजनांच्या काम पुर्ततेचे आदेश देवून देखील अद्याप काम सुरू झाले नाही त्या ठेकेदारांना तातडीने नोटिसा देवून लवकरात काम सुरू करा”-आ.आशुतोष काळे,कोपरगाव.
कोपरगाव मतदार संघातील अनेक गावात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व जिल्हा परिषद अंतर्गत सुरू असलेल्या पाणी पुरवठा योजनांच्या कामाचा आढावा आ.काळे यांनी आज दुपारी ४.३० वाजता संपन्न झालेल्या बैठकीत घेतला त्यावेळी ते बोलत होते.
सदर प्रसंगी प्रशासक तथा गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष दिलीप बोरनारे,संचालक सुधाकर रोहोम,राहुल रोहमारे,अनिल कदम,श्रावण आसने,जिनिंग प्रेसिंग सोसायटीचे अध्यक्ष गोरक्षनाथ जामदार,पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुन काळे,माजी सदस्य मधूकर टेके,महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा,गौतम बँकेचे संचालक राजेंद्र औताडे,नंदकिशोर औताडे,गोपीनाथ रहाणे,सुनील कुहिले,नानासाहेब नेहे,महेंद्र वक्ते,बापूसाहेब वक्ते,महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी प्रशांत कदम,शेखर मिटकरी,पंचायत समिती बांधकाम विभागाचे संतोष दळवी,बाळासाहेब साबळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता चांगदेव लाटे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
त्यावेळी वेळी त्यांनी पुढे बोलताना म्हटले आहे की,”रेंगाळलेल्या पाणी पुरवठा योजनांच्या कामांना गती देवून सुरळीतपणे कामे सुरू करा.कामांची गुणवत्ता कार्यारंभ आदेशाप्रमाणे होत असल्याची वेळच्या वेळी खात्री करा.ज्या पाणी पुरवठा योजनांच्या काम पुर्ततेचे आदेश देवून देखील अद्याप काम सुरू झाले नाही त्या ठेकेदारांना तातडीने नोटिसा देवून लवकरात काम सुरू करा.सर्व नागरिकांना नळाच्या माध्यमातून पाणी पोहोचेल योजनेचा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून वाड्या वस्त्यांवरील नागरिकांना नळाद्वारे कायमस्वरूपी पाणी पुरवठा होईल अशा पद्धतीने नियोजन करून पाणी पुरवठा योजनांचे काम लवकरात लवकर पूर्ण करा अशा सूचना दिल्या आहेत.