जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
विशेष लेखमाला

……होता ‘अजित’ म्हणून वाचला ‘आशुतोष’

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

कोपरगाव साठवण तलावाची नुकतीच मंजूर झालेली १३१.२४ कोटींच्या निविदा व ३.३२ द.ल.घ.फूट पाणी मंजुरीला खो घालण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात माजी आ.कोल्हे गटाच्या समर्थकांनी दाखल झालेली जनहित याचिकेच्या सुनावणीस औरंगाबाद खंडपीठाने स्थगिती देतादेता निळवंडे कालवा कृती समितीचे वकील अजित काळे यांनी महत्वपूर्ण भूमिका निभावल्याने होता ‘अजित’ म्हणून वाचला ‘आशुतोष’ असे म्हणण्याची वेळ आली असून अड्.काळे यांच्या संकटमोचक भूमिकेचे सर्वत्र एक कौतुक होत आहे.

कोपरगावचा १३१.२४ कोटींचा साठवण तलाव व ३.३२ द.ल.घ.मी.पाणी मंजुरीस स्थगिती देण्याचा निर्णय जवळजवळ झाला होता.मात्र याबाबत त्वरित या बाबतची माहिती निळवंडे कालवा कृती समितीचे प्रसिद्ध वकील अजित काळे यांच्या हि बाब लक्षात आणून दिली होती.व त्यांनी तातडीने याबाबत दुपारच्या सत्रात या याचिकेत हस्तक्षेप केला व हा प्रश्न आपल्याशी सम्बधित असल्याचे न्यायालयाचें निदर्शनास आणून दिले होते.त्यामुळे त्यांचे म्हणणे संपूर्ण ऐकूण घेतले होते.व त्यावर न्यायालयाने आपले मत बदलले व स्थगिती देण्याचा निर्णय बदलला होता.

कोपरगाव शहराचा पाणीप्रश्न कायमचा सोडविण्यासाठी कोपरगावच्या माजी लोकप्रतिनिधीने शहर व तालुक्याची गत साडेसात वर्ष दिशाभूल सुरु ठेवली होती.निळवंडे प्रकल्पाचे बंदिस्त जलवाहिणीचे पाणी परवडणारे नसताना नागरिक व महिलांना “फुकट पाणी-फुकट पाणी” म्हणून लिफ्टिंग पाणी गळ्यात मारण्याचा अनास्था प्रसंग कोपरगावकरांवर गुदरला होता.त्यामुळे सन-२०१६ च्या अंदाज पत्रकानुसार सुमार सुमारे अडीच कोटी रुपयांचे विद्युत बिल शहर वासीयांच्या माथ्यावर मारले जाणार होते.(आजच्या हिशेबाने ते वर्षाकाठी जवळपास चार कोटींवर गेलेले आहे.) आज याच पालिकेची प्रवाही सिंचन पद्धतीने पाणी मिळत असताना सुमारे दहा कोटी रुपयांची जलसंपदा विभागाची थकबाकी आहे अशा स्थितीत हा बंदिस्त जलवाहिणीचा ‘पांढरा हत्ती’ पोसण्याचा आग्रह का धरला जात होता.याचे उत्तर नागरिकांना माहिती आहे.कोपरगाव बस स्थानकाचे कामाचे कमिशन कोणाच्या खिशात गेले आहे.परिणाम स्वरूप या कामाची आज उदघाटनापूर्वीच काय स्थिती झाली हे बस स्थानकावर गेल्यावर कोणाही सामान्य माणसाच्या लक्षात आल्या शिवाय राहणार नाही
असो.

निळवंडे बंदिस्त जलवाहिणीसाठी अकोले,संगमनेर,कोपरगाव,राहता तालुक्यातील सुमारे छत्तीस गावातील बंदिस्त जलवाहिनी मार्गावरील आवश्यक भूसंपादन व वीज बिलाची तरतूद व देखभाल करणेची जबाबदारी निश्चित झालेली नव्हती हे विशेष ! या बाबत निळवंडे कालवा कृती समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे अध्यक्ष रुपेंद्र काले व त्यांच्या समितीच्या दुष्काळी सहकाऱ्यांनी रस्त्यावर लढा देण्याबरोबरच उच्च व थेट दिल्ली सर्वोच्च न्यायालयापर्यंत चिवट लढा दिलेला आहे.व कोपरगाव शहराला पाणी देणे कसे असंयुक्तीक आहे हे यांनी आमच्या प्रतिनिधीने वेळोवेळी सप्रमाण हे ‘जनशक्ती न्यूजसेवा’ या पोर्टलवर सविस्तर मालिका लिहून व त्या संबंधी कागदपत्रे प्रसिद्ध करून सिद्ध केले आहे.त्यास नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला होता. व ‘जनशक्ती न्यूजसेवा या पोर्टल’चे निळवंडे कालवा कृती समितीचे मोट्या प्रमाणावर कौतुक केले होते.

तत्कालीन नगराध्यक्ष विजय वहाडणे,माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे यांचा साठवण तलावासाठी आग्रह होताच.पण वर्तमान काळ विकास योजनांसाठी डोळे झाकून नेत्यांवर विश्वास ठेवण्याचा नाही,पुढारी आपल्या निवडणुका काढण्यासाठी किती काळ त्या प्रकल्पाचा वापर करतील याचा भरवसा राहिलेला नाही.म्हणून सज्ञान कार्यकर्त्यांनी सदर प्रकल्प मार्गी लावण्यासाठी समांतर व्यवस्था निर्माण करावी लागते तरच तो प्रकल्प वेळेत मार्गी लागतो.असा पाठपुरावा शहरातील कार्यकर्ते राजेश मंटाला,तुषार विध्वंस,सेनेचे तिरोडी संपर्क प्रमुख प्रवीण शिंदे आदींनी केला म्हणून साठवण तलाव वेळेत मार्गी लागला हे वास्तव नाकारता येणार नाही.

या मालिकेची व या योजनेची फसवी घोषणा नागरिकांबरोबर कोपरगावचे नूतन आ.आशुतोष काळे यांच्याही लक्षात आली होती.त्यामुळे त्यांनी निवडून आल्या-आल्या आपले कौशल्य व राजकीय वजन वापरून तातडीने राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधून कोपरगाव साठवण तलावाचे कामास गती देण्याचा निर्णय घेतला व तो वास्तवाशी जुळणारा होता.त्यामुळे त्यांच्या या कामाचे आमच्या ‘जनशक्ती न्यूजसेवा पोर्टल’ने कौतुक केले आहेच.त्यांनी व तत्कालीन नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून लगेच माती उचलण्याचा निर्णय घेतला होता.त्यासाठी माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे यांचा आग्रह होताच.पण वर्तमान काळ विकास योजनांसाठी डोळे झाकून नेत्यांवर विश्वास ठेवण्याचा नाही,पुढारी आपल्या निवडणुका काढण्यासाठी किती काळ त्या प्रकल्पाचा वापर करतील याचा भरवसा राहिलेला नाही.म्हणून सज्ञान कार्यकर्त्यांनी सदर प्रकल्प मार्गी लावण्यासाठी समांतर व्यवस्था निर्माण करावी लागते तरच तो प्रकल्प वेळेत मार्गी लागतो.असा पाठपुरावा शहरातील कार्यकर्ते राजेश मंटाला,तुषार विध्वंस,सेनेचे तिरोडी संपर्क प्रमुख प्रवीण शिंदे आदींनी केला म्हणून साठवण तलाव वेळेत मार्गी लागला हे वास्तव नाकारता येणार नाही.परिणामस्वरूप त्यासाठी पुढे जाऊन आ.काळे यांनी या साठवण तलावासाठी अल्पावधीत १३१.२४ कोटींची आर्थिक तरतूद केली.व ३.३२ द.ल.घ.मिटरची वाढीव पाणी मंजुरी दारणा धरणातून मिळवली आहे.मात्र आपले (आर्थिक फायद्याचे ) मुसळ केरात जाणार व आपण उघडे पडणार हे उघड होताच माजी लोकप्रतिनिधीने या बाबत आकाश पाताळ एक करण्यास सुरुवात केली होती.त्या अस्वस्थतेतून त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातून स्थगिती आणण्याचा ब्राम्हणगाव व धारणगाव येथील हस्तकामार्फत प्रयत्न केला होता. त्याची सुनावणी नूकतीच ०२ मे २०२२ रोजी पार पडली आहे.त्या वेळी पहिल्या सत्रात न्यायालयाने बाजू ऐकून या कोपरगाव शहराच्या पाणी मंजुरीस व साठवण तलावास स्थिगिती देण्याची तयारी केली होती.किंबहुना तसे जवळजवळ ठरले होते. तसे चित्र निर्माण झाले होते.मात्र निळवंडे कालवा कृती समितीचे काही हितचिंतक त्या ठिकाणी उपस्थित होते.त्यांनी याबाबत त्वरित या बाबतची माहिती निळवंडे कालवा कृती समितीचे प्रसिद्ध वकील अजित काळे यांच्या हि बाब लक्षात आणून दिली होती.व त्यांनी तातडीने याबाबत दुपारच्या सत्रात या याचिकेत हस्तक्षेप केला व हा प्रश्न आपल्याशी सम्बधित असल्याचे न्यायालयाचें निदर्शनास आणून दिले होते.त्यामुळे त्यांचे म्हणणे संपूर्ण ऐकूण घेतले होते.व त्यावर न्यायालयाने आपले मत बदलले व स्थगिती देण्याचा निर्णय बदलला होता.हे उपस्थित असणाऱ्यांना सर्वांना माहिती आहे.मात्र श्रेयवादाच्या या लढाईत प्रसिद्धी माध्यमे हाताशी नसल्याने नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी शहरात मोठ्या प्रमाणावर विकास कामे करूनही त्यांच्यावर उपेक्षा आली तीच वेळ निळवंडे कालवा कृती समिती व त्यांच्या वकिलांची झाली असे म्हटले तर वावगे वाटू नये.

शिव चरित्रात अफजलखानाच्या वधाच्या वेळी प्रतापगडावर घडलेला प्रसंग अनेकांनी वाचला असेल.अफझलखान तेंव्हा वाईजवळ आला तेव्हा शिवाजीराजांनी सध्याच्या महाबळेश्वरजवळ असलेल्या प्रतापगडावरून त्यास तोंड देण्याचे ठरवले.तहाची बोलणी सुरू झाली आणि अंतिम बोलणीसाठी शिवाजी महाराजांनी स्वतः यावे असा अफझलखानचा आग्रह होता.पण शिवाजीराजांच्या वकिलांनी (पंताजी गोपीनाथ बोकील यांनी) अफझलखानाला गळ घालून प्रतापगडावरच भेट घेण्यास बोलावले.भेटीच्या नियमांनुसार दोन्ही पक्षांकडील मोजकीच माणसे भेटीसाठी येतील आणि दरम्यान सर्वांनी निःशस्त्र राहण्याचे ठरले होते.
शिवाजीराजांना अफझलखानच्या दगाबाजपणाची कल्पना होती.एका दशकापूर्वी खानाने अशाच एका भेटीमध्ये एका हिंदू सरदाराला कैद केले होते.त्यामुळे त्यांनी सावधगिरी म्हणून चिलखत चढविले आणि सोबत बिचवा तसेच वाघनखे ठेवली.बिचवा चिलखतामध्ये दडविला होता तर वाघनखे हाताच्या पंजाच्या आतमध्ये वळविलेली असल्यामुळे दिसणारी नव्हती.शिवाजी महाराजांसोबत ‘जिवा महाला’ हा विश्वासू सरदार होता तर अफझलखानसोबत ‘सय्यद बंडा’हा तत्कालीन प्रख्यात असा दांडपट्टेबाज होता.प्रतापगडावरील एका छावणीमध्ये भेट ठरली.भेटीच्या वेळी उंचपुऱ्या,बलदंड अफझलखानाने शिवाजी महाराजांना मिठी मारली आणि शिवाजीराजांचे प्राण कंठाशी आले.त्याच वेळी अफझलखानने कट्यारीचा वार शिवाजी महाराजांवर केला परंतु चिलखतामुळे शिवाजीराजे बचावले.अफझलखानाचा दगा पाहून शिवाजीराजांनी ‘वाघनखे’ खानाच्या पोटात घुसवली.त्याचबरोबर अफझलखानाची प्राणांतिक आरोळी चहूकडे पसरली.सय्यद बंडाने तत्क्षणी शिवाजीवर दांडपट्ट्याचा जोरदार वार केला जो तत्पर ‘जिवा महाला’ने स्वतःवर झेलला आणि शिवाजीराजांचे प्राण वाचले.यामुळेच “होता जिवा म्हणून वाचला शिवा” ही म्हण प्रचलित झाली होती.

असाच प्रसंग कोपरगाव तलाव व पाणी मंजुरी हि कायद्याच्या कचाट्यातून वाचविण्यात निळवंडे कालवा कृती समितीचे वकील अजित काळे यांनी या समयी कोपरगाचे आ.आशुतोष काळे यांच्या या संकटसमयी आपली विधी सेवा पुरविल्याने नवीनं म्हण,”होता अजित म्हणून वाचला आशुतोष” पडायला हरकत नाही.

अड्.अजित काळे यांना निळवंडे कालवा,धरण,गोदावरी नदी उपलब्ध पाणी खोरे आणि दारणा धरण यांचा दांडगा व पूर्ण अभ्यास,त्यांच्या पूर्ण खाचा-खोचा माहिती असल्याने अड्.अजित काळे यांची आवश्यक व तत्पर सेवा मिळाली नसती तर कायद्याच्या कटकटीत कोपरगाव शहराचा साठवण तलाव व पाणी मंजुरी अडकली असती आणि किती काळ रखडला असता हे सांगता येणे अवघड आहे.त्यांना त्यांच्या अन्य विधी सहकाऱ्यांनी मदत केली हे वेगळे सांगणे न लगे.शिवाय आगामी विधानसभा निवडणूक याच कोपरगावच्या साठवण तलावावर व पाणी प्रश्नावर लढवली जाणार आहे हे उघड आहे.व ‘तो’ प्रश्न निर्णायक आहे.म्हणून,”होता अजित म्हणून वाचला आशुतोष” म्हणायला हरकत नाही.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close