जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

पिण्याचा पाणी प्रश्न गंभीर,प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप 

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील नागरिकांना वर्तमानात गढूळ पाणी पुरवठा होत असल्याने शहरातील निवडणूक पूर्व वातावरण गढूळ होण्याची शक्यता वाढली आहे.या प्रकरणी माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी मुख्याधिकारी यांनी लक्ष घालून पाणी पूर्ववत सुरु करावे अशी मागणी केली आहे.

  

“कोपरगाव नगरपालिका सध्या आठ दिवसात पाणीपुरवठा करीत आहे त्यामुळे वर्षाकाठी केवळ ४८ दिवस पाणीपुरवठा करण्यात येतो व पाणीपट्टी संपूर्ण वर्षाची घेतली जाते या गंभीर समस्येकडे कोणीही लक्ष देत नाही व आवाज उठवताना दिसत नाही हे दुर्दैव आहे”-मंगेश पाटील,माजी अध्यक्ष,कोपरगाव नगरपरिषद.

कोपरगाव शहरातील विविध प्रभागात नुकताच करण्यात आलेला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा अतिशय गढूळ,मैला व शेवाळ युक्त असून त्यात गटारीचे काळे पाणी भेसळ झाले आहे.त्याचा अतिशय घाण वास येत असल्याने पालिका प्रशासन विरोधात नागरिक महिलांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.गेल्या दोन वर्षापासून नगरपरिषदेवर प्रशासक असल्याने कोणाचाच कोणावर वचक राहिला नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.त्यामुळे वर्तमान स्थिती उद्भवली असल्याचे बोलले जात आहे.शहरातील विविध प्रभागात सर्वच ठिकाणी अतिशय गाळयुक्त काळे पाणी वितरित करण्यात आले,आधीच शहरात मोठ्या प्रमाणावर डासांनी उच्छाद मांडलेला असताना गढूळ दूषित पाणीपुरवठा करण्यात येऊन नागरिकांचा अंत पाहण्यात येत असल्याचा आरोप केला आहे.त्यामुळे अतिसार,डेंग्यू,कावीळ,थंडी ताप,सर्दी,पडसे खोकला आदी रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर फैलावण्याची शक्यता वर्तवली जात आहे.पालिकेच्या वतीने करण्यात येणारी साफसफाई ठिकठिकाणी साचलेले कचऱ्याचे ढीग तुंबलेल्या गटारी यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.नगरपालिका सध्या आठ दिवसात पाणीपुरवठा करीत आहे त्यामुळे वर्षाकाठी केवळ ४८ दिवस पाणीपुरवठा करण्यात येतो व पाणीपट्टी संपूर्ण वर्षाची घेतली जाते या गंभीर समस्येकडे कोणीही लक्ष देत नाही व आवाज उठवताना दिसत नाही हे दुर्दैव असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील.

वर्तमानात प्रशासक म्हणून मुख्याधिकारी शांताराम गोसावी सध्या काम पाहत आहेत,त्यांच्याकडे तक्रारींचा मोठा साठा साचला असून त्याचा निपटारा होत नसल्याने व शहरातील कामे अतिशय संथ गतीने होताना दिसत आहेत.ना मुख्याधिकारी कोणत्या प्रभागात भेट देत अथवा असलेल्या समस्यांचा करीत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत,ना मुख्याधिकाऱ्यांवर कोणाचा वचक,ना मुख्याधिकाऱ्यांचा कामगारांवर वचक.मुख्याधिकारी गोसावी यांचा कोपरगावच्या प्रभागात बिलकुल लक्ष नसल्याने पेच निर्माण झाला आहे.ते येथून बदली करून घेण्याच्या तयारीत आहे.नागरिकांची निवेदने बोलून त्यांच्याशी गोड बोलून त्यांना काढून दिले जाते त्यामुळे आता या प्रश्नावर नागरिकांनी जायचे तरी कोणाकडे असा सवाल निर्माण झाला आहे.त्यासाठी निवडणूक आयोगाने त्वरित निवडणुका घेणे गरजेचे बनले असल्याचे माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी शेवटी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close