मनोरंजन
पुण्यातील …त्या प्रदर्शनास चांगला प्रतिसाद
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
पुणे येथे नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय आर्ट फेस्टिवलमध्ये कोपरगाव येथील लायन्स मूकबधिर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मांडलेल्या चित्र प्रदर्शनास उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती संस्थेच्या वतीने कळविण्यात आली आहे.
पुणे येथील पंडित फार्म कर्वेनगर येथे आंतरराष्ट्रीय चित्रकला प्रदर्शन नुकतेच आयोजित करण्यात आले होते.त्यात कोपरगाव येथील लायन्स मूक बधिर विद्यालयाने आपल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन त्यात सहभागी केले होते.या वेळी चित्रकला प्रदर्शनास सिने अभिनेते विक्रम गोखले, कलादिग्दर्शक नितीन देसाई, डॉ.एस.एस. संचेती, डिस्ट्रीक गव्हर्नर हेमंत नाईक, सुधीर गाडगीळ,,जिल्हा समाज कल्याणअधिकारी नितीन उबाळे,संस्थेचे विश्वस्त सुजित रोहमारे,विद्यालयाचे मुख्याध्यापक भास्कर गुरसळ आदींनी स्टॉलला भेट दिली आहे.बेळगाव कर्नाटक येथील राष्ट्रीय पातळीवर असलेल्या आर्ट अफेअर मॅगेझिनने सुमारे १५० स्टॉलचा सर्वे करून प्रेरणादायी स्टॉलमध्ये मूकबधिर विद्यालयाची निवड केली आहे.विद्यालयाच्या या यशाचे समाजकल्याण अधिकारी नितीन उबाळे, कलाशिक्षक रवींद्र कांबळे, अनिल गवळी, नारायण वाकचौरे, विद्यालयाचे अध्यक्ष अशोक रोहमारे सचिव संजीव कुलकर्णी शाळा समितीचे अध्यक्ष सुधीर डागा आदींनी अभिनंदन केले आहे.