कोपरगाव तालुका
कोपरगाव तालुक्यातील दीड वर्षांपासून फरारी आरोपी केला जेरबंद
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील वेळापूर ग्रामपंचायत हद्दीतील विजय अशोक ओतूरकर यांच्या मालकीचे श्रद्धा जनरल स्टोअर्स फोडून त्यातील ६ हजार ५०० रुपयांचा ऐवज घेऊन फरार झालेला आरोपी रवींद्र सुखदेव मोरे (वय-२१) हा गत एकोणाविस महिने कोपरगाव तालुका पोलिसांना हुलकावणी देत फिरत होता मात्र २८ डिसेंबर ला मिळालेल्या गोपनीय खबरीवरून पोलिसांनी संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव येथे टाकलेल्या धाडीत त्याला २८ डिसेंबर रोजी सायंकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास अटक केल्याने आता यातील दोन्ही आरोपी जेरबंद झाले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
वेळापूर ग्रामपंचायत हद्दीत विजय ओतूरकर यांचे श्रद्धा जनरल स्टोअर्स नावाचे दुकान आहे.ते दुकान बंद करून ते घरी गेले असता रात्रीच्या सुमारास टेहळणीच्या पच्छात आरोपी रवींद्र मोरे रा.वेळापूर व दुसरा आरोपी शाम नीलकंठ पिंपळे या दोघांनी फिर्यादीचे दुकान फोडून त्यातील विविध साडेसहा हजारांचा मुद्देमाल घेऊन पोबारा केला होता.
सदरचे सविस्तर वृत्त असे की, वेळापूर ग्रामपंचायत हद्दीत विजय ओतूरकर यांचे श्रद्धा जनरल स्टोअर्स नावाचे दुकान आहे.ते दुकान बंद करून ते घरी गेले असता रात्रीच्या सुमारास टेहळणीच्या पच्छात आरोपी रवींद्र मोरे रा.वेळापूर व दुसरा आरोपी शाम नीलकंठ पिंपळे या दोघांनी फिर्यादीचे दुकान फोडून त्यातील विविध साडेसहा हजारांचा मुद्देमाल घेऊन पोबारा केला होता.त्यानंतर फिर्यादी ओतूरकर यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करून गु.र.नं.८९/२०१८ असा गुन्हा नोंदवला होता.त्यानंतर कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी एक आरोपी शाम पिंपळे यास १० जुलै २०१८ रोजी अटक केली होती.मात्र दुसरा आरोपी रवींद्र मोरे पोलिसांच्या हाती तुरी देऊन फरार झाला होता. तो पासून कोपरगाव तालुका पोलीस त्यांच्या शोधात होते.मात्र तो जवळपास एकोणाविस महिने पोलिसांना गुंगारा देत होता.मात्र नुकत्याच मिळालेल्या खबरीवरून तालुका पोलिसांनी चिंचोली गुरव येथे अचानक धाड टाकल्यावर त्याचा नाईलाज झाल्यावर त्याला पोलिसांच्या हवाली होण्याशिवाय पर्याय राहिला नव्हता.पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या कारवाईतील या पथकात पोलीस नाईक एस.सी.तोर्वेकर, प्रदीप काशीद, पो.कॉ.किशोर कुलधर आदींनी लक्षवेधी कामगिरी बजावली त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.