जाहिरात-9423439946
मनोरंजन

आत्मा मालिकचे व्यवस्थापन प्रेरणादायी-दहिवडकर

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील जंगली महाराज आश्रमट्रस्ट ची आत्मा मलिक शैक्षणिक संस्था अल्पावधीत लोकप्राइय होण्याची घटना स्तंबीत करणारी असून हि संस्था अन्य राज्यातील संस्थांना प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन शिर्डी एअरपोर्टचे डेप्युटी कमांडट दिनेश दहिवडकर यांनी नुकतेच कोकमठाण येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

या प्रसंगी ध्यानयोग मिशन तथा महाराष्ट्र योगा असोशिएशचे अध्यक्ष परमानंद महाराज यांनी उपस्थितांना ध्यानाच्या माध्यमातून परमेश्वरप्राप्ती करण्याचा मार्ग सांगितला. ध्यानाच्या माध्यमातून मिळालेल्या उर्जेमुळे प्रत्येक मनुष्य असामान्य कर्तृत्व करू शकतो. त्यामुळे सर्वांनी स्वतःसाठी थोडासा वेळ काढून दररोज ध्यान करावे व परमेश्वरप्राप्ती करून घ्यावी असे यावेळी सांगितले.

कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील आत्मामालिक येथील आत्मविष्कार स्नेहसंमेलन व वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे दिनेश दहिवडकर व राजूर आदिवासी प्रकल्पाचे अधिकारी संतोष ठुबे यांचे हस्ते दिपप्रज्वलन करून पार पडले त्यावेळी ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर आत्मा मालिक माउली, परमानंद महाराज व संत मांदियाळी आश्रमाचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी, सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे, कोषाध्यक्ष विठ्ठलराव होन, विश्वस्त प्रकाश भट , प्रकाश गिरमे, बाळासाहेब गोर्डे, वंसतराव आव्हाड, माधवराव देशमुख, सर्व प्राचार्य आदि मान्यवर उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रात वर्षभरामध्ये नेत्रदिपक कामगिरी करणा-या विद्यार्थ्यांचा पालकांसमवेत गौरव करण्यात आला. यात प्रामुख्याने आत्मा मालिक ज्युनिअर काॅलेजच्या शैक्षणिक वर्ष २०१८-१९ च्या पहिल्या बॅचचे पाच विद्याथ्र्याची एमबीबीएससाठी निवड झालेली होती. या सर्व विद्यार्थ्यांचा व पालकांचा सत्कार करण्यात आला.

स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने ‘आत्मा मालिकमेळा’ चे (फुड पार्क) आयोजन करण्यात आले असून यामध्ये विविध शंभरपेक्षा जास्त पदार्थाचे तीस स्टाॅल उभारण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना आकर्षण असलेले मिकी माउस इ. सारखे खेळांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे अशी माहिती विश्वस्त प्रकाश भट यांनी दिली आहे.

या वेळी व्यासपीठावर आत्मा मालिक माउली, परमानंद महाराज व संत मांदियाळी आश्रमाचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी, सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे, कोषाध्यक्ष विठ्ठलराव होन, विश्वस्त प्रकाश भट , प्रकाश गिरमे, बाळासाहेब गोर्डे, वंसतराव आव्हाड, माधवराव देशमुख, सर्व प्राचार्य आदि मान्यवर उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रात वर्षभरामध्ये नेत्रदिपक कामगिरी करणा-या विद्यार्थ्यांचा पालकांसमवेत गौरव करण्यात आला. यात प्रामुख्याने आत्मा मालिक ज्युनिअर काॅलेजच्या शैक्षणिक वर्ष २०१८-१९ च्या पहिल्या बॅचचे पाच विद्याथ्र्याची एमबीबीएससाठी निवड झालेली होती. या सर्व विद्यार्थ्यांचा व पालकांचा सत्कार करण्यात आला.

स्नेहसंमेलनाच्या पहिल्या दिवशी आत्मा मालिक इंटरनॅशनल कॅम्पसमधील विविधि विभागांच्या विद्यार्थ्यांनी गायन, वादन, नृत्याविष्कार, निवेदन असे विविध कार्यक्रम सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.हे स्नेहसंमेलन नऊ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार असून पालकांनी आपल्या मुलांचे विविध गुणांचे अविष्कार पाहण्यासाठी उपिस्थत रहावे असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

या स्नेहसंमेलन यशस्वीतेसाठी संकुलाचे सर्व प्राचार्य व विभागप्रमुख तसेच आश्रमाचे व्यवस्थाप हिरामण कोल्हे यांचे मार्गदर्शनाखाली गोपाल कुलकर्णी, दिलीप हाडोळे, सुनिल पोकळे, साहेबराव गाढे, भगवान शेळके, सुनिल खरात, विश्वास बारवकर, नितीन शिंदे, भगवान सुर्यवंशी, किशोर कटारे, श्रीकांत बोराडे आदि परिश्रम घेत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close