जाहिरात-9423439946
मनोरंजन

कोपरगावात ‘मास्क’ चित्रपटाचे चित्रीकरण सुरु

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

कोपरगाव शहरातील शिवसेनेचे माजी शहर प्रमुख व कोपरगाव बस आगार कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष भरत मोरे यांनी चित्रपट निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकले असून त्यांच्या दुसऱ्या चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच कोपरगाव शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकात सुरु झाले आहे.त्या वेळी रस्त्याच्या दुतर्फा भल्या सकाळीच नागरिकांनी गर्दी केली होती.

ग्रामीण भागातील तरुण या क्षेत्राकडे सहसा चित्रपट निर्मिती क्षेत्रात फिरकत नाही.मात्र याला भरत मोरे हे अपवाद ठरले आहे.तसे ते मेडिकल क्षेत्रातील प्रसिद्ध नाव.व शिवसेनेचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून कोपरगाव व नगर जिल्ह्यात परिचित आहे.त्यांनी गतवर्षी ‘मसुटा’ मराठी चित्रपट निर्मिती केली होती.मात्र तो कोरोना कालखंडात प्रदर्शित होऊ शकला नाही.तरीही त्यांनी तो ओ.टी.टी.प्लॅटफॉर्मवर ‘तो’ प्रसिद्ध करून त्यांचा विचार राज्यात पोहचवला होता.त्यांनी आता चित्रपट लेखक ते निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवले आहे.

चित्रपट निर्मिती हा एक व्यवसाय आहे.चित्रपट निर्माते स्वतःच्या किंवा फायनान्सरकडून उसन्या घेतलेल्या पैशांनी दिग्दर्शक आणि अन्य तंत्रज्ञ नेमून चित्रपटाची निर्मिती करतात.चित्रपट पूर्णपणे तयार झाल्यावर निर्माते तो वितरकांच्या माध्यमातून प्रदर्शित करतात.प्रदर्शनातून मिळालेल्या पैशातून खर्च वजा झाला की उरणारी रक्कम निर्मात्याची असते.चित्रपट निर्मिती करणे हा एक हौशी कलाकार करू शकत नाही.हा पूर्णपणे व्यावसायिक आहे.या मध्ये निर्माता अतिशय मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवितो जर चित्रपट चालला तरच निर्मात्याचा फायदा होतो,पण हौशी कलाकारांनी स्वत जवळचे पैसे गुंतवून चित्र पट निर्मिती बऱ्याच वेळा जोखमीची ठरत असते.त्यामुळे ग्रामीण भागातील तरुण या क्षेत्राकडे सहसा फिरकत नाही.मात्र याला भरत मोरे हे अपवाद ठरले आहे.तसे ते मेडिकल क्षेत्रातील प्रसिद्ध नाव.व शिवसेनेचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून कोपरगाव व नगर जिल्ह्यात परिचित आहे.त्यांनी गतवर्षी ‘मसुटा’ या मराठी चित्रपट निर्मिती केली होती.मात्र तो कोरोना कालखंडात प्रदर्शित होऊ शकला नाही.तरीही त्यांनी तो ओ.टी.टी.प्लॅटफॉर्मवर ‘तो’ प्रसिद्ध करून त्यांचा विचार राज्यात पोहचवला होता.त्यांनी चित्रपट लेखक ते निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवले आहे.ओ.टी.टी.म्हणजे “ओव्हर द टॉप”आपण घरी असलेल्या टीव्ही वर मालिका,चित्रपट किंवा अन्य कार्यक्रम बघतो त्यासाठी केबल अथवा डिश जोडणे महत्वाचे असते.या उलट ओ.टी.टी.साठी अशा कुठल्याच जोडणीची गरज नसते,तर पूर्ण पणे इंटरनेट चा वापर करून हे चालवले जाते.आपल्या मोबाईल अथवा कॉम्पुटर वरून ओ.टी.टी.वापरता येते.या वर असणाऱ्या मालिका,चित्रपट किंवा कार्यक्रम बघण्यासाठी महिन्याला वा वर्षाला पैसे भरून नोंदणी करावी लागते.हे माध्यम कोरोना काळात खूपच प्रभावी ठरले आहे.त्यांनी त्याचा प्रभावी उपयोग करून घेतला आहे.त्यासाठी आयुष्यभरासाठीची पुंजी मोठी जोखीम पत्करून या साठी लावली आहे.त्यांनी दिग्दर्शक म्हणूनही भूमिका निभावली आहे.वर्तमानात गत वर्षी पासून कोरोना साथ जगभर आल्या पासून ‘मास्क’ हा शब्द परवलीचा बनला आहे.’मास्क’ हा इंग्रजी शब्द असला तरी आता मराठीत मराठी शब्द कमी आणि इंग्रजी शब्दांचा वापर अन्य प्रादेशिक भाषाप्रमाणेच जास्त रुळू लागला आहे.त्यासाठी ‘मुखपट्टी’ हा मराठी शब्द असला तरी तो सर्रास वापरला जात नाही.त्यामुळे शिर्षकासाठी त्यांनी याच इंग्रजी शब्दाचा वापर केला असल्यास नवल नाही.त्यामुळे हे शीर्षक अर्थातच जगभर रुळलेलेलं आहे.त्याचा लाभ त्यांना नक्कीच होणार आहे.त्यासाठी त्यांनी ‘मास्क’ चित्रपटाचे चित्रिकरणाची सुरवात काल सकाळीच केली आहे.त्यांचा ताफा जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांचे लक्ष वेधून घेत होता.त्यामुळे कोपरगाव शहरात आगामी २८ ऑगष्ट पर्यंत मोठ-मोठे कलाकार उपस्थित राहणार आहे.त्यात दिग्दर्शक अमित कोळी,(ज्यांनी आतापर्यंत २६-३० चित्रटांना दिग्दर्शन केले आहे) अभिनेते संदीप पाठक,प्रसन्न केतकर,हार्दिक जोशी,शाम श्रीवास्तव,राम कतोरे तसेच अभिनेत्री निशा परुळेकर,राधा सागर,कल्याणी चौधरी सह अनेक अभिनेत्यांचा समावेश आहे. ‘झी’या मराठी वाहिणीद्वारे हा चित्रपट डिसेंबर मध्ये प्रदर्शित केला जाणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.त्या मुळे कोपरगाव हे शहर राज्यासह,देशभर,दाखवले जाणार हे ओघाने आले आहे ही कोपरगावकरांसाठी मोठी अभिमानाची बाब राहाणार आहे.मोठ्या प्रमाणात चित्रीकरण आणि कलाकार बघण्यासाठी नागरिक,चित्रपट प्रेमी गर्दी करत आहे.सध्या भरत मोरे व त्यांच्या “मास्क” चित्रपटाची चर्चा तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली आहे.या कोरोनाच्या कठीण काळात ते जिल्ह्यातील नव्हे तर राज्यातील तरुणांना प्रेरणा देणारे काम करणार आहे.त्यामुळे या चित्रीकरणाकडे चित्रपट शौकिनांचे लक्ष लागून आहे.त्यांच्या या उपक्रमाचे माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी स्वागत व कौतुक केले आहे.यापूर्वी चित्रपट निर्मिती क्षेत्रात बापू भिला वाणी यांनी “देऊळबंद” या चित्रपटाची पुण्यात तर वारी येथील राजेंद्र गायकवाड यांनी ‘प्रेमवारी’ची निर्मिती करून या क्षेत्रात पाऊल ठेवले होते.तर अभिनयात सिने अभिनेते चंद्रकांत शिंदे,गिरीश देशपांडे यांनी नाव झळकावले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close