जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगाव तालुक्यात एक ठार,पोलिसांत अकस्मात नोंद

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील दहिगाव बोलका ग्रामपंचायत हद्दीत मुंबई-नागपूर रस्त्याच्या कडेला आज सकाळी ०८ वाजेच्या सुमारास एक पुरुष जातीचे प्रेत आढळून आले असून याबाबत कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी अकस्मात मृत्यु नोंद केली आहे.दरम्यान सदर इसम हा राजस्थाननगर सिडको नाशिक येथील रहिवासी असून त्याचे नाव अभिजित राजेंद्र सांबरे (वय-३८) असे असल्याचे समजते.त्यामुळे दहिगाव बोलका आणि परीसरात खळबळ उडाली आहे.

दरम्यान सदर इसम हा व्यापारी असावा असा कयास व्यक्त होत असून तो वसुलीसाठी वैजापूर या शहरात आला असावा असा अंदाज व्यक्त होत आहे.सदर इसमाचे उत्तरीय त्यांच्या नातेवाईकांनी कोपरगाव तालुका पोलिसांकडून ताब्यात घेतले असून ते आपल्या गावी घेऊन गेले आहे.

त्याबाबत सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव तालुक्यातून मुंबई-नागपूर हा युती शासनाच्या काळात तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांच्या काळात पूर्ण झाला असून हा रस्ता अद्याप वैजापूर तालुक्यातील दहिगाव येथे पूर्ण झालेला नाही.दरम्यान अद्याप सदर काम पूर्ण नसल्याने काही ठिकाणी बरेच अपघात होत आहे. तथापि भाजप सरकारच्या काळात हा रस्ता पूर्ण झाला असून तो दुहेरी आहे.मात्र बऱ्याच ठिकणी धोकादायक वळणे आहेत.त्या ठिकाणी सूचना फलकाचा अभाव आहे.त्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे.अशीच घटना नुकतीच कोपरगाव तालुक्यात घडली असून त्या ठिकाणी सकाळी०८ वाजेच्या सुमारास ओढ्याच्या कडेला एक इसम मयत स्थितीत आढळला असल्याची खबर येथील वार्ताहर अमीन रसूल शॆख यांनी दिली होती.त्यानंतर त्यांनी तालुका पोलीसांनी सदर ठिकाणी रुग्णवाहिका पाचारण केली होती.व त्या ठिकाणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले व सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश आव्हाड यांनी घटनास्थळी भेट दिली असता त्या ठिकाणी सदर मयत इसमास रुगवाहिकेत टाकून रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यासाठी नेत असताना त्यांना मयताच्या खिशात आधार कार्ड,ए.टी.एम.कार्ड,चालक परवाना आदी साहित्य मिळून आले होते.त्यात त्याचे नाव निष्पन्न झाले असून अभिजित राजेंद्र सांबरे असे आहे.त्यामुळे सदर इसमाचा मृत्यू कशाने झाला हे अद्याप समजले नाही.मात्र तो अपघात असावा असा कयास व्यक्त होत आहे.

दरम्यान सदर इसम हा व्यापारी असावा असा कयास व्यक्त होत असून तो वसुलीसाठी वैजापूर या शहरात आला असावा असा अंदाज व्यक्त होत आहे.सदर इसमाचे उत्तरीय तपासणीनंतर त्यांच्या नातेवाईकांनी कोपरगाव तालुका पोलिसांकडून ताब्यात घेतले असून ते आपल्या गावी घेऊन गेले आहे.

दरम्यान या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी अकस्मात मृत्यू नोंद क्रं.४४/२०२३ सी.आर.पी.सी.१७४ प्रमाणे नोंद केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक देसले यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अशोक गवसणे हे करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close