मनोरंजन
अहमदनगर जिल्हास्तरीय विज्ञान नाटयमहोत्सवात आत्मा मालिक गुरुकुलाचे यश
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी)
नागपूर येथील महराष्ट्र राज्य विज्ञान व गणित शिक्षण संस्था व जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने, अहमदनगर जिल्हास्तरीय विज्ञान नाट्यमहोत्सव अहमदनगर येथे नुकताच संपन्न झाला आहे. या स्पर्धेत आत्मा मालिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरुकुलाच्या विद्यार्थ्यांनी तृतिय क्रमांकाचे पारितोषिक मिळवीत लक्षवेधी कामगिरी केली आहे. त्याबद्दल सर्वत्र विजयी विद्यार्थ्यांचे कौतुक आणि अभिनंदन होतांना दिसून येत आहे.
गुरुकुलाचे प्राचार्य निरंजन डांगे, विभाग प्रमुख रमेश कालेकर, पर्यवेक्षक बाळासाहेब कराळे, रवींद्र देठे, अभिनय शिक्षक अमोल नलवडे, संतोश मेढे, योगेश पवार, सर्व अध्यापक, षिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी समाधान व्यक्त करित अभिनंदन केले.