कोपरगाव तालुका
कोपरगावातील संस्थांना त्यागी नेत्यांचे नाव देण्याची सत्ताधाऱ्यांत हिम्मत नाही-चेतन खुबाणी
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील प्रस्थापित नेत्यांमध्ये शासन विकसीत संस्थांना नावे देण्याची नैतिक हिंमत नसल्याने ते सर्वत्र संस्थांना आपलीच नावे देत सुटली असून आपल्या पच्छात आपली कोणीही दखल घेणार नाही याची त्यांना खात्री असल्यानेच त्यांच्या या मर्कटलीला सुरु असल्याची टीका भाजपचे युवा नेते चेतन खुबाणी यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केली आहे.
त्यांनी आपल्या प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे कि,भारतीय जनता पार्टीचे माजी प्रदेशाध्यक्ष स्व.खा.सूर्यभान वहाडणे यांनी विधानपरिषद सदस्य, राज्यसभा सदस्य व विधानपरिषदेचे उपसभापती म्हणून काम करत असताना शासकीय निधीमधून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सांस्कृतिक सभागृहे,सभामंडप, वाचनालये,शाळा खोल्या, इमारती उभारल्या.त्यातील बहुतांश इमारतींचे,सभागृहांचे नामकरण- जनसंघाचे दिवंगत नेते,एकात्म मानववादाचे उदगाते “पं. दीनदयाळ उपाध्याय ” असेच करण्यात आलेले आहे.कोणत्याही वास्तुला स्व.सूर्यभान पा. वहाडणे यांचे नांव दिलेले नाही.अपवाद आहे फक्त स्व.सूर्यभान वहाडणे घाटाचा.मात्र ते नाव त्यांच्या परिवारातल्या कुणीही दिलेले नाही हे विशेष !
भारतीय जनता पार्टीचे माजी प्रदेशाध्यक्ष स्व.खा.सूर्यभान वहाडणे यांनी विधानपरिषद सदस्य, राज्यसभा सदस्य व विधानपरिषदेचे उपसभापती म्हणून काम करत असताना शासकीय निधीमधून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सांस्कृतिक सभागृहे,सभामंडप, वाचनालये,शाळा खोल्या, इमारती उभारल्या.त्यातील बहुतांश इमारतींचे,सभागृहांचे नामकरण- जनसंघाचे दिवंगत नेते,एकात्म मानववादाचे उदगाते “पं. दीनदयाळ उपाध्याय ” असेच करण्यात आलेले आहे.कोणत्याही वास्तुला स्व.सूर्यभान पा. वहाडणे यांचे नांव दिलेले नाही.
पण अलीकडच्या काळात मात्र सहकारी संस्था,साखर कारखाने,शिक्षण संस्था-शाळा-कॉलेज, सभागृहे,दूधसंघ,बँका, पतसंस्था,सांस्कृतिक भवन,चौक,आदींना कोपरगाव तालुक्यातील सहकारी साखर कारखानदारीतुन व सभासदांच्या पैशातून उभ्या केलेल्या संस्थानां वर्तमानात नावे देण्याची अनिष्ठ परंपरा सुरु करण्यात आली आहे.हि सभासदांना शिसारी आणणारी घटना आहे.काहींनी तर आपल्या गावात केवळ सौचालयांनाच नावे देणे बाकी ठेवले आहे.सभामंडप,प्रवेशद्वार,सेवा संस्था,ग्रामपंचायत, शाळा,महाविद्यालय,मंदिरे,पाणी पुरवठा संस्था,वाचनालये,कशावर यांची नावे नाही असा प्रश्न निर्माण व्हावा अशीच एकूण परिस्थिती आहे.पाशवी सत्ता व आर्थिक दहशतीच्या जोरावर असे नामकरण करण्यात येते.सहकारी संस्थांचे खरे मालक शेतकरी सभासद हतबलपणे ठराविक परिवारांची ही मनमानी नाईलाजाने सहन करत आहेत या साखर सम्राटांनीं मोठ्या प्रमाणावर आर्थिक शोषण केल्याने ते दुर्बल बनले आहेत.
आपल्या कामावर या नेत्यांचा भरवसा नसल्याने या नेत्यांची प्रसिद्धीसाठी केविलवाणी धडपड चालू आहे.नेत्यांना कार्यकर्ता सोबत नसला तरी चालेल पण छायाचित्रकार मात्र सोबत लागतोच.कारण वृत्तपत्रात,सोशल मीडियात स्वतःचे फोटो आल्याशिवाय आजच्या नेत्यांना चैन पडत नाही.प्रसंग कोणताही असो हे नेते फोटो सुंदर यावा यासाठी कॅमेऱ्याकडे बघून हसतच असतात.या हास्यातून बरेच वेळा त्यांच्यातील विदूषकाचे प्रदर्शन होत असते.आपण ज्या पक्षाचे काम करतो,ज्या पक्षामुळे आपणांस पद भोगायला मिळाले त्याचे यांना भान राहिलेले नाही.
माजी खा.वहाडणे यांनी केलेल्या विकास कामांचा कधीच डांगोरा पिटला असल्याचे दिसले नाही.वर्तमानात तर स्मशान भूमीचे शेड,अर्धवट बसथांबे (बस थांबे म्हणणे आततायीपणा ठरावा व ते जाहिरात होर्डिंग ठरावे इतका किळसवाणा प्रकार सुरु आहे) आपल्या कामावर या नेत्यांचा भरवसा नसल्याने या नेत्यांची प्रसिद्धीसाठी केविलवाणी धडपड चालू आहे.नेत्यांना कार्यकर्ता सोबत नसला तरी चालेल पण छायाचित्रकार मात्र सोबत लागतोच.कारण वृत्तपत्रात,सोशल मीडियात स्वतःचे फोटो आल्याशिवाय आजच्या नेत्यांना चैन पडत नाही.प्रसंग कोणताही असो हे नेते फोटो सुंदर यावा यासाठी कॅमेऱ्याकडे बघून हसतच असतात.या हास्यातून बरेच वेळा त्यांच्यातील विदूषकाचे प्रदर्शन होत असते.आपण ज्या पक्षाचे काम करतो,ज्या पक्षामुळे आपणांस पद भोगायला मिळाले त्याचे यांना भान राहिलेले नाही. पक्षाच्या आदरणीय नेत्यांचे फोटो,फ्लेक्स लावणे यांच्यासाठी कमीपणाची बाब आहे.,संस्थाना नांव देण्याची दानत या सहकार सम्राटांत नाही.कारण अशा ठराविक घराण्यांनी सहकारी संस्था स्वतःच्या बटीक करून ठेवल्या आहेत.या सहकार सम्राटांमध्ये काही नैतिकता शिल्लक असेल तर त्यांनी व त्यांच्या वारसदारानी स्वतःची नांवे काढून टाकून महापुरुषांची नांवे द्यावीत असे आवाहन चेतन खुबाणी यांनी शेवटी केले आहे.