मनोरंजन
आत्मा मालिक गुरुकुलाचे एकपात्री नाटयअभिनय स्पर्धेत सुयश
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी)
कोपरगांव शहरातील कै. गंगाधर गवारे मामा फाऊंडेशन, व युवा स्पंदन, लक्ष्मीवाडी यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या अभिनय सम्राट स्व. निळुभाऊ फुले अभिनय स्पर्धेत आत्मा मालिक ध्यानपीठ संचलित, आत्मा मालिक माध्य. गुरुकुलातील इ. 10 वी चा विद्यार्थी हर्श चैधरी याने ‘विरह’ या एकपात्री अभिनय स्पर्धेत प्रशस्तीपत्रासह प्रथम क्रमांक प्राप्त करुन गुरुकुलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.त्याबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
हर्शल चैधरी मालेगांव येथील हाॅटेल व्यवसायिक नानासाहेब भिकन चौधरी यांचा मुलगा असून त्याने अभ्यास, जिद्द, चिकाटीच्या जोरावर चमक दाखवून गुरुकुलाचे नाव रोशन केले त्याबद्दल प्राचार्य निरंजन डांगे, विभाग प्रमुख रमेष कालेकर, पर्यवेक्षक बाळासाहेब कराळे, रवींद्र देठे, अभिनय शिक्षक अमोल नलवडे, संतोश मेढे, योगेश पवार, सर्व अध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी समाधान व्यक्त करित अभिनंदन केले आहे.