जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
खेळजगत

बास्केटबॉल स्पर्धेत समता इंटरनॅशनल स्कूलची कामगिरी

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील समता इंटरनॅशनल स्कूलमधील १७ वर्षा खालील मुलींच्या बास्केटबॉल संघाने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अहमदनगर आयोजित आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूल कोकमठाण येथे २६ व २७ ऑगस्ट रोजी या स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत समता इंटरनॅशनल स्कूलच्या मुलींच्या बास्केटबॉल संघाने दैदिप्यमान कामगिरी करत हि स्पर्धा जिंकून विभागीय पातळीवरील स्पर्धेचे दरवाजे खुले करून घेतले.

क्रीडा क्षेत्रात आपला लौकिक कायम राखत या स्पर्धेत समता इंटरनॅशनल स्कूलच्या संघाने उपांत्यपूर्व सामन्यात यश अॅकडमी संघाचा ८-० फरकाने तर उपांत्य सामन्यात न्यू इंग्लिश स्कूल निघोज संघाचा ८-२ अशा फरकाने तर अंतिम सामन्यात ध्रुव ग्लोबल स्कूल संगमनेर संघाचा ७-५ या फरकाने प्रभाव केला. विजेत्या संघाला प्रशिक्षक गणेश मोरे यांचे मार्गदर्शन लाभले होते.
समता इंटरनॅशनल स्कूलच्या विजेत्या संघाचे प्रतिनिधित्व सर्व कु.नेहा मुंजे, रुजुल रोहमारे, निधीषा आव्हाड, निष्ठा भुसारी, पूर्वा कोठारी, पौरवी राहाणे, ईशा फुलवर, सायली ताडगे, तन्वी लालसरे, तनिष्का ठोंबरे, आर्य भुसारे यांनी केले.
या स्पर्धेमध्ये विजयी झालेल्या संघाचे समता इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक, अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे, व्यवस्थापकिय संचालिका स्वाती संदीप कोयटे, स्कूलचे सर्व विश्वस्त, शैक्षणिक संचालिका .लिसा बर्धन उप प्राचार्या .शैला झुंजारराव, उप प्राचार्य विलास भागडे व सर्व शिक्षक, कर्मचारी यांनी अभिनंदन केले आणि अकलूज येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close