गुन्हे विषयक
कोपरगावात महिलेचा विनयभंग,एकावर गुन्हा दाखल
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी)
कोपरगाव शहराच्या उत्तरेस असलेल्या येवला रस्त्यालगत असलेल्या बँक कॉलनीत एका बेचाळीस वर्षीय महिलेचा आरोपी अजय दिलीप डावखर रा.बँक कॉलनी याने विनयभंग केला असल्याची फिर्याद कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे कि, कोपरगाव शहराच्या उत्तरेस येवला रस्त्यालगत बँक कॉलनी असून फिर्यादी महिला व आरोपी हे जवळ जवळच राहतात.असे असताना आरोपी अजय डावखर याने अठरा सप्टेंबर रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास आरोपी डावखर याने फिर्यादी महिलेस घाणघाण शिवीगाळ करून तिच्याशी असभ्य वर्तन केले.व तिच्याशी अनैतिक कृत्याची मागणी केली व विनयभंग केला आहे.या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गु.र.न.323/2019 भा.द.वि.कलम 354 (अ),354 (ब),504 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.आर.पी.पुंड हे करीत आहेत.