मनोरंजन
बहादरपूर येथे गोपाजीबाबा यात्रा उत्साहात संपन्न
संपादक-नानासाहेब जवरेकोपरगाव(प्रतिनिधी) कोपरगाव तालुक्यातील श्री क्षेत्र बहादरपूर येथील संजीवन समाधी घेतलेले संत सद्गुरू गोपाजीबाबा याचा यात्रा मोहोत्सव आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला असून त्या निमित्त हजारो भाविक भक्तांनी समाधी दर्शनाचा लाभ घेतला आहे. सदरचे सवित्तर वृत्त असे की,श्री क्षेत्र बहादरपूर येथील एक तरुण आपल्या कुटुंबातील काही किरकोळ वादामुळे गाव सोडून दुरदेशी (आजचा बंगाल) निघून गेला होता.आप्तस्वकीयांनी बराच शोध घेऊनही त्यांचा थांगपत्ता कोणालाही लागला नाही.कुटुंबातील भली-थोरली माणसे अखेर थकून-भागून आपल्या कामाला लागली त्यांनतर त्याना आपल्या त्या हरवलेल्या तरुणांचा विसरही पडला.अशी बरीच वर्षे निघून गेल्यावर एक अवलिया गावात अनपेक्षितपणे गावात अवतीर्ण झाला मात्र त्याला ओळखणारे गावात कोणीच नव्हते.गावाबाहेर असताना काही टवाळ पोरांनी त्यांच्यावर वाळू व दगड फेकण्यास सुरुवात केली.व वारंवार त्रास दिला त्या नंतर त्यांनी अखेर आपली ओळख दाखविण्यासाठी चमत्काराचा आश्रय घेतला.व त्या गावातील मुलांनी फेकलेल्या वाळूपासूनच फुटाणे बनवून दिले.त्यामुळे गावात या अवलीयाची एकच चर्चा झाली. त्यांनी काही त्रास देणाऱ्यांना उभ्या शेर ताटीला आग लावून दिली.त्यामुळे अवघ्या गावाचा त्यावर एक चमत्कारी संत व थोर महाराज म्हणून विश्वास बसला व (त्यांनी आजच्या बंगालमध्ये जाऊन विद्या संपादन केली होती असा भाविकांचा विश्वास आहे.)त्यांचे आगत स्वागत करून सन्मानाने गावात प्रवेश दिला. त्यानंतर त्यांनी काही कालखंड समाजसेवेत व्यतीत केल्यावर संजीवन समाधी घेतली तेच आज समाधी मंदिराचे स्थान.आज त्या मंदिराचा ग्रामस्थानी जीर्णोद्धार केला आहे.व भव्य मंदिर उभारले आहे.गर्भगृहात आता सागवानी छोटेखानी मंदिर भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.त्यांनी ज्या दिवशी संजीवन समाधी घेतली तो वार श्रावणातील तिसरा सोमवार होता तो पासून गावात श्रावणातील तिसऱ्या सोमवारी यात्रा आयोजित करण्याचा प्रघात पडला तो तह्यात सुरु आहे.
या गावातील ग्रामस्थ व भाविक भक्तांनी जुन्या मंदिराचा जवळपास एक कोटींचा खर्च करून नुकताच जीर्णोद्धार केला असून भव्य मंदिर उभारले आहे.आज सकाळपासून समाधी मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.सकाळी पवित्र गोदावरी गंगेचे पवित्र जल आणून त्याची साग्रसंगीतात भव्य मिरवणूक काढून समाधी मंदिरात बाबांना पवित्र जलाभिषेक घालण्यात आला.त्यावेळी गावातील तरुणाईने थेट त्रिंबकेश्वर येथून पवित्र गोदावरीचे जल व श्री क्षेत्र अंजनेरी या ठिकाणाहून मशाल आणून बाबांची सेवा केली.तर दुपारी कुस्त्यांचा भव्य हंगामा आयोजित करण्यात आला होता.आदल्या दिवशी सजवलेली रथाची वाजत गाजत मिरवणूक काढून त्याचे फटाक्याच्या आतषबाजीत स्वागत केले व गावात व मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाईने परिसर उजळून टाकला होता.त्याच रात्री लोकांना करमणुकीचे साधन म्हणून सविता पुणेकर यांच्या लोकनाट्य तमाशा मंडळाचे आयोजन करण्यात आले होते.त्याला तरुणाईने मोठी हजेरी लावली होती.यात्रा समितीच्या वतीने आज रात्री उशिरा पर्यंत दर्शनासाठी भाविक रांग लावून होते.या यात्रेचे यजमानपद खकाळे वाड्यावर होते.त्यांनी यात्रा यथोचित पार पाडण्यासाठी मोठे कष्ट घेतले.त्यांना जेष्ठांनी सहकार्य केले.ग्रामस्थानी खकाळे वाड्याने यात्रामहोत्सव व्यवस्थित पार पडला बद्द्ल समाधान व्यक्त केले आहे.