निघोज( प्रतिनिधी)-निघोज (ता.पारनेर ) येथील मळगंगा मिल्क अँड अँग्रो प्राँडक्टस प्रा.लि.( कन्हैया दुध) निघोज या संस्थेच्या 22व्या वर्षात यशस्वी पदार्पणानिमित्त आयोजित करण्यात येणार आलेला भव्य किर्तन महोत्सवाला काल मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला.महोत्सवाच्या पहील्याच दिवशी भाविक व ग्रामस्थांनी मोठी गर्दी करीत हरीनामाचा जयघोष केला.
झी टेलिव्हिजनच्या झी टाँकीज वाहीनी वरील मन मंदीरा कार्यक्रमात या किर्तन महोत्सवाचे थेट प्रेक्षपण करण्यात येणार असुन काल 30मार्च पासुन हा महोत्सव सुरू झाला आहे.आठ दिवस चालणार्या या महोत्सवाची 6एप्रिलला काल्याच्या किर्तनाने सांगता होणार आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
काल पासुन हा महोत्सव सुरू होणार असुन ह.भ.प श्रीकांत महाराज गागरे, ह.भ.प ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, ह.भ.प आक्रुर महाराज साखरे, ह.भ.प संजय नाना महाराज धोंगडे, ह.भ.प ज्ञानेश्वर महाराज पठाडे, ह.भ.प पुरुषोत्तम महाराज पाटिल, ह.भ.प नामदेव महाराज लबडे व सरला बेटचे.ह.भ.प रामगिरीजी महाराज आदी राज्यातील नामवंत किर्तनकार किर्तनरुपी सेवा करण्यासाठी हजेरी लावणार आहेत.सायंकाळी 7ते9या वेळेत कीर्तन होणार आहे. तसेच दररोज या महोत्सवात सामील होणार्या भाविकांसाठी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले आहे.
कन्हैया उद्योग समुहाचे संचालक शांताराम मामा लंके व जी एस महानगर बँकचे संचालक श्री. बबनराव लंके यांच्या मार्गदर्शनाखाली या महोत्सवासाठी भव्य मंडप, आद्यावत साऊड सिस्टिम, वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था, पिण्याचे पाणी आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. तरी भाविकांनी या महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होऊन महोत्सवाची शोभा वाढवावी असे आवाहन कन्हैया उद्योग समुहाचे कार्यकारी संचालक श्री. मच्छिंद्रशेठ लंके यांनी केले आहे.