नगर ( प्रतिनिधी)- भाजपाने वडीलांचे तिकिट कापल्यानंतर नाराज झालेल्या सुवेंद्र गाधींनी काल उमेदवारी अर्ज घेवुन मी लोकसभा निवडणुक अपक्ष लढणारच असा नारा दिला आहे. त्यामुळे भाजपाचे उमेदवार सुजय विखे व विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील या पितापुत्रांची धकधक वाढली आहे. नाराज झालेल्या खासदार दिलीप गांधी यांच्या घराची पायरी चढुन विखे पितापुत्रांनी नाराजी दुर करण्याचा प्रयत्न केला मात्र सुवेंद्र गांधी आपल्या भुमिकेवर अद्याप ठाम असल्याने या निवडणुकीत खासदार दिलीप गांधीचा सस्पेन्स कायम आहे.
भारतीय जनता पक्षाने खासदार दिलीप गांधीना लोकसभा निवडणुकीचे तिकिट नाकारुन डाँ. सुजय विखेंना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे नाराज झालेल्या गांधीनी नगरला कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात सुवेंद्र गांधींनी अपक्ष उमेदवारी करण्याची घोषणा केली होती.त्यानंतर खासदार दिलीप गांधींची नाराजी दुर करण्यासाठी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी गांधींच्या घराची पायरी चढत गांधीशी खलबते केली तर सुजय विखेंनीही दिलीप गांधीची भेट घेवुन आशिर्वाद घेतले. यानंतर सर्व काही अलबेल असताना काल सुवेंद्र गांधीनी उमेदवारी अर्ज। विकत घेऊन मी निवडणुक लढवणार असल्याचा नारा देत कार्यकर्त्यांनीही पाठींबा देण्याचे आवाहन केले आहे. सुवेंद्र गांधीची ही भुमिका सुजय विखेंसाठी त्रासदायक ठरू शकते त्यामुळे सध्यातरी विखेपितापुत्रांची धकधक वाढली आहे.