आंदोलन
कोपरगावातील…या सर्व्हे मधील खुल्या जागेस नारिकांची विरोध

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव नगर परिषद हद्दीत असलेल्या सर्व्ह क्रं.१९८ मधील खुली जागा हि स्थानिक नागरिकांना विश्वासात न घेता बेकायदेशीर पणे वाणी समाजास दिली असून स्थानिक नागरिकांवर अन्याय केला असून सदर जागा प्रस्ताव रद्द करावा अशी मागणी तेथील नागरिकांनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना निवेदन देऊन केली आहे.
शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार यांचे निधीतून सुमारे ७५ लाख रुपयांचा निधी देऊ केला होता.त्याचे भूमीपूजनाचे वेळी स्थानिक नागरिकांनी कार्यक्रमात व्यत्यय आणून त्यास हरकत घेतली होती.त्यामुळे मोठा गोंधळ उडाला होंता.त्यात निधी देऊनही खा.लोखंडे यांच्या हाती,”पापही नाही आणि पुण्यही नाही” अशी अवस्था झाली होती.आता हा दुसरा विरोध समोर आला आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव नगर परिषद हद्दीतील समतानगर येथील नगरपरिषदेची खुली जागा नुकतीच ‘योगभवन’ला दिली होती.मात्र त्यासाठी शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार यांचे निधीतून सुमारे ७५ लाख रुपयांचा निधी देऊ केला होता.त्याचे भूमीपूजनाचे वेळी स्थानिक नागरिकांनी कार्यक्रमात व्यत्यय आणून त्यास हरकत घेतली होती.त्यामुळे मोठा गोंधळ उडाला होंता.त्यात निधी देऊनही खा.लोखंडे यांच्या हाती,”पापही नाही आणि पुण्यही नाही” अशी अवस्था झाली होती.त्यामुळे त्यांनी तीव्र नापसंती व्यक्त करून आपला राग सार्वजनिक बांधकाम व नगरपरिषद अधिकाऱ्यांवर काढला होता अशी खबर आहे.त्याबाबत नगरपरिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानी दुजोरा दिला आहे.
त्या पासून कोणताही बोध सदर अधिकाऱ्यांनी घेतलेला दिसत नाही असे दिसत आहे.आता त्याच सर्व्हे क्रमांक मध्ये दुसरा मोकळ्या जागेचा प्रस्ताव वाणी समाजाला दिला असून त्या ठिकाणी नगर परीषदेच्या परवानगीने सभागृह बांधणार असल्याचा दावा केला आहे.त्यामुळे स्थानिक नागरिक नाराज झाले असून त्यांनी आज सकाळी साडे अकराच्या सुमारास आपले शिष्ट मंडळ आणून त्याचा निषेधाचा खलिता मुख्याधिकारी यांच्या हाती सोपवला आहे.
सदर जागा हि ज्यांनी सदर ठिकाणी आपले भूखंन्ड खरेदी केले त्यांच्या साठी राखीव असून त्याचा लाभ स्थानिक नागरिकांना बाग अथवा क्रीडांगण,आदींसाठी करावा अशी मागणी केली आहे.
सदर निवेदनावर राहुल गरकल,रवींद्र पाठक,रवींद्र गोरे,ज्ञानेश्वर वाकचौरे,अशोक मोरे,रवींद्र खापेकर,भारत शेळके,प्रवीण आबक,शरीफा शेख,भगवान लोखंडे,श्रीधर मैड,आनंदा घोडेराव,गोकुळ वाघ आदींसह ४८ महिला व नागरिकांच्या सह्या आहेत.
दरम्यान या प्रकरणी कोपरगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी याबाबत विचार करून त्या बाबतचा आपला निर्णय दोन दिवसात कळवतो असे आश्वासन दिले आहे.त्याबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.