धार्मिक
विधानसभा निवडणुकीच्या विजयात मुस्लिम समाजाचे मोठे योगदान-कौतूक
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
आपल्या राजकीय जीवनात महत्वपूर्ण ठरलेल्या व सन-२०१९ सालात संपन्न झालेल्या विधानसभा निवडणुकीतील विजयात मुस्लिम समाजाने मोठे योगदान दिले असल्याचे प्रतिपादन कोपरगावचे राष्ट्रवादीचे आ.आशुतोष काळे यांनी आज सायंकाळी ६.३० वाजता आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना केले आहे.
यावर्षी रविवार दि.२ एप्रिल पासून मुस्लीम धर्मियांच्या पवित्र रमजान महिन्याचा प्रारंभ झाला आहे.इस्लाम धर्मात पवित्र ‘रमजान’ला अनन्यसाधारण महत्त्व आहे.या महिन्यात मुस्लिम बांधवांकडून निरंकार रोजे (उपवास) पाळले जातात.यात आबाल वृद्ध मनोभावे सामील होत असतात.त्या रमजान निमित्त भारताच्या राजकरणात इफ्तार पार्टीचे खास महत्व आहे.
देशातील काही राजकीय नेते मंडळींनी रमजानच्या महिन्यात इफ्तार पार्टी देण्याची परंपरा सुरु केली होती.देशाचे पंतप्रधान ते राष्ट्रपती आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या काळात अशा पार्टीचे आयोजन केले ज्याची नेहमीच चर्चा झाली.स्वातंत्र्यानंतर देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी ७ जंतर-मंतर रोडवर पहिल्यांदा इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते.असे म्हटले जाते की,यामागील त्यांचा उद्देश हा मुस्लिम विभाजनाच्या दु:खातून वर येण्यासह त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करायचा होता.मात्र लाल बहादुर शास्री हे जेव्हा पंतप्रधान झाले होते तेव्हा ही इफ्तार पार्टी बंद केली होती.त्यानंतर नेहरु यांची मुलगी इंदिरा गांधी जेव्हा पंतप्रधान झाल्यास तेव्हा त्यांनी पन्हा इफ्ताक पार्टीचे आयोजन केले असे म्हटले जाते की,”हा निर्णय मुस्लिमांना आधार वाटावा म्हणून घेतला होता.मात्र पुढे चालून या पार्ट्या केवळ निवडणूका आल्या की,आपल्या मतांची बेगमी करण्याचे साधन ठरले असे म्हटले तर वावगे वाटू नये.
महाराष्ट्रात आणि अन्य राज्यात तरी अशीच स्थिती आहे.कोपरगाव तालुका तरी त्याला कसा अपवाद असेल.विशेषतः काँग्रेसने हि परंपरा विशेष पाळली असल्याचे दिसून येते पुढे काँग्रेसमधून सन-१९९९ साली फुटून निघालेली राष्ट्रवादी काँग्रेसने हि परंपरा पाळलेली असल्याचे दिसून येते मात्र भाजपच्या काही नेत्यांनी अपवादात्मक स्थितीत याचे प्रदर्शन केले आहे.कोपरगाव शहरात नुकतीच राष्ट्रवादीचे आ.आशुतोष काळे यांनी आज सायंकाळी ६.३० वाजता गौतम बँकेच्या आवारात यांचे आयोजन मान्यवरांच्या उपस्थितीत केले होते.त्यामुळे अनेकांचे या कडे लक्ष वेधले गेले आहे.नाही म्हणायला काळे नंतर माजी आ.कोल्हे या कार्यक्रमाची रि ओढणार हे ओघाने आलेच.हि अलिखित परंपरा ठरलेली आहे.आज केलेल्या या इफ्तार पार्टीत विविध मान्यवर उपस्थित होते.
सदर प्रसंगी मौलाना निसार अहमद नदवी,यासिन मिल्ली,अफजल मिल्ली,मुक्तार मिल्ली,अनिस यासिन मिल्ली,अबीर शेख सर,राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे,शहराध्यक्ष सुनील गंगूले,माजी नगरसेवक मंदार पहाडे,राजेंद्र वाकचौरे,दिनार कुदळे,माजी गटनेते विरेन बोरावके,इम्तियाज अत्तार,जलील अत्तार,फकीर कुरेशी,मनोज नरोडे,अशोक आव्हाटे,चंद्रशेखर म्हस्के,रमेश गवळी,कृष्णा आढाव,सुनील शिलेदार,डॉ.अनिरुद्ध काळे,शिराज शेख,शादिर शेख,राजेंद्र फुलफगर,टिल्लू भाई पठाण आदि प्रमुख मान्यवरांसह बहुसंख्य मुस्लिम नागरिक उपस्थित होते.
सदर प्रसंगी उपस्थित मुस्लिम बांधवांना विविध सुग्रास फळ फळावळ आणि पदार्थांचे आयोजन केले होते.कार्यक्रमानंतर त्याची उपस्थितांसाठी मेजवानी आयोजित केली होती.
सदर कार्यक्रमाचे प्रास्तविक माजी नगरसेवक मेहमूद सय्यद यांनी केले तर सूत्रसंचालन रियाज सर यांनी केले आहे.तर उपस्थितांचे आभार राष्ट्रवादीचे युवा आघाडीचे शहराध्यक्ष नवाज कुरेशी यांनी मानले आहे.