जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवडणूक

कोपरगाव तालुक्यातील…या वि.का.सेवा संस्थेची निवडणूक बिनविरोध

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील कोळगाव थडी विविध कार्यकारी सेवा सोसायटीची निवडणूक बिनविरोध पार पडली आहे.या निवडणुकीत नवनिर्वाचित सदस्य मंडळात रावसाहेब माधव पानगव्हाणे,अशोक मारुती पानगव्हाणे,दिलीप गेणु शिंदे,राजेंद्र रामनाथ लुटे,राजाराम किसन निंबाळकर,किशोर भिकन निंबाळकर,अरुण पुंजाजी मुटकुळे,सोमनाथ वाळू चव्हाण,ज्ञानदेव नामदेव रोकडे, सविता इंद्रभान पानगव्हाणे,शोभा माधवराव मुटकुळे,गणेश निवृत्ती पानगव्हाणे,नानासाहेब जंगल पंडोरे यांचा समावेश आहे.

कोळगाव थडी सोसायटीच्या चेअरमन,व्हा.चेअरमन पदाची निवडणूक नुकतीच पार पडली.चेअरमन पदासाठी सोमनाथ वाळू चव्हाण व्हा.चेअरमन पदासाठी ज्ञानदेव नामदेव रोकडे यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे निडणूक निर्णय अधिकारी एन.जी.ठोंबळ यांनी चेअरमनपदी सोमनाथ वाळू चव्हाण व व्हा. चेअरमनपदी ज्ञानदेव नामदेव रोकडे यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याचे जाहीर केले यावेळी आर.एन.रहाणे व सचिव नारायण राजगुरू यांनी निवडणूक कामी सहकार्य केले आहे.
याप्रसंगी कोळगाव थडी व माहेगाव देशमुखचे सोसायटी सभासद व माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोसायटीचे नवनिर्वाचित चेअरमन सोमनाथ चव्हाण,व्हा.चेअरमन ज्ञानदेव रोकडे व सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे माजी आमदार अशोकराव काळे व श्री साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांनी अभिंनदन केले असून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close