जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

मदतीची घोषणा करुनही शासनाकडून अद्याप अंगठाच-..या नेत्याची टीका

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

अतिवृष्टी व पुरामुळे शेतीचे नुकसान झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीं मदत देण्याची घोषणा सरकारने केलेली असली तरी दिवाळीचा सण पाच ते सहा दिवसावर येऊन ठेपला तरीही अद्याप शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर मदतीच्या रकमा जमा झाल्या नसल्याने अद्याप तरी या मदतीबाबट्स सरकारने अंगठाचं दाखवले असल्याचे दिसून येत आहे.शासनाने या परिस्थितीचा गांभिर्याने विचार करुन शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने मदत जमा करावी अशी मागणी जिल्हा परिषदेचे सदस्य राजेश परजणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

“नगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ तसेच कृषिमंत्री ना.दादा भुसे यांनी दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत देण्याची घोषणा तीन-चार दिवसापूर्वी केली होती.येत्या २ तारखेपासून धनत्रयोदशीला दिवाळी सणाचा प्रारंभ होत आहे.४ तारखेला दिवाळी असताना मदत मिळण्याची अजूनही सुतराम शक्यता दिसत नाही हि चिंतेची बाब आहे”-राजेश परजणे,सदस्य जिल्हा परिषद.

या वर्षींच्या जून ते ऑक्टोंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे लाखो हेक्टरवरील खरीप पिकांचे व फळबागांचे प्रचंड प्रमाणावर नुकसान झालेले आहे.पिकांसह अनेक जनावरेही मृत्युमुखी पडली आहेत.अनेक ठिकाणी घरेही पडली आहेत.जमिनी वाहून गेल्याने अनेक शेतक-यांचे संसार पाण्यात गेले आहेत.अशा परिस्थितीत उभे राहण्यासाठी शासकीय मदतीची शेतकऱ्यांना गरज आहे. त्यातही ३३ टक्क्यांच्यावर नुकसान झालेल्यांनाच मदत देण्याचा निर्णय शासन पातळीवर झालेला आहे. राज्य सरकारच्या २१ ऑक्टोंबरच्या निर्णयानुसार जिरायत क्षेत्रासाठी प्रतिहेक्टर १० हजार,बागायत क्षेत्रासाठी प्रतिहेक्टर १५ हजार तर फळबाग क्षेत्रासाठी प्रति हेक्टर २५ हजार रुपयाची मदत जाहीर केलेली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील नुकसानीचा विचार केला तर हे नुकसान तब्बल ७५ कोटीच्या आसपास आहे.शासनाने या नुकसानीपोटी केवळ १० कोटीची घोषणा केलेली असल्याने ही रक्कम अतिशय तुटपुंजी असून या रकमेतून शेतकऱ्यांच्या हातात काहीच पडणार नाही.अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ तसेच कृषिमंत्री ना.दादा भुसे यांनी दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत देण्याची घोषणा तीन-चार दिवसापूर्वी केली होती.येत्या २ तारखेपासून धनत्रयोदशीला दिवाळी सणाचा प्रारंभ होत आहे.४ तारखेला दिवाळी आहे.असे असताना मदत मिळण्याची अजूनही
सुतराम शक्यता दिसत नाही.जिल्हा प्रशासनाकडूनही याबाबत काही हालचाली दिसून येत नाही. आर्थिक अडचणीमुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांची दिवाळीची खरेदी अजून झालेली नाही.शासनाच्या मदतीची शेतकरी वाट बघत आहेत.शासनाने शेतकऱ्यांच्या अडचणीचा विचार करुन येत्या दोन दिवसात मदत मिळवून द्यावी अशीही मागणी परजणे यांनी मुख्यमंत्र्याकडे शेवटी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close