जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात दुसऱ्या दिवशीही अतिक्रमणाचा हातोडा सुरूच

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगावात अतिक्रमण विरोधी मोहीम सुरूच

कोपरगाव नगरपरिषदेच्या हद्दीत अतिक्रमण करण्याचा आपला राजकीय हक्क असल्याच्या अविर्भावात असणाऱ्या असामाजिक तत्वांना काल प्रांताधिकारी गोविंद शिंदे,मुख्याधिकारी शांताराम गोसावी व पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी आपला हिसका दाखवला असून आज दुसऱ्या दिवशीही हि कार्यवाही जोराशोरात सुरु होती.त्यात आज साईबाबा कॉर्नरवर असलेले वादग्रस्त अतिक्रमणही पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने जमिनोध्वस्त केल्याचे आश्चर्यकारक रित्या पाहायला मिळाले आहे.त्याबाबत शहरातील अधिकृत गाळे धारक व व्यावसायिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

दरम्यान आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास गांधीच चौक या ठिकाणी बिरोबा मंदिराच्या लगत अतिक्रमण काढताना एका मनसेच्या कार्यकर्त्याने त्यास अडथळा आणला होता व एका जबाबदार अधिकाऱ्यास ‘अद्वताद्वा’ बातचीत केली होती.त्यातून बऱ्यापैकी गोंधळ उडाला असून त्यात त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन चांगलाच चोप दिला असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे.त्याच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचे कलम ३५३ लावला असल्याची खात्रीलायक बातमी आहे.

कोपरगाव नगरपरिषद हद्दीत,”अतिक्रमणाचा कॅन्सर” मोठ्या प्रमाणात वाढला आहे.त्यामुळे ज्यांनी लाखो रुपये घालून स्वतःच्या जागेत अधिकृतरित्या आपले व्यापारी संकुल बांधले त्यांच्यावर अन्याय होत होता.याबाबत वारंवार तक्रारी करूनही पालिकेकडून न्याय मिळणे दुरापास्त होत हॊते.या बाबत नगर परिषद सभागृहात वारंवार चर्चेचे गुऱ्हाळ होऊनही त्यात चर्चेचे चऱ्हाट वळण्यापलिकडे काहीच प्रगती होत नव्हती.तसा प्रयत्न व धाडस नगरपरिषद निवडणूक जवळ आल्यावर नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी केला होता.मात्र त्यावेळी कहर झाला होता.व कार्यवाही करणारे प्रामाणिक अधिकारी सुनील गोर्डे यांच्यावर हल्ला झाला होता.त्यातून कोपरगाव नगरपरिषदेच्या सत्ताधारी गटाच्या दोन नगरसेविका विरुद्ध अपात्रतेची कारवाई करणे बाबत जिल्हाधिकारी यांचे समोर सुनावणी आहे.

कोपरगावात का झाली अचानक कारवाई ?

दरम्यान दि.२२ मार्च रोजी हि सुनावणी सुरु असताना सदर जागेवर अद्याप अतिक्रमण तसेच असून त्यात आणखी भर पडल्याचे निदर्शनास आले होते.ती गंभीर बाब जिल्हाधिकारी यांचे समोर आली होती.व सदर जागेवर अधिकचे अतिक्रमण वाढले असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले असल्याचे विश्वसनीय वृत्त हाती आले होते.त्यामुळे जिल्हाधिकारी यांचा पारा अधिकच चढला असल्याचे वृत्त आहे.त्यातून नगरपरिषदेचे प्रमुख अधिकारी व शिर्डी येथील महसुली अधिकारी यांना फैलावर घेतल्याचे वृत्त आहे.व त्यातूनच त्वरित अतिक्रमण काढण्याचे त्यांनी फर्मान काढल्याचे समजत आहे.

त्यामुळे कोपरगाव नगरपरिषदेने अचानक आपले जे.सी.बी.कारवाईसाठी सज्ज केले होते.त्यातून काल तहसील कार्यालयात आगामी सहा एप्रिल रोजी नगर जिल्हा दौऱ्यावर उपमुख्यमंत्री येत असल्याच्या पार्श्वभुमीवर बैठक आयोजित केली होती.सदर बैठक संपताच या कारवाईस सुरुवात करण्यात आली होती.त्यात कोपरगाव बस स्थानक प्रमुख यांनी आगामी बस आगाराच्या उदघाटनाच्या पार्श्वभूमीवर बस आगाराचे जवळचे अतिक्रमण काढण्याची मागणी केली होती.त्यातच ते अतिक्रमण काढल्यावर सत्ताधारी गटाच्या शहराध्यक्ष यांनी काढायचे तर सर्वच अतिक्रमण काढा कोणालाही नगरपरिषदेच्या नगरसेवकांसह विविध पक्षांच्या पदाधिकारी आदींना अभय देऊ नका अशी सरळ मागणी अधिकाऱ्यांकडे केली होती.त्यातून हा राडा सर्व शहरभर झाल्याचे म्हटले जात आहे.

यातून काही जण अतिक्रमण करणाऱ्या या,”सरकारी जावयांना” नोटिसा दिल्या नाही असा कांगावा करत असल्याचे निदर्शनास आले आहे.त्यावर स्वमालकीच्या जागेत आपले अधिकृत दुकान थाटणाऱ्या काहीं व्यापाऱ्यांनी,”त्यांनी कोणाच्या परवानगीने हे अतिक्रमण केले ? असा रास्त सवाल विचारला आहे.त्यांना पालिकेने परवानगी दिली होती का ? असा जाबसाल केला आहे.

दरम्यान आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास पुन्हा हि अतिक्रमण विरोधी पथक सज्ज झाले व त्यांनी उर्वरित साईबाबा कॉर्नरवरील अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली होती.त्यात अनेक सत्ताधारी गटाच्या मान्यवरांचे (!) अतिक्रमण काढले गेले आहे.जे शहरातील अतिक्रमणास प्रेरणादायी ठरत होते.कोठेही अतिक्रमण काढावयाचे झाल्यास ‘ते’ आधी काढा हा अतिक्रमण धारकांचा घोषा ठरलेला असायचा.आता नगरपरिषद प्रशासनाने या कॅन्सरचे,’मूळ’ उखडून काढल्याने हा “अतिक्रमणाचा कॅन्सर ” बऱ्यापैकी नियंत्रणात येईल असे नागरिकांचे म्हणणे आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close