जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगाव तालुक्यात चोरट्यांचा धुडगूस,दोन ठिकाणी चोऱ्या

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यात चोरट्यांचा धुडगूस सुरूच असून काल पहाटे १ ते १.३० वाजेच्या सुमारास संवत्सर शिवारात किसन पगारे यांच्या घरात सुमारे पाच हजारांची चोरी तर दुसरे लक्ष्मणवाडी येथील इसम लिकायत रशीद पठाण यांचे घरी चोरीचा प्रयत्न झाला असल्याची बाब उघड झाली असून पहिल्या घटनेने शहर पोलिस व ग्रामसुरक्षा दल दक्ष झाल्याने पुढील अनर्थ टळला असल्याचे उघड झाले आहे.त्यामुळे ग्रामस्थांना भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान आणखी एका घटनेत कुंभारी ग्रामपंचायत मालकीचे बढे वस्ती ते मढी रोडवर पडलेले पी.व्ही.सी.पाईप आपल्या ताब्यातील महिंद्रा जितो कंपनीच्या टेंपोच्या (क्रं.एम.एच.१२ एन.एक्स.८६५९) सहाय्याने रात्री ९.३० वाजेच्या सुमारास चोरून नेताना आरोपी पाशा व्यंकट मोरे (वय-१८) रा.रेणूकानगर कोपरगाव व अन्य दोन आरोपी हे आढळून आले आहे.त्यांच्या विरोधात कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्यादी पो.कॉ.नवनाथ माधव गुंजाळ गुन्हा क्रं.५२३/२०२२ भा.द.वि.कलम ३७९,५११ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.ना.चव्हाण हे करित आहेत.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव तालुक्यात चोऱ्यांचे प्रमाण अलीकडील काळात दिवसेंदिवस जास्त वाढत चालले असल्याचे दिसत आहे.अशीच घटना दि.२८ डिसेंबर रोजी पहाटे ०१ ते १.३० वाजेच्या सुमारास संवत्सर शिवारात घडली आहे.

त्याचे झाले असे की,संवत्सर ग्रामपंचायत हद्दीत गावाच्या उत्तरेस साधारण अडीच कि.मी.अंतरावर चारी नंबर ३७ लगत रहिवासी असलेले शेतकरी किसन पगारे हे आपल्या वस्तीवर आपले नियत कर्म आटोपून आदल्या रात्री झोपी गेले होते.पहाटे दीडच्या सुमारास त्याना जाग आली ती चोरट्यांच्या चाहुलीने त्या वेळात चोरट्यानी त्यांच्या घराच्या खिडकीतून त्यांच्याच वस्तीवरील लांब गजाचा वापर करून आतील त्यांच्या आत्मा मलिक येथील सेवेत असलेल्या मुलाची पँट काढून त्यातील पाच ते सहा हजार काढले असताना त्यांनी आणखी एका बॅगला हात घातला मात्र सदर बॅग पडल्याने घरात आवाज झाला त्यामुळे घरातील सदस्यांना जाग आली.त्यावेळी चोरट्यांनी धूम ठोकली त्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे.त्यांनी याबाबत पुढील सतर्कता म्हणून कोपरगाव शहर पोलिसांना व ग्रामसुरक्षा दलास खबर केली त्यामुळे त्यांनी सर्व ग्रामस्थांना भ्रमणध्वनीच्या सहाय्याने लघुसंदेश टाकून सजग केले होते.
दरम्यानच्या काळात त्यांनी आगामी वस्तीवर लिकायत पठाण यांची जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेजवळ असलेली वस्ती गाठली होती.तेथे त्यांनी हाच प्रयोग करण्याचा प्रयत्न केला होता.पाठी मागून गजाच्या सहाय्याने कडी उघडून त्यांनी स्वयंपाक गृहात प्रवेश केला होता.तेथील डब्यांची उचकपाचक केली असता त्यांना त्यात काही विशेष हाती लागले नाही.मात्र या आवाजाने घरातील अन्य सदस्य जागे झाले त्यामुळे त्यांनी आरडाओरडा केला त्यामुळे त्यांनी धूम ठोकली आहे.त्यामुळे या सतर्कतेने त्यांचा बराच ऐवज वाचला आहे.
दरम्यानच्या काळात ग्रामसुरक्षा दल यांनी भ्रमणध्वनीच्या सहाय्याने नागरिकांना जागे केले तर दुसरीकडे शहर पोलिसांनी सायरन देत आवाज केल्याने चोरट्यानी पोबारा केला आहे.मात्र दुसऱ्या ठिकाणी एकाच चोरट्याची चप्पल पठाण यांचे वस्तीवर पडली असल्याचे निदर्शनास आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close