जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव नगरपरिषदेच्या दुसऱ्या मजल्याचे भूमिपूजन संपन्न

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगांव-(प्रतिनिधी)

कोपरगाव नगरपरिषदेच्या पहिल्या मजल्याचे काम पूर्ण झाल्यानंतर आज दुसऱ्या मजल्याचे कामाचे उदघाटन नगरपरिषद बांधकाम अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत तर करणारे रुग्णवाहिका चालक अमित खोकले व नगरपरिषदेचे स्वच्छता दूत कामगार राजू मेवाते यांचे हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले आहे.

कोपरगाव नगरपरिषद हद्दीत तत्कालीन भाजप आमदारांनी बंदिस्त नाट्यगृहासाठी दोन कोटींचा निधी येवला नाका येथे मंजूर केला खरा.पण त्या ठिकाणी जागाच उपलब्ध न झाल्याने त्याला यश मिळाले नाही.त्यासाठी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी माजी आमदारांकडे पाठपुरावा करूनही उपयोग न झाल्याने तो निधी ३१ मार्च २०२० रोजी परत जाणार होता.त्यावेळी नगराध्यक्ष यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांची नगर येथे भेट घेऊन तो निधी परत जाऊ नये यासाठी मागणी केली होती.ती मान्यता मंत्र्यांनी मान्य करून तो निधी प्रशासकीय इमारतीच्या दुसऱ्या मजल्यासाठी वर्ग केला होता.

कोपरगाव नगरपरिषदेच्या पहिल्या मजल्याच्या भूमीपूजनाचे काम १६ सप्टेबर २०१६ मध्ये तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी प्रशासकीय मान्यता नसताना उरकले होते.त्यासोबत सार्वजनिक वाचनालय,जिजामाता उद्यान आदींना प्रशासकीय मान्यता नसताना कोनशिला लावून आपल्या प्रसिद्धीची हौस तत्कालीन आमदार व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी भागवून घेतली होती.त्यानंतर नगराध्यक्ष विजय वहाडणे यांची सत्ता २३ ऑक्टोबर २०१६ मध्ये जनतेतून निवडून आल्यावर आली त्या नंतर हा निधी मंजूर झाला होता.त्या कागदपत्रांची पूर्तता मात्र आधीच झाली होती.या इमारतीचे काम पूर्ण व्हायला जवळपास पाच वर्षाचा कालखंड लागला आहे.अद्याप उर्वरित काम बाकी आहे.

त्यानंतर नगरपरिषद हद्दीत तत्कालीन भाजप आमदारांनी बंदिस्त नाट्यगृहासाठी दोन कोटींचा निधी येवला नाका येथे मंजूर केला खरा.पण त्या ठिकाणी जागाच उपलब्ध न झाल्याने त्याला यश मिळाले नाही.( या कामाचे श्रेय नगराध्यक्ष वहाडणे यांना जाऊ नये यासाठी केलेली तरतूद होती ?) त्यासाठी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी माजी आमदारांकडे पाठपुरावा करूनही उपयोग न झाल्याने तो निधी ३१ मार्च २०२० रोजी परत जाणार होता.त्यावेळी नगराध्यक्ष यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांची नगर येथे भेट घेऊन तो निधी परत जाऊ नये यासाठी मागणी केली होती.ती मान्यता मंत्र्यांनी मान्य करून तो निधी प्रशासकीय इमारतीच्या दुसऱ्या मजल्यासाठी वर्ग केला होता.त्याचे अंदाजपत्रक बनवून दुसऱ्या मजल्याचे इमले रचले गेले होते.

आगामी काळात पितृपक्ष असल्याने मुहूर्त नसल्याने नगराध्यक्ष वहाडणे यांनी हा कार्यक्रम घाईघाईने उरकून घेतला आहे.मात्र त्यांच्या शिरस्त्याप्रमाणे मोठा डामडौल न करता रुग्णवाहिका चालक व सामान्य स्वछता कर्मचारी यांना सन्मान बहाल केला आहे.व त्यांच्या हस्ते कोपरगाव नगरपरिषदेच्या कार्यालयीन इमारतीच्या वरील मजल्यांचे भूमीपूजन आज करण्यात आले.त्यात अनेक वर्षे कोपरगाव शहर-तालुका व परिसरातील अपघात-आत्महत्या,बेवारस मृतदेहांची प्रामाणिकपणे वाहतूक करणारे रुग्णवाहिका चालक अमित खोकले व नगरपरिषदेचे स्वच्छता दूत,सफाई कामगार राजू मेवाते यांचे हस्ते पार पडले आहे.उद्यापासून पितृपक्ष सुरू होत असल्याने व कामाला उशीर होऊ नये म्हणून आजच भूमिपूजन करण्यात आले असल्याचा दावा केला आहे.

गेली पाच वर्षे आपण जास्तीतजास्त वेळा सर्वसामान्य व्यक्तींनाच अशा पद्धतीने सन्मान देण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावाही वहाडणे यांनी केला आहे.
या कामासाठी आ.आशुतोष काळे यांच्या प्रयत्नांतून वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान ठोक योजनेतून चार कोटी रूपये निधी मिळालेला आहे. तळमजला व पहिल्या मजल्याचे काम माजी आ.कोल्हे यांच्या प्रयत्नांतून मिळालेल्या दोन कोटी रुपये निधीतून पूर्ण झालेले असल्याचे सांगण्यास ते विसरलेले नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close