गुन्हे विषयक
…’त्या’ घटनेचा कोपरगावातील नेत्याकडून निषेध !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील कोळगाव थडी येथील ग्रामपंचायत हद्दीत दि.१० ऑगष्ट रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात आरोपीने सात-आठ धार्मिक ग्रंथांची पाने फाडून रस्त्यावर इतस्ततः विखरुण टाकल्याने गावात दोन गटात तणाव निर्माण झाला असून त्या बाबत कोपरगाव नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष विजय वहाडणे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये निषेध व्यक्त केला आहे.
दरम्यान या मळेगाव थडी येथील या गंभिर प्रकरणी अद्याप कोणाही आरोपीचा तपास लावण्यास पोलीस यंत्रणांना यश आलेले नाही.त्याबाबत अद्याप कोणीही पुढे आलेले नाही.मात्र पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने शांतता समितीची बैठक घेऊन सदर गावात शांतता स्थापित करण्यात यश मिळवले आहे.
महाराष्ट्रातील अ.नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील कोळगाव थडी येथील ग्रामपंचायत हद्दीत दि.११ ऑगष्ट रोजी १२ नंतर ते आज सकाळी ०६ पूर्वी अज्ञात इसमाने धार्मिक ठिकाणी प्रवेश करत तेथे ठेवलेले सुमारे ८-१० धार्मिक ग्रंथातील ७-८ ग्रंथ फाडून त्याची पाने अन्यत्र विखरून टाकली असल्याची घटना काल सकाळी उघड झाली होती.त्यामुळे एका गटातील नागरिकांनी गावात एकत्र जमत या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.दरम्यान याबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात या प्रकरणी फिर्यादी आयेशा मस्जिदीचे अध्यक्ष हुसेन बिबन शेख (वय-४७ )यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात या प्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.त्या घटनेचे पडसाद उमटून दोन्ही गटाच्या वतीने दोन जमाव वेगवेगळ्या वेळी जाऊन पोलीस ठाण्यात जमून आले होते.व दोषींवर कारवाई करावी अशी मागणी करून निरपराध नागरिकांना यात गोवू नये अशी मागणी त्यांनी शिर्डी येथील उ पाविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांचेकडे केली आहे.
दरम्यान या प्रकरणी कोपरगाव नगर परिषदेचे माजी अध्यक्ष विजय वाहाडणे यांनी आमच्या प्रतिनिधींशी संपर्क साधून या प्रकरणी निषेध व्यक्त केला असून त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात त्यांनी म्हटले आहे की,”कोळगावथडी येथे समाजकंटकाने धार्मिक ग्रंथाची पाने फाडून केलेल्या विटंबनेचा निषेध ‘सकल हिंदू समाजा’च्या वतीने कालच करण्यात आला असल्याचा दावा करून कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात तसे निवेदन देऊन दोषी समाजकंटकावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.शासनाने मंदिराप्रमाणेच सर्व मस्जिदी-चर्च व सर्वच धार्मिक स्थानांवर सी.सी.टि.व्ही.कॅमेरे बसविण्याचा आग्रह धरणे गरजेचे आहे.तरच अशा समाजकंटकांना आळा घालणे शक्य होईल.तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांनी सर्वधर्मीय-सर्वपक्षीय शांतता समितीच्या एकत्रित बैठका नियमितपणे घेतल्या पाहिजे अशी महत्वपूर्ण मागणी त्यांनी केली आहे.
हिंदू धर्मांच्या सण-उत्सवाच्या वेळी केवळ काही हिंदू कार्यकर्ते-संघटना व मुस्लिमांच्या धार्मिक सणांच्यावेळी फक्त काही मुस्लिम कार्यकर्त्यांच्या बैठका स्वतंत्रपणे न घेता ‘शांतता समिती’च्या संयुक्त बैठका घ्याव्यात.त्यामुळे हिंदू-मुस्लिम कार्यकर्ते-नेते यांच्यात समन्वय ठेवणे सोपे जाईल असा विश्वास माजी अध्यक्ष विजय वहाडणे यांनी शेवटी व्यक्त केला आहे.