जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
उद्योग जगत

अ.नगर जिल्ह्यात१०४ नूतन उद्योगांना मंजुरी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

अ.नगर जिल्ह्यात अधिकाधिक उद्योगांची उभारणी होऊन बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे.युवक-युवतींना या माध्यमातून आत्मनिर्भर करण्यासाठी राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे आग्रही आहेत.त्यांच्याच प्रयत्नातून चालू वर्षात १०४ उद्योगांना मंजुरी मिळाली असून ७०० बेरोजगारांच्या हाताला काम मिळाले आहे.मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनेच्या अंमलबजावणीत अ.नगर जिल्हा अव्वल असल्याची माहिती जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापकांनी दिली आहे.

अ.नगर जिल्ह्यातील युवक,युवतींना आत्मनिर्भर बनवण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्रामार्फत उद्योगांचे प्रस्ताव बँकेकडे पाठविण्यात येऊन बँकेच्या मंजुरीनंतर लाभार्थ्यांना प्रशिक्षण देत कर्ज वितरण करण्यात येत आहे.मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत सन २०२३-२४ या वर्षात मंजुरी देण्यात आलेल्या १०४ उद्योगांना ४.७३ कोटी इतके अनुदान मिळणार आहे.

अ.नगर जिल्ह्याचा सर्वसमावेशक विकास आराखडा तयार करण्यात येऊन त्यामध्ये अधिकाधिक रोजगार निर्मितीवर भर देण्याच्या सूचना पालकमंत्री श्री.विखे यांनी दिल्या आहेत.जिल्हाधिकारी सिद्धाराम सालिमठ यांनी या बाबीकडे विशेष लक्ष देऊन जिल्हयातील सर्व बँकांच्या तसेच सर्व संबंधित विभाग प्रमुखाच्या बैठका घेत बँकांना उद्योगासाठी अधिक प्रमाणात कर्ज मंजूर करण्याच्या सूचना दिल्या.याबाबत सातत्याने पाठपुरावाही करण्यात आल्याने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या महत्वाकांक्षी योजनेला जिल्ह्यात गती मिळत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

जिल्ह्यातील युवक,युवतींना आत्मनिर्भर बनवण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्रामार्फत उद्योगांचे प्रस्ताव बँकेकडे पाठविण्यात येऊन बँकेच्या मंजुरीनंतर लाभार्थ्यांना प्रशिक्षण देत कर्ज वितरण करण्यात येत आहे.मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत सन २०२३-२४ या वर्षात मंजुरी देण्यात आलेल्या १०४ उद्योगांना ४.७३ कोटी इतके अनुदान मिळणार आहे.त्याचबरोबर जिल्हयात सुमारे २५ कोटी इतकी औद्यो गिक गुंतवणुक होत आहे.जिल्ह्यात हा कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबवून जिल्हयासाठी असणारे एक हजार उद्योगांचे उद्दिष्ट साध्य होऊन त्यातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार आहे.

राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी असलेल्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातुन जिल्ह्यातील अधिकाधिक युवक-युवती आत्मनिर्भर व्हाव्यात यासाठी सर्व यंत्रणा व बँकांनी अधिक प्रमाणात रोजगार निर्मिती करण्याचे आवाहनही पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close