आंदोलन
ग्रामसेवकाची मनमानी,ग्रा.पं.सदस्यांची पंचायत समितीत तक्रार,

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी ग्रामपंचायतीत सध्या सेवेत असलेल्या ग्रामसेवकाचा कारभार मनमानी झाला असून ते ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेत नासल्याची तक्रार उघडकीस आली असून त्यांनी याबाबत कोपरगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांच्याकडे नुकतीच तक्रार केली असल्याची घटना उघड झाली आहे.
“जेऊर कुंभारी येथील ग्रामसेवक आजतागायत कुठल्याही सदस्याला विश्वासात न घेता त्यांचेकडुन इच्छेनुरूप पैसे खर्च केले जातात.आजतागायत कुठल्याही व्यवहाराची माहिती सदस्यांना मागुन ही दिली गेली नाही व पहीले खर्च,व मग त्याची मंजुरी पुढल्या महिन्यात असा अनागोंदी कारभार सध्या सुरू आहे विचारणा केली असता ग्रामसेवक उत्तर देण्यास टाळाटाळ करतात”-अनिता गायकवाड,सदस्यां,जेऊर कुंभारी ग्रामपंचायत,ता.कोपरगाव.
सदरचे सविस्तर वृत असे की,”कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारीचे ग्रामसेवक के.बी.रणछोड ग्रामपंचायतीच्या कामात मनमानी कारभार करत असून त्यांनी आपले तेच खरे असा ठेका धरला असल्याची तक्रार तीन महिला ग्रामपंचायत सदस्यांनी केली आहे.सदर ग्रामसेवक ग्रामपंचायतीचे कुठलेही व्यवहार सदस्यांना विश्वासात न घेता परस्पर स्वताच्या मनाने सुरु असून ग्रामपंचायतीच्या कोणत्याही कामाबद्दल सदस्यांना विश्वासात घेतले जात नाही तसेच ग्रामपंचायतीच्या प्रत्येक महिन्याच्या मिटींगच्या परिपत्रकात संभाव्य खर्चाबाबत व झालेल्या खर्चाबाबत कुठल्याही प्रकारची माहिती नसते व मागुनही ग्रामसेवकाकडुन मिळत नाही विचारणा केली असता गुपचुप इतिवृत्तावर सह्या करा,केल्या नाही तर तुम्हाला सदर बैठकीस बसता येणार नाही अशी धमकी महीला सदस्यांना ग्रामसेवकां कडुन दिली जाते व त्यांच्या मनमानी विरूद्ध हजेरी पुस्तकावर सह्या घेतल्या जात असल्याचा आरोप केला आहे.त्यामुळे कोपरगाव तालुक्यासह जेऊर कुंभारी परिसरात खळबळ उडाली आहे.
सदर ग्रामसेवक आजतागायत कुठल्याही सदस्याला विश्वासात न घेता ग्रामसेवका कडुन इच्छेनुरूप पैसे खर्च केले जातात.आजतागायत कुठल्याही व्यवहाराची माहिती सदस्यांना मागुन ही दिली गेली नाही व पहीले खर्च,व त्याची मंजुरी पुढल्या महिन्यात असा अनागोंदी कारभार सध्या सुरू आहे विचारणा केली असता ग्रामसेवक उत्तर देण्यास टाळाटाळ करतात.यामुळे ग्रामसेवकाच्या कारभारा बद्दल संशयाला जागा निर्माण झाली आहे तेव्हा कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सूर्यवंशी यांनी ग्रामपंचायतीच्या दप्तराची तपासणी करावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्या अनिता बाबासाहेब गायकवाड,धनश्री नामदेव वक्ते,किशोर मनोहर वक्ते,
आदींनी शेवटी केली आहे.