गुन्हे विषयक
अल्पवयीन मुलगी बेपत्ता,कोपरगावात गुन्हा दाखल

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक अल्पवयीन मुलगी घरी कोणास काही एक न सांगता घरून बेपत्ता झाली होती.त्यानुसार तिच्या फिर्यादी मामीने (वय-२७)याबाबत तालुका पोलिसांत अज्ञात इसमाविरुद्ध फुस लावून पळवून नेल्याचा गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.
दरम्यान या घटनेत उशिराने मिळालेल्या माहितीनुसार सदर मुलगी पोलिसांनी सापडवली असून तिला फरार ठिकाणच्या नातेवाईकांकडून ताब्यात घेण्यात आले आहे.तिला नगर येथील जिल्हा बाल समिती समोर हजर केले होते.त्या नंतर कायदेशिर प्रक्रिया पूर्ण करून तिला तिच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले असल्याची माहिती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी दिली आहे.त्यामुळे तालुका पोलीस अधिकारी व चौकशी अधिकाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
जराशी समज येण्याच्या वयातच अल्पवयीन मुलींना प्रेमाची फूस लावून पळवून नेण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.शहर व तालुक्यात आठवड्यातून व पंधरा दिवसातून एक तरी अल्पवयीन मुलगी पळून गेल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल होते.अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्यामुळे न्यायालयाचे आदेशानुसार अशा घटनांमध्ये पोलिसांकडून अपहरणाची तक्रार दाखल केली जाते.मुलीचा शोध घेतल्यानंतर ‘ती’ मित्रासोबत पळून गेल्याचे लक्षात येते.मुलीचे पालक पोलिसांकडे मुलीचा शोध घेऊन तिच्या मित्रावर गुन्हा दाखल करण्यास सांगतात.पोलीस देखील काही प्रकरणांमध्ये मुलीचा शोध घेऊन तिला परत घेऊन येतात.संबंधित मुलावर गुन्हा दाखल केला जातो.कधी-कधी पोलिसांना अशा प्रकरणांत बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा लागतो.यामध्ये मुलीच्या पालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो.अशीच घटना कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत पश्चिम भागात घडली आहे.कोपरगाव तालुक्यात अशा घटनात मोठी वाढ झाली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी शेतमजूर (वय-२७) यांची भाची हि आपल्या कुटुंबासमवेत राहत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत रहिवासी असून त्यांचा मजुरीचा व्यवसाय आहे.त्यांची अल्पवयीन भाची (वय-१४ वर्ष ६ महिने) असून तिला शुक्रवार दि.१४ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ०७ ते दुपारी १.३० वाजेच्या दरम्यान आपल्या कायदेशीर रखवालीतून अज्ञात कारणासाठी अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेले असल्याची फिर्याद कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अपहरीत मुलीच्या मामीने दाखल केली आहे.दरम्यान घटनास्थळी पोलीस निरीक्षक वासुदेव देसले व सहाय्यक फौजदार आंधळे यांनी भेट दिली आहे.
कोपरगाव तालुका पोलीसांनी या अज्ञात आरोपी विरुद्ध आज दुपारी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.२०८/२०२३ भा.द.वि.कलम ३६३ प्रमाणे दाखल केला आहे.पुढील तपास तालुका पोलीस निरीक्षक देसले यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार ए.एम.आंधळे हे करीत आहेत.