जाहिरात-9423439946
निवडणूक

कोपरगाव पीपल्स बँकेचा निकाल जाहीर,…या गटाची विजयी सलामी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

अ.नगर जिल्ह्यातील सहकारी बँकात अग्रणी समजल्या जाणाऱ्या कोपरगाव को-ओपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीचे मतदान संपन्न होऊन निकाल आज हाती आला असून यात सहकार पॅनलचे एकवीस पैकी सर्वच्या सर्व १५ जागा सत्ताधारी गटाचे उमेदवार निवडून आले आहे.विजयी उमेद्वारांचं सर्वत्र अभिनंदन होत आहे.तर विरोधकांचे सहा उमेदवार पराभूत झाले आहे.

दरम्यान या विजयी सलामीबाबत आमच्या प्रतिनिधीने सहकार पॅनलचे अध्यक्ष कैलास ठोळे यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी सदर विजय सभासदांना समर्पित केला असून,”सभासदांना सातत्याने दिलेला लाभांश,ठेवीदारांना मिळणारे आकर्षक व्याज,चांगले विनम्र प्रशासन,चांगली आर्थिक स्थिती आदींमुळे निवडून दिले असल्याची प्रतिक्रिया नोंदवली आहे.

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकी पाठोपाठ आता सहकारी संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली होती याखेरीज.राज्यातील अनेक सहकारी बँका,सोसायट्या,साखर कारखाने,यांच्या पंचवार्षिक निवडणुकांना स्थगिती आणली होती.सप्टेंबर अखेर या निवडणुका घेऊ नये असा आदेश सरकारच्या वतीने जारी करण्यात आला होता.तो आदेश काही माहिन्यापूर्वी सरकारने संबंधित आदेश मागे घेत असल्याचे पत्र उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सादर केले होते.त्याला खंडपीठाने मान्यता दिली होती.त्यामुळे राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूकांचा मार्ग खुला झाला होता.त्यानुसार कोपरगावातील सहकारी क्षेत्रातील अग्रणी असलेली कोपरगाव पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीचा समावेश होता.त्यानुसार काल दि.०५ फेब्रुवारी रोजी हि निवडणूक संपन्न झाली आहे.

सदर बँकेत एकूण ०४ हजार ३२१ सभासद होते त्यातील मतदारांनी आपला निवडणूक हक्क बजावला होता. यात सर्वसाधारण जागेवर १२ उमेदवार विजयी झालं असून त्यांना मिळालेली मते पुढील प्रमाणे-कंगले सुनील दत्तात्रय-१८०३,काले अतुल धनालाल,-१८५३,ठोळे कैलासचंद भागचंद-१९४७,ठोळे रवींद्र रतनचंद-१८०५,पांडे दीपक माणिकचंद-१७२६,बंब सुनील शांताराम-१९०३,बागरेचा धरमकुमार मानकलाल-१८१७,बोरा सुनीलकुमार शांतीलाल-१८६८,मुंदडा सत्येन सुभाष-१८७७,लोहाडे रवींद्र शांतीलाल-१६७५,शाह कल्पेश जयंतीलाल-१८४३,शिंगी राजेंद्र मोतीलाल-१७२३ आदींचा समावेश आहे.

तर विरोधी गटाकडून सर्वसाधारण जागेसाठी चार उमेदवार देण्यात आले होते त्याचा पराभव झाला आहे.त्याची नावे व मिळालेली मते पुढील प्रमाणे आहे.त्यांची नावे पुढील प्रमाणे-कोठारी विजय रुपचंद-११६०,बज सुधीर सोहनलाल-४१८,लोढा जिंतेंद्र बाबूलाल-११५६,केकाण जनार्दन शांताराम यांना केवळ ३७८ मते प्राप्त झाली असून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.दरम्यान पराभूत उमेदवार विजय कोठारी आणि जितेंद्र लोढा यांनी लक्षवेधी मते मिळवली आहे हे विशेष !

दरम्यान भटक्या जाती जमातीसाठी एक जागा असून त्यात सत्ताधारी गटाकडून आव्हाड वसंतराव फक्कडराव यांना १८०६ मते मिळून विजयी झाले आहे.यातील विरोधी उमेदवार केकाण जनार्दन शांताराम यांना केवळ ८४९ मते प्राप्त झाली असून त्यांना दोन ठिकाणी पराभवाचा सामना करावा लागला आहे.

महिला राखीव प्रतिनिधीसाठी सत्ताधारी गटाकडून गंगवाल त्रिशला सुनील कुमार-२०५२ तर शिलेदार प्रतिभा सुनील -१९०३,या दोन उमेदवार विजयी सलामी दिली आहे.तर पराभूत उमेदवार बज संगीता सुधीर याना केवळ ५५६ मतांवर समाधान मानावे लागले आहे.

दरम्यान अनुसूचित जाती जमातीसाठीच्या एक जागेसाठी सत्ताधारी गटाकडून लोहकरे भाऊसाहेब शंकर यांनी १९०९ मते मिळवून विजयाचा झेंडा फडकवला असून असून यातील विरोधक आबनावे यशवंत रामचंद्र-४४४ मते मिळवून पराभूत झाले आहे.विजयी उमेदवारांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.विजयानंतर सभासदांनी बँकेसमोर फटाके फोडून आनंद व्यक्त केला आहे.

या निवडणुकीत निवडणूक अधिकारी म्हणून नामदेव ठोंबळ यांनी काम पाहिले असून त्यांना सहाय्यक निवडणूक अधीकारी म्हणून राजेंद्र रहाणे हे सहाय्य केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close