आंदोलन
‘जुन्या पेन्शन’साठी कोपरगावात विविध कर्मचारी संघटनांचा मोर्चा

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
‘सरकारने जूनी पेन्शन योजना लागू करावी’ या प्रमुख मागणीसाठी सर्वत्र जोर वाढत आहे.कोपरगाव शहर आणि तालुकाही त्याला अपवाद नाही.आधी कोपरगाव नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी आदल्या दिवशी यावर आवाज ऊठवला होता.आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास पालिका कार्यालय व यात नंतर दुपारी एकच्या सुमारास राज्य कर्मचारी संघटनाच्या वतीने आज कोपरगाव तहसील कार्यालयासमोर सभा घेण्यात आली आहे.व त्या नंतर शहरात मोर्चा काढण्यात आला असून आपल्या मागण्यांवर जनता व प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले आहे.
“भारतीय संविधानाने प्रत्येक भारतीय नागरीकाला सामाजिक,राजकिय व आर्थिक न्याय देण्याचे आश्वासित केलेले आहे.तसेच समाजातील प्रत्येक दुर्बल घटकाला सन्मानाने जगता यावे अशी परिस्थिती निर्माण करण्याचे नागरीकांना विविध तरतुदींद्वारे वचन दिलेले आहे.कामगार जगतातील प्रत्येकाचा सेवानिवृत्ती नंतरच्या जगण्याचा हक्क या संविधानिक मूल्यांमध्ये सामावलेला आहे.कामगार वर्गाची त्यांच्या सेवानिवृत्ती नंतरच्या आयुष्याची जगण्याची सोय म्हणून सेवानिवृत्ती योजनेचा अविष्कार झाला,जे संविधानिक आश्वासन आहे.ज्यापासून शासन व सत्ता आता जबाबदारी झटकून पळ काढत आहे”-गोरक्षनाथ शेळके,माजी अध्यक्ष ग्रामसेवक संघटना,कोपरगाव तालुका.
राज्य सरकारी,महापालिका,नगरपालिका यातील सर्व कामगार,कर्मचारी,अधिकाऱ्यांना जूनी पेन्शन योजना लागू करण्याची सर्व संघटनांकडून मागणी केली जात आहे.त्यामुळे सरकारने जूनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी सर्वत्र जोर वाढत आहे.कोपरगाव शहर आणि तालुकाही त्याला अपवाद नाही.आधी कोपरगाव नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी आदल्या दिवशी आधी यावर आवाज ऊठवला होता.आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास पालिका कार्यालय व यात नंतर दुपारी एकच्या सुमारास राज्य कर्मचारी संघटनाच्या वतीने आज कोपरगाव तहसील कार्यालयासमोर सभा घेण्यात आली आहे.व त्या नंतर शहरात मोर्चा काढण्यात आला आहे.त्यात ग्रामसेवक संघटना,शिक्षक,परिचारिका,कृषी,लिपिक वर्ग संघटना,अंगणवाडी पर्यवेक्षिका आदींनी सहभाग घेतला आहे.
दरम्यान या जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्य कर्मचारी संघटनेचा जो आटापिटा सुरु आहे.त्याबाबत जनसामान्यांमध्ये मात्र नाराजीचा सूर पहायला मिळाला आहे.शेतीमालासाठी भाव नाही त्यावर कोणी बोलत नाही परिणामस्वरूप शेतकरी आत्महत्या करत असून राज्याच्या एकूण उत्पन्नाचा जवळपास ६० टक्के वाटा हा यावर खर्ची पडत आहे.त्यामुळे विकासासाठी अल्पस्वल्प निधी राहत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान हा मोर्चा आज दुपारी तहसील कार्यालयातून सुरु होऊन तो विघ्नेश्वर चौक,छात्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे महात्मा गांधी चौक,एस.जी.रोड ,संभाजी महाराज चौक मार्गाने घोषणा देत आपल्या मागण्याचा जयघोष करत गेला आहे.व त्यांनी शहरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
दरम्यान सदर प्रसंगी कोणत्याही आंदोलनास पाठींबा देण्यास नेहमी उत्सुक असलेले शहरातील दलित राजकीय संघटनेचे कार्यकर्ते पाठींबा देण्यासाठी आले असता तेथील संघटनेच्या महिला नेत्यांनी त्यांना स्पष्ट शब्दात नकार दिला असून सदर आंदोलन हे कर्मचारीच करणार असल्याचे व वरिष्ठांनी आपल्याला बजावले आहे.व जिल्हा स्तरावरून हि जबाबदारी आपल्यावर दिली आहे.त्यामुळे आलेल्या कार्यकर्त्यांना आल्या पावली माघारी फिरण्याची नामुष्की पत्करावी लागली असल्याचे दिसून आले आहे.याबाबत सदर ठिकाणी कर्मचारी संघटनात दोन प्रवाह दिसून आले आहे.शहरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.