जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आंदोलन

राज्यपाल कोश्यारी यांचा…या शहरात निषेध !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांवरील विधानाचे आज तिसऱ्या दिवशीही कोपरगावसह राज्यभरात पडसाद उमटले असून आज छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्यासमोर सायंकाळच्या सुमारास त्यांच्या फलकावर ठाकरे शिवसेनेचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र झावरे यांच्या प्रमुख उपस्थितीत,”जाहीर निषेध आंदोलन” केले आहे.

“राज्यात ज्यांनी कायदा सुव्यवस्था राखायची प्रधान भूमिका राखायची त्यांनीच वादग्रस्त विधाने करणे धोक्याचे असल्याचे सांगून आगामी काळात अशी विधाने खपवून घेतली जाणार नाही असे प्रतिपादन करून राज्यपालांना तातडीने राज्याच्या बाहेर घालवावे”-संतोष गंगवाल,उपाध्यक्ष,अ,नगर,जिल्हा मनसे.

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांवरील विधानाचे आज तिसऱ्या दिवशीही कोपरगावसह राज्यभरात पडसाद उमटले असून आज या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झालेला असतानाच आता शिंदे गटही आक्रमक झाला आहे.छत्रपती शिवाजी महाराजांचा कुणीही अनादर केला तर ते खपवून घेतलं जाणार नाही.सातत्याने अशी विधाने आली तर दोन्ही पक्षात वितुष्ट निर्माण होऊ शकतं असा इशाराच शिंदे गटाचे आ.संजय गायकवाड यांनी दिला आहे.त्यामुळे भाजपची चांगलीच कोंडी झाली आहे.कोपरगाव शहरातही आज याचे तीव्र पडसाद उमटले आहे.

सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास त्याचे तीव्र पडसाद उमटले आहे.सदर प्रसंगी बोलताना राजेंद्र झावरे यांनी सदर राज्यपाल यांना वादग्रस्त विधाने करण्यापासून सरकारने रोखवे असे आवाहन केले आहे.त्यांनी राज्याच्या कार्यभार स्वीकारल्या पासून काहींना काही वादग्रस्त विधाने करून कायमच राज्यात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.तर आज बोलताना उद्धव ठाकरे शिवसेनेचे शहराध्यक्ष कलविंदर दडियाल यांनीही या प्रकरणी निषेध व्यक्त केला आहे.तर शहर राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष अशोक आव्हाटे यांनीही या प्रकरणी,”राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी आपल्या तोंडाला लगाम घालावा” अशी मागणी केली आहे.

मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष गंगवाल यांनी राज्यपाल कोश्यारी यांचा समाचार घेताना,”राज्यात ज्यांनी कायदा सुव्यवस्था राखायची प्रधान भूमिका राखायची त्यांनीच वादग्रस्त विधाने करणे धोक्याचे असल्याचे सांगून आगामी काळात अशी विधाने खपवून घेतली जाणार नाही असे प्रतिपादन करून राज्यपालांना तातडीने राज्याच्या बाहेर घालवावे अशी मागणी केली आहे.या प्रसंगी मनसेचे तालुकाध्यक्ष अनिल गायकवाड यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.

सदर प्रसंगी जेष्ठ कार्यकर्ते सुनील फंड,ठाकरे सेनेच्या माजी नगरसेविका वर्षा शिंगाडे,युवा राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नवाज कुरेशी,माजी नगरसेवक मेहमूद कुरेशी,विकास शर्मा,ठाकरे सेनेचे उपाध्यक्ष प्रफुल्ल शिंगाडे,युवा कार्यकर्ते विशाल झावरे,विजय सोनवणे,युवा राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष किरण खर्डे,विक्रांत झावरे,राहुल देशपांडे,मनोज नरवडे,माजी नगरसेवक रमेश गवळी,संदीप सवताडकर,आकाश कर्डीले,अनुप गिरमे,आदी मान्यवर उपस्थित होते.सदर प्रसंगी कोपरगाव शहर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close