जाहिरात-9423439946
आरोग्य

कोपरगावात कोरोना हटला पण आता नवीन संकट दाखल !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

राज्यात कोरोनाचा कहर आता दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे.त्यात रोज शुक्ल पक्षातील चंद्रकोरी प्रमाणे त्याला उतार येत आहे.कोपरगाव शहर व तालुकाही अपवाद नाही.कोपरगावातून आज आलेल्या अहवालात ५१६ रॅपिड टेक्स्ट करण्यात आल्या असून त्यात १२ रुग्ण बाधित आढळले आहे.तर ५०४ रुग्ण निरंक निघाले आहे.तर नगर येथे ४४९ स्राव तपासणीसाठी पाठवले असून आर.टी.पी.सी.आर.तपासणीत ०० तर अँटीजन तपासणीत १२ खाजगी प्रयोग शाळा तपासणीत ०१ असे एकूण अहवालात एकूण १३ रुग्ण बाधित आढळले आहे.तर ०४ जणांना उपचारानंतर सोडून देण्यात आले आहे तर आज कोपरगाव शहर व तालुक्यातील एकाही म्युकरमायकॉसिस ने प्रवेश केला असून एक महिनाभरात शहर व तालुक्यात जवळपास दहा रुग्ण आढळले असल्याची खळबळजनक माहिती रुंदावन डायग्नोस्टिकचे संचालक डॉ.संदीप मुरूमकर यांनी दिल्याने शहर व तालुक्यात खळबळ उडाली आहे.त्यामुळे तालुक्यात आता नवीन संकट उन्हे राहिले असून नागरिकांना अधिक दक्षता घ्यावी लागणार असल्याची माहितीही त्यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली आहे.

मार्च २०२१ पासून आजतागायत म्युकर मायकोसिसचे तब्बल १२ रुग्ण असून वर्तमानात ०५ रुग्ण सक्रिय आहे मात्र या रुग्णावर शासकीय खर्चातून उपचार सुरु आहे.यातील ०३ रुग्ण कोपरगाव तालुक्यातील असून बाकी रुग्ण बाहेरच्या तालुक्यातील आहे.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले असले तरी आता कोरोनासाथी बरोबर हि साथही ओसरली आहे”डॉ.कृष्णा फौलसुंदर,वैद्यकीय अधीक्षक,कोपरगाव ग्रामीण रुग्णालय.

कोपरगाव तालुक्यात आज एक अखेर १२ हजार ३१७ बाधित रुग्ण आढ आढळले असून त्यातील १०३ रुग्ण सक्रिय आहे.तर आज पर्यंत २०२ जणांचा बळी गेला आहे.त्याचे प्रमाण टक्केवारीत १.६४ टक्के आहे.तर आज अखेर एकूण ८३ हजार १९३ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.त्याची दर दहा लाखाला आकडेवारी ०३ लाख ३२ हजार ७७२ इतकी आहे.त्याचा बाधित दर हा १४.८१ टक्के आहे.तर आज अखेर उपचारानंतर १२ हजार ०१२ रुग्ण बरे झाले आहे.त्यांचा आकडेवारीत दर ९७.५२ टक्के असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कृष्णा फौलसुंदर यांनी दिली आहे.

नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ०२ लाख ६३ हजार ०९० झाली असून सक्रिय रुग्ण संख्या ०४ हजार २४७ झाली आहे.तर आज अखेर पर्यंत ०२ लाख ५३ हजार ७६० रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे.तर ०५ हजार ०८२ रुग्ण आतापर्यंत दगावले आहे.

म्युकर मायकॉसिस’चा समावेश साथीच्या रोगांमध्ये करण्याच्या सूचना केंद्र सरकारने सर्व राज्यांना दिल्या आहेत. तसंच त्यासाठी काही मार्गदर्शक सूचना केंद्राने राज्यांना जारी केल्या आहेत.

म्युकर मायकोसिस किंवा काळी बुरशी म्हणजे काय? हे आपण जाणून घेऊया.

कोव्हिड बरा झालेल्या काही रुग्णांमध्ये डोळे आणि नाकाच्या इन्फेक्शनच्या तक्रारीमध्ये वाढ झाली आहे.या आजाराला ‘म्युकर मायकॉसिस’ म्हणतात.
कोव्हिड बरा झालेल्या रुग्णांमध्ये काळ्या बुरशीचा संसर्ग झाल्याच्या तक्रारीमध्ये वाढ झाल्यानंतर अशा रुग्णांना राज्य सरकारकडून मोफत उपचार दिले जातील अशी माहिती या महिन्याच्या प्रारंभी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

दरम्यान नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी जाहीर केलेली शनिवारची “जनता संचारबंदी” कापड व तत्सम व्यापाऱ्यांनी हरकत घेतल्याने वैतागून मागे घेतल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.विविध संघटना व कार्यकर्ते यांनी आपल्या सोयींनी वाराची मागणी केल्याने शहरात गोंधळ उडाला होता.त्यावर नगराध्यक्ष वहाडणे यांची हि संतप्त प्रतिक्रिया मानली जात आहे.त्यानंतर कोपरगाव व्यापारी महासंघ काय भूमिका घेतो याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

या बाबत डॉ.मुरूमकर पुढे बोलताना म्हणाले की,कोपरगाव तालुक्यात जवळपास दहा रुग्ण असून या रुग्णांची तपासणी आमच्या प्रयोगशाळेत झाली आहे.त्याबाबत आमच्याकडे अधिकृत आकडेवारी असून त्यात कोणताही संदेह असू नये.अशा प्रकारची तपासणी करणारी हि कोपरगाव.राहाता,येवला,सिन्नर,वैजापूर,आदी परिसरात हि एकमेव प्रयोगशाळा असून या ठिकाणी कोव्हिडच्या सावर्धिक तपासण्या झाल्या आहेत त्याच बरोबर याठिकाणी काळ्या बुरशीची तपासणीही होत असते.त्यामुळे आमच्याकडे अधिकृत माहिती असल्याचा दावाही त्यांनी आज केला आहे.व त्याबाबत सर्व दप्तर अधिकृत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.हा रोग माणसाला कोविड नंतर आलेल्या अशक्तपणामुळे निसर्गात कायम अस्तित्वात असलेली काळी बुरशी माणसावर हल्ला करते.जसे राजा कमजोर झाला की त्यातील एखादा सरदार त्याची अचानक सत्ता हस्तगत करतो तसाच हा प्रकार असतो.त्यामुळे ज्यांना कोविड होऊन गेला असेल त्यांनी काही काळ जपण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.आगामी काळात हि साथ वाढण्याचा धोकाही त्यांनी बोलून दाखवला आहे.त्यामुळे नागरिकांना सतर्क राहावे लागेल असा इशाराही त्यानी शेवटी दिला आहे.

याबाबत आमच्या प्रतिनिधीने कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.कृष्णा फौलसुंदर यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी मार्च पासून आजतागायत म्युकर मायकोसिसचे तब्बल १२ रुग्ण असून वर्तमानात ०५ रुग्ण सक्रिय असल्याची माहिती दिली आहे मात्र या रुग्णावर शासकीय खर्चातून उपचार सुरु आहे.यातील ०३ रुग्ण कोपरगाव तालुक्यातील असून बाकी रुग्ण बाहेरच्या तालुक्यातील असल्याची माहितीही त्यानी दिली आहे.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.मात्र आता कोरोनासाथी बरोबर हि साथही ओसरली असल्याची माहिती त्यांनी देऊन दिलासा दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close