जगावेगळे
कोपरगावात,’जागतिक सायकल दिन’ उत्साहात संपन्न

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
जागतिक सायकल दिना निमित्त आज सकाळी सायकल फेरी आयोजित केली होती.त्यात जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या.सयाजी कोऱ्हाळे यांचेसह मान्यवर वकील संघाचे सदस्य, नागरिक उपस्थित होते.
आज शुक्रवारी दि.०३ जून रोजी,”जागतिक सायकल दिन” संपन्न झाला आहे.एप्रिल २०१८ मध्ये, संयुक्त राष्ट्र महासभेने दरवर्षी ०३ जून रोजी ‘जागतिक सायकल दिन’ साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. हा दिवस लेस्झेक सिबिल्स्कीच्या मोहिमेचा आणि तुर्कमेनिस्तान आणि इतर ५६ देशांच्या समर्थनाचा परिणाम आहे.गेल्या तीन वर्षांत सर्व देश हा दिवस साजरा करतात. हे लक्षात घेऊन हा दिवस साजरा करण्याची एक विचार सर्वत्र प्रसारित झाला आहे.
जागतिक सायकल दिनाची वैशिष्ट्ये आणि उपयुक्तता ओळखण्यासाठी तसंच त्याचा प्रसार करण्यासाठी साजरा केला जातो.शहरातील नागरिकांनी जवळचे अंतर पूर्ण करण्यासाठी सायकलींचा वापर केला तर दररोज शेकडो लिटर इंधनाचा वापर कमी होईल आणि शहरातील प्रदूषण पातळीही कमी होईल असं देखील सांगण्यात येते.सायकल चालवणाऱ्यांच्या मते यामुळे नागरिकांचे सुरक्षित अंतराचे पालन देखील होते आणि ते सुरक्षित राहतात.त्यामुळे अलीकडील काळात सायकल दिनाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.कोपरगाव तालुका विधि सेवा समितीच्या वतीने या दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर प्रसंगी कोपरगाव येथील दिवाणी न्यायाधिस्क वरिष्ठ स्तर श्री.मिसाळ कोपरगाव विधी सेवा समितीचे अध्यक्ष,जिल्हा सत्र न्यायालयाचे वकील अशोक वहाडणे,वकील संघाचे अध्यक्ष विद्यासागर शिंदे,अड्.अशोक टुपके,अड्.नितीन पोळ,अड्.शरद गुजर,अड्.वकील संघाचे माजी उपाध्यक्ष एम.पी.येवले,आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर प्रसंगी उपस्थितांनी कोपरगाव शहरात सायकल फेरी मारुन नागरिकांचं लक्ष वेधून घेतले आहे.
सदर कार्यक्रमाचे प्रास्तविक अड्.एम.पी.येवले यांनी केले तर उपस्थितांचे आभार अड्.योगेश खालकर यानीं मानले आहे.