जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगाव तालुक्यात ८२ हजारांची चोरी,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्याच्या पूर्वेस साधारण पाच कि.मी.अंतरावर असलेल्या संवत्सर ग्रामपंचायत हद्दीत रामवाडी रस्त्यालगत रहिवासी असलेल्या फिर्यादी शेतकरी ज्ञानदेव पांडुरंग कर्पे (वय-६३) दि.०२ जूनच्या रात्री एक वाजेच्या सुमारास वीस ते पंचवीस वयोगट असलेल्या अज्ञात तीन चोरट्यांनी घराची कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश करून घरातील इसमांनी धमकावून सुमारे ८२ हजार रुपये किमतीचे दागिने.रोख रक्कम,भ्रमणध्वनी असा ऐवज लंपास केला आहे.त्यामुळे संवत्सर व परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.या प्रकरणी फिर्यादी यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

ज्ञानदेव कर्पे हे संवत्सर येथील रामवाडी रस्त्यालगत रहिवासी असून ते आपल्या कुटूंबासमवेत राहतात.ते नेहमीप्रमाणे आपली दैनंदिन कामे आटोपून घरी झोपले गेले असता गुरुवार दि.०२ जून रोजी मध्यरात्री एकच्या सुमारास अज्ञातच वीस ते पंचवीस वयोगट असलेल्या तीन चोरट्यांनी त्यांच्या घराची कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला.या तोडातोडीत घरातील सदस्य जागे झाले असता त्यांनी त्यांना धाक दाखवून घरातील ८२ हजारांचा ऐवज लंपास केला आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी ज्ञानदेव कर्पे हे संवत्सर येथील रामवाडी रस्त्यालगत रहिवासी असून ते आपल्या कुटूंबासमवेत राहतात.ते नेहमीप्रमाणे आपली दैनंदिन कामे आटोपून घरी झोपले गेले असता गुरुवार दि.०२ जून रोजी मध्यरात्री एकच्या सुमारास अज्ञातच वीस ते पंचवीस वयोगट असलेल्या तीन चोरट्यांनी त्यांच्या घराची कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला.या तोडातोडीत घरातील सदस्य जागे झाले असता त्यांनी त्यांना धाक दाखवून घरातील कपाटातील तीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने,४० हजार रुपये रोख रक्कम,त्यात ५००,२००,१०० रुपयांच्या नोटा,०२ हजार रुपये किमतीचा विवो कंपणीचा भ्रमणध्वनी असा ८२ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.

फिर्यादी यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान घटनास्थळी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले व पोलीस उपनिरीक्षक भरत दाते आदींनी भेट दिली आहे.

कोपरगाव शहर पोलीसांनी या आरोपी विरुद्ध आपल्या दप्तरी गु.र.क्रं.५०/२०२२ भा.द.वि.कलम ४५७,(अ) ४५८,३८० प्रमाणे दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक देसले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दाते हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close