जगावेगळे
..त्या मुलींनी दिला अखेर आईला खांदा !
जनशक्ती न्यूजसेवा
श्रीरामपूर(प्रतिनिधी)
मृताला अग्नी देण्यापासून कार्यसमाप्तीपर्यंतचे विधी करण्याचा अधिकार मृत व्यक्तीच्या मोठ्या मुलाला आहे. काही अपरिहार्य कारणामुळे मोठा मुलगा क्रियाकर्म करू शकत नसेल तर धाकट्या मुलाने क्रियाकर्म करावे.तोही नसेल तर अनुक्रमे मधला कोणताही मुलगा,जावई किंवा अन्य आप्तेष्ट यांना क्रियाकर्म करता येते.क्रियाकर्म करणाऱ्या पुरुषाला ‘कर्ता’ म्हणतात.अविवाहित पुरुष-स्त्री तसेच निपुत्रिक व्यक्ती आदींचे क्रियाकर्म अनुक्रमे त्यांचा पाठचा भाऊ,वडील किंवा मोठा भाऊ नाही तर आप्तेष्ट यांना करता येते.मात्र मुलींना हा अधिकार हिंदू संस्कृतीने दिलेला नाही.या पार्श्वभूमीवर हे जगावेगळे धाडस मानले पाहिजे.
भारतीय संस्कृतीचे मूलाधार असणा-या वैदिक साहित्यात ;मृत्यूनंतर केल्या जाणा-या दहनाचे व दफनविधीचे संदर्भ आढळतात.दहनप्रसंगी म्हटल्या जाणा-या प्रार्थनेत मृत शरीराला स्वत:मध्ये सामावून घेण्याची विनंती अग्नीला केली आहे.मानवी जन्माच्या आधीपासून ते त्याच्या मृत्यूनंतरही केले जाणारे संस्कार हिंदू जीवनशैलीत प्रचलित आहेत.दिवंगताविषयी आस्था,प्रेम,सद्भावना व्यक्त करण्याचे माध्यम म्हणून दाहकर्म व श्राध्द या विधीकडे पाहिले जाते.
मृताला अग्नी देण्यापासून कार्यसमाप्तीपर्यंतचे विधी करण्याचा अधिकार मृत व्यक्तीच्या मोठ्या मुलाला आहे. काही अपरिहार्य कारणामुळे मोठा मुलगा क्रियाकर्म करू शकत नसेल तर धाकट्या मुलाने क्रियाकर्म करावे.तोही नसेल तर अनुक्रमे मधला कोणताही मुलगा,जावई किंवा अन्य आप्तेष्ट यांना क्रियाकर्म करता येते.क्रियाकर्म करणाऱ्या पुरुषाला ‘कर्ता’ म्हणतात.अविवाहित पुरुष-स्त्री तसेच निपुत्रिक व्यक्ती आदींचे क्रियाकर्म अनुक्रमे त्यांचा पाठचा भाऊ,वडील किंवा मोठा भाऊ नाही तर आप्तेष्ट यांना करता येते.मात्र मुलींना हा अधिकार हिंदू संस्कृतीने दिलेला नाही.या पार्श्वभूमीवर हे जगावेगळे धाडस मानले पाहिजे.वास्तविक आधुनिक काळात या घटनांची पुनरावृत्ती होताना दिसत असली तरी हि उदाहरणे दुर्मिळ म्हणूनच पहिली पाहिजे.त्यातीलच हे एक उदाहरण असून श्रीरामपूर तालुक्यातील मुठेवाडगाव येथील कचरू व नानासाहेब येल्याबांपू मुठे यांच्या भावजयी व भाऊसाहेब येल्याबांपू मुठे यांच्या पत्नी आशाबाई भाऊसाहेब मुठे (वय-६४) यांचे रूग्णालयात अल्पशा आजाराने सोमवारी रात्री दु:खद निधन झाले आहे.पोटी सहाही मुलीच मुलगा नाही.मग अंत्यविधी कोणी करायचा अन मुखाग्नी कोणी द्यायचा असा प्रश्न ओघानेच निर्माण झाला.मात्र उपस्थित नातेवाईकांनी मार्ग काढीत सर्व विधी मुलींचीच करावे असे ठरवलं.अंत्यसंस्कार वेळी मीना राजेंद्र नळे यांनी तिरडी धरली तर शालीनीताई बाळासाहेब मात्रे,रंजनाताई कैलास शिंदे,सुरेखा गणेश भुसाळ,मंगल पोपट कर्डीले,या मुली खांदेकरी झाल्या तर सहावी मुलगी मनिषा रमेश शेळके फेऱ्या मारताना घागरीला हात लावला.एका महिलेचे अंत्यविधीचे संपूर्ण सोपस्कार महिलेनेच पार पाडल्याचा प्रसंग तसा दुर्मिळच ! पण हा योगायोग घडून मात्र आला असून प्रथमच श्रीरामपूर तालुक्यातील मुठेवाडगांव येथे पाहावयास मिळाला आहे.तर बेलापूर येथील गणपत वाघमारे यांचाही अंत्यसंस्कार ३ ऑगष्ट रोजी मुलींचीच केला होता त्याचे स्मरण या निमित्ताने घडले आहे.