निवड
…या महिलेची जिल्हा संघटक पदी निवड

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
शिवसेनेच्या उत्तर नगर जिल्हा शिवसेनेच्या महिला पदाधिकारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकत्याच जाहीर केल्या असून त्यात जिल्हा संघटक म्हणून कोपरगाव नगरपरिषदेच्या माजी नगरसेवक सपना भरत मोरे यांची निवड करण्यात आली आहे.त्यांच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
सपना मोरे यांनी आपल्या नगरसेवक काळात आपल्या प्रभागातील समस्या मांडताना शहरातील विविध प्रश्नाना वाचा फोडली आहे.याशिवाय महिला संघटित करण्यात मोलाची भूमिका निभावली आहे.त्यांच्या या कार्याची वरिष्ठ नेत्यांनी दखल घेतल्याचे मानले जात आहे.त्या माजी शहराध्यक्ष भरत मोरे यांच्या धर्मपत्नी आहेत.
त्यांच्या निवडी सोबतच कोपरगाव तालुका संघटक म्हणून सुचिता कानडे,त्रास शहर संघटक म्हणून राखी विसपुते यांची निवड करण्यात आली आहे.सपना मोरे या सेनेचे कोपरगाव येथील माजी शहर प्रमुख वएस.टी.सेनेचे प्रमुख भरत मोरे यांच्या धर्मपत्नी आहेत.
त्यांच्या निवडीचे सेनेचे उत्तर नगर जिल्हा अध्यक्ष राजेंद्र झावरे,उपजिल्हा प्रमुख प्रमोद लबडे,तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे,शहर प्रमुख कलविंदर दडियाल आदींनी अभिनंदन केले आहे.